YouTube Action eSakal
विज्ञान-तंत्र

YouTube Action : यूट्यूबची भारतावर मोठी कारवाई! तीन महिन्यांत हटवले तब्बल 22.5 लाख व्हिडिओ; दोन कोटींपेक्षा अधिक चॅनल्स बॅन

YouTube Guidelines : याच कालावधीमध्ये यूट्यूबने जगभरातील 90 लाख व्हिडिओ हटवले. यामधील 53.46 टक्के व्हिडिओंना एकही व्ह्यू मिळाला नव्हता. तसंच यातील 27.07 टक्के व्हिडिओंना एक ते दहा व्ह्यूज मिळाले होते.

Sudesh

YouTube Videos Removed : आपल्या कम्युनिटी गाईडलाईन्सचे पालन न केल्यामुळे यूट्यूबने भारतावर मोठी कारवाई केल्याचं समोर आलं आहे. अवघ्या तीन महिन्यांच्या काळात यूट्यूबने 22.5 लाख व्हिडिओ हटवले आहेत. 30 देशांमध्ये सर्वात मोठी कारवाई भारतावर केल्याचं एका अहवालात स्पष्ट झालं आहे. मंगळवारी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

यूट्यूबने 2023 च्या शेवटच्या तिमाहीमध्ये ही कारवाई केली. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये सिंगापूरमधील 12.43 लाख व्हिडिओ, तर अमेरिकेतील 7.88 लाख व्हिडिओ डिलीट करण्यात आले होते. या यादीमध्ये शेवटच्या स्थानावर इराक हा देश होता. इराकमधील कारवाईत 41,176 व्हिडिओ हटवण्यात आले होते.

जगभरातील 90 लाख व्हिडिओ हटवले

याच कालावधीमध्ये यूट्यूबने जगभरातील 90 लाख व्हिडिओ हटवले. यामधील 53.46 टक्के व्हिडिओंना एकही व्ह्यू मिळाला नव्हता. तसंच यातील 27.07 टक्के व्हिडिओंना एक ते दहा व्ह्यूज मिळाले होते. यासोबतच यूट्यूबने स्पॅम कंटेंट शेअर करणारे सुमारे दोन कोटी चॅनल्सही काढून टाकले. तसंच 110 कोटी कमेंट्सही कंपनीने डिलीट केल्या असल्याचं या अहवालात स्पष्ट झालं आहे.

यूट्यूबने दिलं स्पष्टीकरण

यूट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईन्स या जगभराल लागू केल्या जातात. यांचं पालन न केल्यास व्हिडिओंवर आणि प्रसंगी चॅनल्सवर कारवाई केली जाते. अपलोड करणारी व्यक्ती कोण आहे, कोणत्या देशाची आहे हे यावेळी पाहिलं जात नाही असं स्पष्टीकरण कंपनीने दिलं आहे. यासाठी यूट्यूब मशीन लर्निंग आणि हजारो कर्मचाऱ्यांची मदत घेतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा ट्विस्ट! MCX वर वाढ तर सराफा बाजारात 3,300 रुपयांनी स्वस्त; चांदी मात्र तेजीत; पाहा ताजा भाव

Petrol Diesel Price Today : इस्त्रायल - इराण युद्धाने जागतिक बाजारात खळबळ, पेट्रोलच्या दरातही वाढ ? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

Dr. Janardan Waghmare : साहित्य आणि शिक्षण क्षेत्राचा महामेरू हरपला! माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांचे 91 व्या वर्षी निधन; 'असा' होता त्यांचा जीवनप्रवास!

SBL स्फोट प्रकरणी नागपूर पोलिसांची मोठी कारवाई, मालकासह २१ जणांवर गुन्हा दाखल; मॅनेजरसह ९ जणांना अटक

Nagpur Factory Blast :भीषण स्फोटानंतर नातेवाईकांचा आक्रोश; ‘लवकर येते’ म्हणणारी आई परतलीच नाही, जळालेल्या स्वप्नांची कहाणी

SCROLL FOR NEXT