YouTube Ads eSakal
विज्ञान-तंत्र

YouTube Ads : यूट्यूबच्या जाहिराती पहाव्याच लागणार, अन्यथा अकाउंट होणार बंद! कंपनीने दिला गंभीर इशारा

Ad Blocker : यूट्यूबवर दिसणाऱ्या जाहिरातींचं प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढलं आहे.

Sudesh

यूट्यूब हे जगातील सर्वात मोठं आणि लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. याठिकाणी प्रत्येक सेकंदाला लाखो व्हिडिओ अपलोड होतात. या व्हिडिओंवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमातून यूट्यूब मोठ्या प्रमाणात पैसे कमावतं. हाच रेव्हेन्यू वाढवण्यासाठी आता कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे.

यूट्यूबवर दिसणाऱ्या जाहिरातींचं प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढलं आहे. जर जाहिराती नको असतील, तर त्यासाठी प्रीमियम प्लॅन्स देखील कंपनीने लाँच केले आहेत. कित्येक यूजर्स जाहिराती टाळण्यासाठी सबस्क्रिप्शन घेण्याऐवजी अ‍ॅड-ब्लॉकरचा वापर करतात. आता अशा यूजर्सना कंपनीने गंभीर इशारा दिला आहे.

अ‍ॅड-ब्लॉकर वापरणाऱ्या यूजर्सना आता यूट्यूब अ‍ॅक्सेस करता येणार नाही. अशा यूजर्सना कंपनी तीन वेळा वॉर्निंग देईल. त्यानंतरही जर कोणी अ‍ॅड-ब्लॉकर वापरत असेल तर अशा व्यक्तीचे अकाउंट ब्लॉक करण्यात येईल. यूट्यूब कंपनी जागतिक स्तरावर यासाठी मोहीम राबवणार आहे.

असा मिळेल इशारा

जर कोणी अ‍ॅड-ब्लॉकर वापरुन यूट्यूब व्हिडिओ पाहत असेल, तर कंपनी त्या व्यक्तीला स्क्रीनवर एक फ्लॅश मेसेज दाखवेल. तुम्ही कंपनीच्या पॉलिसींचं उल्लंघन करत आहात असं यामध्ये लिहिलेलं असेल. यासोबतच जाहिराती सुरू करा किंवा यूट्यूब प्रीमियम घ्या असे पर्यायही यामध्ये दिलेले असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Gold Investment: आज 50 हजारांचं सोनं घेतलं तर 10 वर्षांनी किती लाखांचं होईल? जाणून घ्या गणित

खंजिरीचे बोल! राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कथा आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका, तुम्ही ओळखलंत?

Grahana Yoga 2026 : ग्रहण योग आणि अमावस्येचा भयानक संयोग; कोणत्या राशींवर होणार वाईट परिणाम? सूर्य-केतूच्या युतीनं 'या' लोकांचं वाढू शकतं टेन्शन

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT