Zectron Electric Bike sakal
विज्ञान-तंत्र

सिंगल चार्जमध्ये 241km धावणारी Zectron Electric Bike लॉन्च; जाणून घ्या फिचर्स

Zectron ने नवीन इलेक्ट्रिक बाईक लाँच केली आहे. या इलेक्ट्रिक सायकलमध्ये फोल्डिंग फ्रेम डिझाइन उपलब्ध आहे.

सकाळ डिजिटल टीम

Zectron ने नवीन इलेक्ट्रिक बाईक लाँच केली आहे. या इलेक्ट्रिक सायकलमध्ये फोल्डिंग फ्रेम डिझाइन उपलब्ध आहे. कंपनीने क्राउड फंडिंग कॅम्पेनमध्ये इंडीगोगोच्या माध्यमातून हे लॉन्च केले आहे. या बाईकचा अमेरिकेमध्ये सर्वाधिक वेग 32 किमी प्रतितास आहे. तर युरोपमध्ये ते २५ किमी प्रतितास आहे. कंपनीच्या मते, एका चार्जवर ही इलेक्ट्रिक सायकल एक आठवडा टिकू शकते. त्याची उर्वरित किंमत आणि वैशिष्ट्ये खाली दिली आहेत.

हेही वाचा : एका सुफी विचारवंताच्या नजरेतले हिंदुत्व

Zectron इलेक्ट्रिक बाइकची किंमत

या इलेक्ट्रिक सायकलची किंमत 1,999 डॉलर (सुमारे 1,63,000 रुपये) आहे. परंतु जे ग्राहक विक्रीच्या सुरुवातीला खरेदी करतात त्यांना ते फक्त $899 (सुमारे 73 हजार रुपये) मध्ये उपलब्ध करून दिली जाऊ शकते. कंपनीचे म्हणणे आहे की, ही बाइक मर्यादित युनिटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर सयकल ऑर्डर केली जाऊ शकते.

Zectron इलेक्ट्रिक बाईकची वैशिष्ट्ये

या इलेक्ट्रिक बाईकच्या यूएस वेरिएंटबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये 350W मोटर देण्यात आली आहे. जी ताशी 32 किलोमीटरचा टॉप स्पीड देऊ शकते. तर युरोपमध्ये बाईकच्या आत 250W मोटर बसवण्यात आली आहे. ती २५ किमी प्रतितास इतका टॉप स्पीड देऊ शकते. म्हणजेच बाईकला परिसरातील सरकारी नियमांनुसार टॉप स्पीड देण्यात आला आहे. बाईकच्या रेंजबद्दल बोलायचे झाले तर त्याची रेंज 241 किमी आहे.

याशिवाय बाइकमध्ये 3.9 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये बॅटरी चार्ज लेव्हल, स्पीड आदींची आकडेवारी पाहता येईल. यासोबतच बाईकमध्ये डायनॅमिक रियर सस्पेंशनही देण्यात आले आहे. यामध्ये अँटी-शॉक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये GPS ट्रॅकिंग बसवण्यात आली आहे. तुम्ही स्मार्टफोन अॅपच्या मदतीनेही ट्रॅक ठेवता येतो. यामध्ये फोल्डिंग फ्रेम आहे म्हणजे बाइक फोल्ड करून कमी जागेत ठेवता येते. ही सायकल एरोस्पेस ग्रेड मॅग्नेशियम मिश्र धातुपासून बनवली आहे. बाईकचे वजन फक्त 25 किलो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Latest Maharashtra News Updates : ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जोडो मारो आंदोलन

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT