Eric Yuan: AI Clones to Transform Online Meeting Culture esakal
विज्ञान-तंत्र

Zoom CEO on AI : तासाचं काम मिनिटात,एआय अटेंड करणार Zoom मिटिंग; कंपनीच्या सीईओच्या वक्तव्याने सगळे हैराण

AI Zoom Meetings : भविष्यात लोकांचा वेळ वाचणार,करू शकणार एका वेळेत विविध कामे

सकाळ डिजिटल टीम

Zoom : आजकालच्या वेगवान जगात वेळ ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. खासकरून ऑफिसच्या कामांमध्ये तर वेळेचं महत्त्व अगदी प्रचंड आहे. पण झूमच्या सीईओ एरिक युआन यांनी नुकत्याच केलेल्या विधानाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, भविष्यात आपल्याला अगदी ऑनलाईन मीटिंगनासुद्धा वेळ द्यावी लागणार नाही.

युआन यांचं असं मत आहे की, सध्याच्या ऑनलाईन मीटिंग खूप वेळ घेऊन जातात. त्यामुळे येत्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ची जबरदस्त वाढ होईल आणि हीच AI आपल्यासाठी ऑनलाईन मीटिंगसारखी कामे करेल. त्यांनी या संकल्पनेला 'एआय क्लोन' असं नाव दिलं आहे.

तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? तर युआन यांचं म्हणणं आहे की, भविष्यात प्रत्येकासाठी वेगळे एआय मॉडेल तयार केलं जाईल. हे मॉडेल त्या व्यक्तीच्या डाटावर आणि कामाच्या पद्धतीवर आधारित असेल. त्यामुळे हे एआय क्लोन (AI Clone)अगदी त्या व्यक्तीसारखंच वागतील आणि निर्णय घेऊ शकतील. सोप्या शब्दात सांगायचं तर, आपल्या जागी एआय क्लोन्स ऑनलाईन मीटिंगना हजर राहतील, ईमेलला उत्तर देतील आणि अगदी काही निर्णयसुद्धा घेऊ शकतील.

याचा फायदा काय?

यामुळे लोकांचा वेळ वाचणार आहे. त्यामुळे ते जास्त महत्वाची आणि क्रिएटिव्ह कामे करण्यावर लक्ष केंद्रित करू शकतील. इतकंच नाही तर एआयमुळे कदाचित आठवड्यातील कामाचे तास कमी होऊन चार किंवा तीन दिवसातही पूर्ण काम होईल, असं युआन यांना वाटतं.

हे ऐकायला थोडं विचित्र वाटतंय ना? पण तंत्रज्ञान वेगानं प्रगती करत आहे. काही वर्षांपूर्वी व्हिडिओ कॉलिंगसुद्धा कल्पना वाटत होती. पण आज झूमसारख्या अनेक अॅप्समुळे दूर असलेल्या लोकांशीही आपण सहज संवाद साधू शकतो. त्यामुळे युआन यांचं हे विधान खरं ठरलं तर भविष्यातलं ऑफिसचं वातावरण कसं असेल याची उत्सुकता नक्कीच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Tariff: ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकेलाच बसला! 446 कंपन्या दिवाळखोर; बेरोजगारीही वाढली

Asia Cup 2025: ना संजू, ना रिंकू... अजिंक्य राहणेनी निवडली भारताची प्लेइंग इलेव्हन, या संघाला रोखणे अवघड

Sangli News:'मराठा आरक्षणासंदर्भातील मुंबईत २९ ऑगस्टच्या मोर्चासाठी सांगलीत जिल्हाभर बैठका; मोठ्या संख्येने मुंबईला जाण्‍याचा निर्धार

Sangli News: ‘उरुण-ईश्वरपूर’ नामांतरप्रश्‍नी उपोषण स्थगित; सर्वपक्षीय राजकीय नेत्यांकडून घोषणा, बदलाची मागणी

Akola Traffic: अकोल्यात ७७ बेशिस्त ऑटोरिक्षांवर धडक कारवाई; ९०,५०० रुपये दंड वसुल, १७ ऑटो डिटेन

SCROLL FOR NEXT