कोकण

हमारा शौचालय, हमारा भविष्य” ही विशेष मोहिम

CD

जिल्ह्यात ‘हमारा शौचालय, हमारा भविष्य’ मोहीम
स्वच्छ भारत मिशन; शौचालयांची होणार तपासणी, दुरुस्ती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ ः केंद्र व राज्यशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) विभागामार्फत हमारा शौचालय, हमारा भविष्य ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम मानवी हक्क दिनापर्यंत १० डिसेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले.
स्वच्छ भारत मिशनविषयी रानडे यांनी माहिती दिली. शौचालये ही केवळ सोयीची नव्हे तर आरोग्य, प्रतिष्ठा व सुरक्षिततेची हमी देणारी मूलभूत गरज आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावातील वैयक्तिक शौचालये व सामुदायिक शौचालयांची तपासणी, दुरुस्ती, देखभाल व सुशोभीकरणावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. अपूर्ण किंवा दुरुस्तीची गरज असलेली सार्वजनिक शौचालये यांची नोंद घेऊन त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ग्रामस्थांना त्यांच्या वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची रंगरंगोटी, सुशोभीकरण आणि नियमित देखभाल करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.

उत्कृष्ट शौचालय पुरस्कार
२१ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत गावागावांत मोहिमेचे विविध उपक्रम राबवण्यात येतील. उत्तम देखभाल व सुशोभीकरण करणाऱ्या वैयक्तिक व सामुदायिक शौचालये यांना अंतिम टप्प्यात विशेष गौरव करण्यात येणार आहे. १० डिसेंबर रोजी मोहिमेचा समारोप करून उत्कृष्ट शौचालय पुरस्कार जाहीर केले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

MSRTC Recruitment : खूशखबर! एसटी महामंडळात 17 हजार पदांची 'महाभरती'; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली मोठी अपडेट

LPG संपला, चपाती-भाकऱ्या भाजायच्या कशा? रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणात कपात; रुग्णांचे हाल

Navale Bridge Accident : नवले पुलावर पुन्हा अपघात ! भरधाव कार डिव्हायडरला धडकून उलटली

BCCI Awards: राहुल द्रविडला जीवनगौरव, तर टी२० संघातून वगळलेल्या खेळाडूला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार

SCROLL FOR NEXT