कोकण

राष्ट्रवादी महायुतीत नसल्याचा युतीला फायदा कि तोटा

CD

महायुतीतील विस्कळीतपणा कोणाच्या पथ्थ्यावर
राष्ट्रवादी अखेरच्या क्षणी बाजूला; समन्वयासाठी प्रयत्न सुरू
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २७ ः महायुती होणार म्हणून राष्ट्रवादीला शेवटपर्यंत आशेवर ठेवण्यात आले; मात्र अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीला (अजित पवार गट) बाजूला करण्यात आले. त्यामुळे चिपळुणात महायुती न झाल्याचा फायदा युतीला होणार का? यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.
येथील पालिकेवर प्रशासक असताना राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी चिपळूण शहरातील विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयाचा विकासनिधी आणला. त्यामुळे पालिका निवडणुकीत हक्काने महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा, असे सांगण्यासाठी आमदार शेखर निकम यांच्या रूपाने महायुतीकडे सर्वसमावेशक असा सत्ताधारी नेता होता; पण त्यांच्या राष्ट्रवादीला महायुतीत स्थानच मिळाले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी उपेक्षितच राहिली त्याशिवाय महायुतीच्या माध्यमातून निकमांनी केलेल्या विकासकामांचा लाभ युतीच्या उमेदवाराला मिळणे अशक्य असल्याचे दिसते. येथील पालिकेत चार वर्षांपूर्वी प्रशासक विराजमान झाले. पूर्वीचे सत्ताधारी आणि विरोधक आता एकमेकांचे उणेदुणे काढत आहेत. या भांडणात शहरांमध्ये मतदारांचे प्रश्न हरवल्याचे चित्र आहे. यापूर्वी सत्तेवर असलेली मंडळी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासाचे दावे करत आहेत. प्रशासकीय राजवट असताना झालेला विकास महायुती सरकारनेच केल्याचा दावा केला जात आहे. तेव्हा विरोधी पक्षाकडून तो विकास महायुतीने नव्हे तर राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी केला. आता ते तुमच्याबरोबर महायुतीमध्ये दिसत नाहीत. पालिका निवडणुकीत युतीचा उमेदवार आहे, असे स्पष्टीकरण विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना दिले जात आहे तसेच विरोधी बाकावर बसलेल्या गटाने सत्ताधाऱ्यांच्या दाव्यांना थेट आव्हान देत, ‘कुठेय विकास?,’ असा थेट सवाल उपस्थित केला आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचे दिसत आहे.
मतदारांसाठी रस्ते, वाहतूककोंडीवर उपाय, पाणी आणि स्वच्छता हे प्रश्न सुटणे आवश्यक आहेत. ग्रॅव्हिटीची पाणीयोजना राबवूनही नागरिकांना आजही नियमित आणि पुरेसे पाणी मिळत नाही. अनेकवेळा मचूळ पाणीपुरवठा होतो, हे प्रश्न गंभीर आहेत. महापूर, रेडलाईन, ब्ल्यु लाईन, सिंग्नल यंत्रणा, भुयारी गटार योजना, महामार्गामुळे निर्माण झालेले प्रश्न कायमच आहेत. नगराध्यक्षपदाचा प्रचार पक्षावर नसून, व्यक्तिवादी होत आहे. नगरसेवकपदासाठी एका प्रभागात अनेकजण इच्छुक असल्यामुळे गुंता वाढला आहे. प्राप्त परिस्थिती लक्षात घेऊन युतीमधील नेतमंडळीही राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांचा आशीर्वाद घेण्याची वक्तव्ये करू लागलेली आहेत.
---
कोट
चिपळूण शहरविकासासाठी आमदार शेखर निकम यांनी मोठे योगदान दिले होते. पालिका निवडणुकीत महायुती झाली तर त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला अधिक झाला असता. नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेतून माघार घेण्यात आली होती. नगरसेवकपदाच्या जागा सन्मानाने मिळाल्या असत्या तरीही समाधानी होतो.

- मिलिंद कापडी, शहरप्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

BCCI ला सचिन तेंडुलकर नकोसा झालेला? निवृत्तीबाबत विचारणा केलेली; मास्टर ब्लास्टरला बसलेला धक्का, १३ वर्षानंतर सत्य समोर...

MSRTC Recruitment : खूशखबर! एसटी महामंडळात 17 हजार पदांची 'महाभरती'; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली मोठी अपडेट

LPG संपला, चपाती-भाकऱ्या भाजायच्या कशा? रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणात कपात; रुग्णांचे हाल

Navale Bridge Accident : नवले पुलावर पुन्हा अपघात ! भरधाव कार डिव्हायडरला धडकून उलटली

SCROLL FOR NEXT