ranji sakal
क्रीडा

Ranji Trophy : महाराष्ट्र-हरियाना लढत अनिर्णित ; दहा फलंदाज बाद करणारा प्रदीप दाढे सामनावीर

महाराष्ट्र-हरियाना यांच्यामधील रणजी क्रिकेट करंडकातील ‘अ’ गटातील लढत अखेर अनिर्णित (ड्रॉ) राहिली. अंधुक प्रकाशामुळे या लढतीच्या अखेरच्या दिवशी फक्त १८ षटकांचाच खेळ होऊ शकला.

सकाळ वृत्तसेवा

रोहतक : महाराष्ट्र-हरियाना यांच्यामधील रणजी क्रिकेट करंडकातील ‘अ’ गटातील लढत अखेर अनिर्णित (ड्रॉ) राहिली. अंधुक प्रकाशामुळे या लढतीच्या अखेरच्या दिवशी फक्त १८ षटकांचाच खेळ होऊ शकला. तसेच दोन्ही डावांत मिळून दहा फलंदाज बाद करणारा महाराष्ट्राचा प्रदीप दाढे सामनावीर ठरला.

हरियानाने पहिल्या डावात १९५ धावा फटकावल्यानंतर महाराष्ट्राला पहिल्या डावात १९४ धावा करता आल्या. त्यामुळे हरियानाला पहिल्या डावात एक धावेची आघाडी घेता आली. याचा फायदा हरियानाला लढत अनिर्णित राहिल्यानंतर झाला. त्यांना तीन गुण कमावता आले. महाराष्ट्राला एका गुणावरच समाधान मानावे लागले.

हरियानाच्या संघाने तिसऱ्या दिवसअखेरीस ६ बाद २११ धावा केल्या होत्या, पण चौथ्या दिवशी अंधुक प्रकाशामुळे जास्त खेळ होऊ शकला नाही. महाराष्ट्रासमोर २१३ धावांचे आव्हान उभे ठाकले. महाराष्ट्राच्या संघाने १८ षटकांच्या खेळात २ बाद ९६ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक : हरियाना- पहिला डाव सर्व बाद १९५ धावा आणि दुसरा डाव ६ बाद २११ धावा, डाव घोषित वि. महाराष्ट्र - पहिला डाव सर्व बाद १९४ धावा आणि दुसरा डाव २ बाद ९६ धावा (पवन शाह २८, अंकित बावणे नाबाद ५०, हर्षल पटेल २/३५).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

MSRTC Recruitment : खूशखबर! एसटी महामंडळात 17 हजार पदांची 'महाभरती'; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली मोठी अपडेट

LPG संपला, चपाती-भाकऱ्या भाजायच्या कशा? रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणात कपात; रुग्णांचे हाल

Navale Bridge Accident : नवले पुलावर पुन्हा अपघात ! भरधाव कार डिव्हायडरला धडकून उलटली

BCCI Awards: राहुल द्रविडला जीवनगौरव, तर टी२० संघातून वगळलेल्या खेळाडूला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार

SCROLL FOR NEXT