Collector Jitendra Papalkar appeal Protect yourself from heat stroke hingoli sakal
मराठवाडा

Heat Stroke : उष्माघातापासून असा करा बचाव!

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी व स्वत:चा बचाव करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टी.व्ही. किंवा वर्तमान पत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा. तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत- जास्त पाणी प्यावे. हलकी, पातळ व सचिद्र सुती कपडे वापरावेत.

बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, बूट व चपलांचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. जर, आपण उन्हात काम करीत असाल तर हॅट किंवा छत्रीचा वापर करावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा वापर नियमित करावा.

अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावी व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना छावणीत ठेवावे. त्यांना पुरेसे पाणी पिण्यास द्यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा. पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे.

कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांनी पहाटेच्या वेळी जास्तीत- जास्त कामाचा निपटारा करावा. गरोदर महिला, कामगार व आजारी कामगारांनी अधिकची काळजी घ्यावी.

काय करावे अन् काय टाळावे...

लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी बारा ते तीन या कालावधीत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत असलेले चहा, कॉफी, मद्य व कार्बोनेटेड थंड पेय यांचा वापर टाळावा. शिळे अन्न खाऊ नये आणि उच्च प्रथिने असलेले अन्न टाळावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

BCCI ला सचिन तेंडुलकर नकोसा झालेला? निवृत्तीबाबत विचारणा केलेली; मास्टर ब्लास्टरला बसलेला धक्का, १३ वर्षानंतर सत्य समोर...

MSRTC Recruitment : खूशखबर! एसटी महामंडळात 17 हजार पदांची 'महाभरती'; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली मोठी अपडेट

LPG संपला, चपाती-भाकऱ्या भाजायच्या कशा? रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणात कपात; रुग्णांचे हाल

Navale Bridge Accident : नवले पुलावर पुन्हा अपघात ! भरधाव कार डिव्हायडरला धडकून उलटली

SCROLL FOR NEXT