मुंबई

तालुक्‍यातील रेशनिंगच्या गैरव्‍यवहाराबाबत तहसीलदारांना निवेदन

CD

तालुक्‍यातील रेशनिंगच्या गैरव्‍यवहाराबाबत तहसीलदारांना निवेदन
पोलादपूर, ता. २७ (बातमीदार) : तालुक्यातील काही रेशनिंग दुकानदारांकडून सुरू असलेल्या कथित गैरव्यवहारांबाबत आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेच्या वतीने नुकतेच पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. याप्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास १२ जानेवारी रोजी तहसील कार्यालयाबाहेर उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
रेशन हे नागरिकांचे मूलभूत हक्क असून शासनाच्या नियमानुसार प्रत्येक लाभार्थ्याला संपूर्ण व वेळेवर धान्य मिळणे आवश्यक आहे. मात्र काही रेशन दुकानदारांकडून नियमांचे उल्लंघन करून धान्य कमी देणे, अनियमित वितरण करणे तसेच लाभार्थ्यांची फसवणूक केल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यास सामान्य नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास डळमळीत होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेचे संस्थापक राज पार्टे यांनी सांगितले की, जर यापुढेही संबंधित रेशन दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात आली नाही, तर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

MSRTC Recruitment : खूशखबर! एसटी महामंडळात 17 हजार पदांची 'महाभरती'; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली मोठी अपडेट

LPG संपला, चपाती-भाकऱ्या भाजायच्या कशा? रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणात कपात; रुग्णांचे हाल

Navale Bridge Accident : नवले पुलावर पुन्हा अपघात ! भरधाव कार डिव्हायडरला धडकून उलटली

BCCI Awards: राहुल द्रविडला जीवनगौरव, तर टी२० संघातून वगळलेल्या खेळाडूला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार

SCROLL FOR NEXT