पुणे, ता. १५ : ‘‘कामांची गुणवत्ता चांगली ठेवून ती डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करा. डिसेंबरमध्ये पूर्ण झालेल्या कामांच्या गुणवत्तेची तपासणी जानेवारी, फेब्रुवारी व मार्च २०२६ या तीन महिन्यांत करायची आहे,’’ असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०२४-२५ या वर्षाच्या कामकाजाचा आणि २०२५-२६ या वर्षांत करण्यात येणाऱ्या कामकाजाबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आढावा घेतला. त्यावेळी बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर उपस्थित होते.
डुडी म्हणाले, ‘‘मागील आर्थिक वर्षात सर्व यंत्रणांनी नियोजनबद्ध काम केल्यामुळे शंभर टक्के खर्चाचे उद्दिष्ट साध्य झाले. २०२४ - २५ या आर्थिक वर्षातील सुरू असलेली कामे ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण करायची असून, २०२५ - २६ या आर्थिक वर्षातील कामांसाठी ३१ मे २०२५ पर्यंत सर्व मान्यतांची प्रक्रिया करा. ही कामे डिसेंबर २०२५ पर्यंत कामाची गुणवत्ता राखून पूर्ण केली पाहिजेत. नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत प्रत्येक विभागाने एक प्रस्ताव नियोजन विभागाला द्यावा, यात नावीन्यपूर्ण कामांचा समावेश असावा,’’ असे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.