टूरिझम

'बटरफ्लाय वॉक' चा आनंद घ्यायचाय? याठिकाणी जरूर भेट द्या

ऋषीकेश राऊत

इचलकरंजी: जांभळी (ता.शिरोळ,जि.कोल्हापूर ) येथे सप्टेंबर बिग बटरफ्लाय मंथ निमित्त ऑक्सिजन पार्कवर 'बटरफ्लाय वॉक' चे आयोजन करण्यात आले. तीन तास झालेल्या वॉक मध्ये तब्बल 28 प्रकारच्या फुलपाखरांची ओळख झाली. फुलपाखरांच्या जीवनाची जवळून ओळख फुलपाखरू अभ्यासक डॉ.संतोष उमराणे व सर्वदमन कुलकर्णी यांनी करून दिली.जिल्ह्यात यंदा पहिल्यांदाच असा उपक्रम घेण्यात आला.भिरभिरणाऱ्या फुलपाखरांची ओळख करून घेताना सर्वजण भारावून गेले. पर्यावरण लेखिका व अभ्यासक चित्कला कुलकर्णी, डॉ.बडे कुटुंबिय यांच्या मार्गदर्शनाने बटरफ्लाय वॉक अधिक भारी ठरला.

जांभळीतील ऑक्सिजन पार्क जैवविविधतेची गोडी उत्तमपणे जोपासत आहे.आता 28 प्रकारच्या फुलपाखरांची झालेली नोंद ही जैवविविधतेला अधिक बळ देणारी ठरली आहे.पुढील काळात फुलपाखरांच्या संवर्धनासाठी गावात बटरफ्लाय गार्डनची उभारणी केली जाणार आहे. यावेळी जितेंद्र शिंदे, सलमान कुडचे, आकाश यादव, बाळकृष्ण शिंदे, विनायक भुयेकर, यासीन दानवाडे, संदीप पाटील, संदीप बिरंजे,अर्जुन मोरे,विनायक कोळी,भगतसिंग गायकवाड,स्वाती ऐनापुरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Liquor Policy: मद्य व्यवसायात मोठे बदल! पारंपरिक मद्याला सरकारी मान्यता मिळणार; सरकारने लागू केले नवे नियम

Maharashtrachi Hasyajatra: प्रेक्षकांचा आग्रह सोनी मराठीने मानला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'बाबत घेतला 'हा' मोठा निर्णय

Tragic Drowning: गोदावरीत अंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्या बहिणी व त्यांना वाचवताना चुलतीचा बुडून मृत्यू; मोहळा गावावर शोककळा

INDW vs PAKW: T20 World Cup आज रंगणार सर्वात मोठा थरार! भारत-पाकिस्तान मॅच कधी, कुठे आणि कशी पाहायची? वाचा सविस्तर

Ayodhya Ram Mandir Donation Scam: राम मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात खळबळजनक प्रकार उघड, कर्मचाऱ्याने घरात शेणाच्या ढिगाऱ्यात लपवले १० लाख रुपये

SCROLL FOR NEXT