How to avoid Mumbai traffic after long weekend:  Sakal
टूरिझम

Long Weekend Traffic Mumbai: लाँग वीकेंडनंतर मुंबईतील ट्रॅफिक टाळण्यासाठी 7 सोप्या टिप्स

How to avoid Mumbai traffic after long weekend: लाँग वीकेंडवरून माघारी येताना मुंबईतील गर्दी टाळायची असेल तर काही खास टिप्स लक्षात ठेवल्या पाहिजे. ज्यामुळे तुमचा प्रवास कंटाळवाणा होणार नाही.

पुजा बोनकिले
  1. लाँग वीकेंडनंतर मुंबईतील ट्रॅफिक टाळण्यासाठी प्रवासाची वेळ आणि मार्ग आधीच ठरवा.

  2. सार्वजनिक वाहतूक किंवा कारपूलिंगचा वापर करून गर्दी आणि खर्च कमी करा.

  3. ट्रॅफिक जॅम टाळण्यासाठी रिअल-टाइम नेव्हिगेशन अॅप्स आणि कमी गर्दीचे मार्ग निवडा.

How to avoid Mumbai traffic after long weekend: अनेक लोकांना फिरायला जाण्याची आवड असते आणि यासाठी सुट्ट्यांची वाट पाहत असतात. अशातच यंदा १५ ऑगस्टमुळे लाँग वीकेंड आला आहे. या सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याचे अनेकांनी नियोजन केले आहे.

तसेच पाऊस पडून गेल्याने वातावरण देखील निसर्गरम्य झाले आहे. यामुळे अनेकजण फिरायला बाहेर पडतात. यामुळे पर्यटन स्थळांवर गर्दी निर्माण होऊ शकते. अशात तुम्हाला लाँग वीकेंडवरून माघारी येताना मुंबईतील गर्दी टाळायची असेल तर पुढील खास टिप्स लक्षात ठेऊ शकता. ज्यामुळे तुमचा प्रवास कंटाळवाणा होणार नाही.

पुढील खास टिप्स लक्षात ठेवा

लवकर निघा

लाँग वीकेंडवरून माघारी येताना मुंबईच्या रस्त्यावरची गर्दी टाळण्यासाठी सकाळी १० च्या आधी निघण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला गर्दी लागणार नाही आणि वेळेत घरी पोहोचाल.

वेस्टर्न एक्सप्रेस हायवे टाळा

लाँग वीकेंडवरून माघारी येताना वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मार्ग टाळा. कारण या मार्गाने सहसा रविवारी गर्दी जास्त असते. यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करावा.

सी लिंक वापरा

तुम्हाला लाँग वीकेंडवरून माघारी येताना प्रवास गर्दीमुळे कंटाळवाणा नको असेल तर वाद्रां-वरळी सी लिंक मार्ग वापरू शकता. यामुळे तुम्हाला रस्त्यावर गर्दी लागणार नाही.

संध्याकाळचा प्रवास टाळा

सहसा दुपारी ४ ते रात्री ८ च्या दरम्यान गाड्यांची अधिक गर्दी असते. यामुळे लाँग वीकेंडवरून माघारी येताना यावेळी प्रवास करणे टाळा. शक्य असेल तर सकाळी प्रवासाला सुरूवात करू शकता.

गुगल मॅप

लाँग वीकेंडवरून माघारी येताना गर्दी टाळायची असेल तर गुगल मॅपवर गर्दी पाहून पर्यायी मार्गाचा वापर करावा. तसेच मुंबई ट्रॅफिक पोलिस एक्स अकाउंटवर लक्ष ठेवावे. यामुळे तुम्हाला मुंबईतील रस्त्यांची आणि गर्दीची माहिती मिळेल.

विश्रांती घ्या

लांबच्या प्रवासात गाडी चालवताना थोडा वेळ विश्रांती घेणे गरजेचे असते. यामुळे तुम्हाला विश्रांती मिळेल तसेच थकवा कमी होईल आणि गर्दीपासून देखील सुटका मिळेल.

इतर पर्यायी मार्ग

तुम्हाला लाँग वीकेंडवरून येताना गर्दी टाळायची असेल तर ट्रेन किंवा बस यासारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करू शकता. यामुळे तुम्हाल ट्रॅफिकची चिंता राहणार नाही आणि प्रवास देखील आरामदायी होईल.

लाँग वीकेंडनंतर मुंबईतील ट्रॅफिक कसे टाळावे?

प्रवासाची वेळ आधी ठरवा, कमी गर्दीचे मार्ग निवडा आणि रिअल-टाइम नेव्हिगेशन अॅप्स वापरा.

मुंबईत परतताना कोणत्या वाहतुकीचे पर्याय सर्वोत्तम आहेत?

मेट्रो, लोकल ट्रेन किंवा कारपूलिंगसारखे पर्याय ट्रॅफिक आणि खर्च कमी करण्यास मदत करतात.


ट्रॅफिक जॅम टाळण्यासाठी कोणती अॅप्स उपयुक्त ठरतात?

Google Maps, Waze किंवा Mappls सारखी अॅप्स रिअल-टाइम ट्रॅफिक माहिती देतात.

मुंबईत ट्रॅफिक टाळण्यासाठी सर्वोत्तम प्रवास वेळ कोणती?

पहाटे लवकर किंवा रात्री उशिरा प्रवास केल्यास गर्दी आणि ट्रॅफिक कमी होऊ शकते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ind vs SA 1st Test : टेम्बा बामुआला 'बुटका' म्हणणं भोवणार? ICC जसप्रीत बुमराहवर कारवाई करण्याची शक्यता, नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi Live News Update: जळगाव निवडणूक उत्साहात भरार! पाचव्या दिवशी १७७ अर्ज दाखल; आता उरले फक्त दोन दिवस

Navale Bridge Scam : 'इंचभरही काम नाही'! तीन वर्षांपूर्वीच्या दीर्घकालीन उपाययोजना केवळ कागदावरच, ८ जणांना जीव गमवावा लागला

Ayushman Bharat : अलर्ट! 5 लाखपर्यंतचे मोफत उपचार होतील बंद; आयुष्मान कार्ड असल्यास अजिबात करू नका 'ही' 1 चूक, मिळणार नाही कोणतीच सुविधा

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली! 15 षटकार अन् 11 चौकरांसह आशिया कपमध्ये शतकी झंझावात

SCROLL FOR NEXT