Maharashtra Travel esakal
टूरिझम

Maharashtra Travel : महाराष्ट्रातील 'ही' ठिकाणे अ‍ॅडव्हेंचरसाठी आहेत प्रसिद्ध, उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसोबत जा फिरायला

Maharashtra Travel : उन्हाळ्याच्या सुट्टीत जर तुम्हाला अ‍ॅडव्हेंचर करायचे असेल, तर महाराष्ट्रातील काही ठिकाणांना तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता.

Monika Lonkar –Kumbhar

Maharashtra Travel : मार्च महिन्याच्या सुरूवातीला किंवा अखेरीस मुलांच्या परीक्षा संपतात. त्यानंतर, मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागते. मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागली की, पालक फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करतात आणि फिरायला जायला तर सगळ्यांनाच आवडते.

मात्र, जर तुम्हाला नेहमीची ठिकाणे फिरण्यापेक्षा काही वेगळ करायचं असेल, अ‍ॅडव्हेंचर करायचे असेल तर महाराष्ट्रातील काही ठिकाणांना तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता. या ठिकाणांना भेट दिल्यावर तुम्ही अ‍ॅडव्हेंचर ही करू शकता आणि फिरण्याचा मनसोक्त आनंद ही घेऊ शकता. मुलांना देखील या निमित्ताने काही वेगळ पहायला आणि अनुभवायला मिळेल. चला तर मग जाणन घेऊयात अ‍ॅडव्हेंचरसाठी प्रसिद्ध असणाऱ्या महाराष्ट्रातील या ठिकाणांबद्दल.

कोलाड

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात स्थित असलेले हे एक सुंदर गाव आहे. कोलाड या गावाला मनमोहक निसर्ग लाभला आहे. शिवाय, येथील स्वच्छ कुंडलिका नदी पाहण्यासाठी देखील लोक गर्दी करतात. सौंदर्यासोबतच कोलाड हे गाव तिथल्या साहसी खेळांसाठी थोडक्यात अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्साठी देखील प्रसिद्ध आहे.

व्हाईट वॉटर राफ्टिंगसाठी हे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. रिव्हर राफ्टिंगचे माहेरघर म्हणून ही या कोलाडची खास ओळख आहे. कोलाड गावातील कुंडलिका नदीमध्ये दररोज असंख्य पर्यटक रिव्हर राफ्टिंगसाठी येतात. या सोबतच इथे विविध प्रकारच्या वॉटरस्पोर्ट्सचा ही तुम्ही आनंद घेऊ शकता. आम्हाला खात्री आहे तुम्हाला येथील निसर्गाच्या सानिध्यात निवांत वेळ घालवायला नक्कीच आवडेल.

ताडोबा राष्ट्रीय उद्यान

वन्यजीवांसाठी प्रसिद्ध असलेले ताडोबा राष्ट्रीय उद्यान केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी देश-विदेशातील पर्यटक दरवर्षी भेट देतात. महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी हा एक नैसर्गिक वारसा खजिना मानला जातो. ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिह्यात स्थित आहे. जंगल सफारीसाठी हे उद्यान प्रसिद्ध आहे.

जर तुम्हाला या उद्यानात मुलांसोबत जंगल सफारीचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच भेट देऊ शकता. या जंगलात तुम्हाला वाघ, बिबट्या, तरस, वनगाय, हरीण तसेच, इतर वन्यजीव जवळून पाहता येतील. विशेष म्हणजे अनेक दुर्मिळ वनस्पतींच्या प्रजाती देखील तुम्हाला येथे पहायला मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

SCROLL FOR NEXT