anant radhika wedding Ambani Children Isha Anant Akash Shloka Mehta Favourite Travel Destination know all information 
टूरिझम

Anant Radhika wedding: अनंत राधिका हनिमूनला कुठे जाणार? जाणून घ्या मुकेश अंबानींच्या तिन्ही मुलांची आवडती डेस्टिनेशन

अनंत राधिकाचं काल धुमधडाक्यात लग्न पार पडलं. या लग्नसोहळ्याला अनेक दिग्गज सेलेब्स या लग्नाचे साक्षीदार ठरले. पण सध्या चर्चा सुरु झालीय ती म्हणजे अनंत राधिकाच्या हनिमुनची.

सकाळ डिजिटल टीम

अनंत राधिकाचं काल धुमधडाक्यात लग्न पार पडलं. या लग्नसोहळ्याला अनेक दिग्गज सेलेब्स या लग्नाचे साक्षीदार ठरले. पण सध्या चर्चा सुरु झालीय ती म्हणजे अनंत राधिकाच्या हनिमुनची. लग्नाचा इतका शाही थाट पाहून त्यांच्या चाहत्यांना दोघांचे हनिमुनचे ठिकाण नेमंक कोणत असेल? अशा प्रश्न उपस्थित झाला आहे. पण तुम्हाला माहितीय का, मुकेश अंबानी यांच्या तिन्ही मुलांच्या ठिकाणांच्या चॉईसदेखील तितक्याच खास आहेत. तिघांनाही फिरायाल खुप आवडतं. तर आज आपण जाणून घेऊयात त्यांच्या आवडत्या ठिकाणाबद्दल.

अनंत अंबानींचे प्राण्यांवर विेशेष प्रेम आहे. त्यामुळे...

अनंत अंबानी यांना वन्यजीव आवडतात. लहानपणापासूनच त्यांना वन्यजीवांच्या ठिकाणांना भेट द्यायला आवडते. एका मीडिया रिपोर्टनुसार, त्यांना रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये वेळ घालवायला आवडते. रणथंबोर राष्ट्रीय उद्यान सवाई माधोपूर शहरापासून सुमारे 13.5 किलोमीटर अंतरावर आहे.

तसेच, क्रुगर नॅशनल पार्कवर त्यांच विशेष प्रेम आहे. हे पार्क साऊथ आफ्रिकमध्ये आहे. या पार्कमध्ये सिंह, हत्ती, म्हैस, बिबट्या आणि गेंडा सोबतच जिराफ, झेब्रा, हिप्पोपोटॅमस आणि मगर यांसारख्या इतर अनेक प्रजातींचा समावेश आहे.

आकाश अंबानींना लंडन फिरायला आवडते

गेल्या वर्षी 10 जुलै 2023 रोजी मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा आकाश अंबानी लंडनच्या रस्त्यावर दिसले होते. येथे दोघेही कॅज्युअल कपड्यांमध्ये दिसले. या क्षणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

ईशा अंबानीचे इटलीवर खास प्रेम

जर तुम्ही युरोपला जाण्याचा विचार करत असाल तर इटलीतील लेक कोमोला नक्की भेट द्या. हे असे ठिकाण आहे ज्याचे हवामान स्वतःच पर्यटकांना आकर्षित करते. विशेष म्हणजे अंबानी कुटुंबाची लाडकी ईशा अंबानीलाही इटली आवडते.

ईशा अंबानीने आपल्या एंगेजमेंटसाठी ही सुंदर जागा निवडली होती, इथेच तिची एंगेजमेंट आनंद पिरामलसोबत झाली होती.

मोठी सून आहे या डेस्टिनेशनची चाहती

अंबानी कुटुंबाची मोठी सून श्लोका मेहताही यामध्ये मागे नाही. तिलाही फिरायला खुप आवडते. श्लोका मेहता हिला सुट्टीचा आनंद स्वित्झर्लंडला लुटायला आवडतो. श्लोकाचे आवडते व्हेकेशन डेस्टिनेशन सेंट मॉरिट्झ, स्वित्झर्लंड आहे. आकाश अंबानी-श्लोका मेहता यांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन सेंट मॉरिट्झमध्येच झाले. अनेक चित्रपटांचे शूटिंगही येथे झाले आहे.

जर तुम्ही कधी स्वित्झर्लंडला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या यादीत स्वित्झर्लंड सेंट मॉरिट्झला नक्की ठेवा.

अंबानी कुटुंबाला एकत्र फिरायला आवडते

मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि त्यांची मुले त्यांच्या अल्ट्रा-लक्झरी जीवनशैलीसाठी ओळखली जातात. मात्र, अंबानी कुटुंबाला एकत्र प्रवास करायला आवडते. त्याची पहिली पसंती स्विस आल्प्स आहे.

स्वित्झर्लंड हा एक पर्वतीय मध्य युरोपीय देश आहे, जो अनेक तलाव, गावे आणि आल्प्सच्या उंच पर्वतांनी वेढलेला आहे. स्विस आल्प्स पर्वत रांगेने स्वित्झर्लंडचा बहुतांश भाग व्यापला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT