Valdevi-Dam 
टूरिझम

भटकंती : निसर्गरम्य वालदेवी धरण

पंकज झरेकर

उन्हाळा सुरू होतोय. पूर्ण दिवसभराची भटकंती हळूहळू कमी होत जाईल. नाशिक शहराला लागून असलेली जागा आज बघूयात. ती आहे वालदेवी धरण आणि परिसर. नाशिक शहरापासून अगदी जवळ, म्हणजे फक्त २० किलोमीटरवर हे वालदेवी धरण आहे. मुंबईच्या दिशेने महामार्गाने निघालात आणि विल्होळी गाव मागे सोडले, की उजव्या हाताला एक फाटा आत जातो. त्या लहानशा रस्त्याने आतमध्ये साधारण चार किलोमीटरवर डाव्या हाताला या धरणाचे अस्तित्व जाणवेल.

अगदी धरणाच्या भिंतीपासून दोनेकशे मीटरवर गाडी लावता येते. गाडी लावून फेरफटका मारायला बाहेर पडलात की स्वच्छ आणि शीतल वाऱ्याने उन्हाळ्याचा शिणवटा कुठल्याकुठे पळून जाईल. धरणाच्या पार्श्‍वभूमीवर सह्याद्रीची रांग आणि त्याचे सुळके दिसतात. त्यात घारगड किल्ला (गडगडा), अंबोली डोंगर, त्याच्या पाठीमागे अंजनेरी किल्ला आणि डांग्या सुळका अशी रांग आहे. 

गाडी लावून आकसलेल्या जलाशयाच्या सपाटीवरून हवा खात पायी रपेट करायची. क्षितिजापल्याड डोंगराच्या आड अस्ताला जाणाऱ्या नारायणाला निरोप देत असताना आकाशातल्या बगळ्यांच्या माळा, काठावरल्या दगडांवर ध्यानस्थ बसलेल्या बगळ्यांच्या पांढऱ्या खाणाखुणा पाहायच्या. मुलांना मातीत खेळायला सोडायचे. कुटुंबीयांसोबत सुखाच्या चार गोष्टी करायच्या. वालदेवी धरणाच्या काठाशी नुसते निवांत बसलात तरी हे सगळे साध्य होते. सायंकाळी धरणाच्या अल्याडपल्याड थोडीफार घरे आणि शेती आहे, तिथली हालचाल दुरून पाहून ग्रामीण जीवनाचा हेवा वाटू लागतो. अशा वेळी कधीतरी ट्रायपॉडवर कॅमेरा सेट करून एखादाच फोटो काढायचा. अंधार पडता समाधानी मनाने घरची वाट धरायची.

उन्हाळ्यात फॅमिलीला खूश ठेवूनही भटकंती करायची, तर या अशा आपल्या आसपासच्या जागा शोधा. वीकएण्डच्या वामकुक्षीनंतर गुगल मॅप झूमइन-झूमआउट करून गर्दीच्या रस्त्यांपासून दूर असाच एखादा निवांत तलाव हेरायचा. उन्हाळ्याच्या किचाटात निवांत आणि शीतल वारा खाऊ घालणारी संध्याकाळ घालवण्यासाठी!
जाण्यासाठीचा मार्ग : नाशिक-विल्होळी-पिंपळद-वालदेवी

सूचना - सह्याद्रीत कचरा करू नका. पक्ष्यांना आणि स्थानिक जैवविविधतेला हानी होईल असे वर्तन करू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : : खरीप हंगामात डीएपी या रासायनिक खताची टंचाई; पावसामुळे मशागतीची कामे ठप्प

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT