टूरिझम

बामणघळ : निसर्गाचा अद्भुत चमत्कार

पृथीवरचा स्वर्ग म्हणजे निसर्गरम्य असे सुंदर कोकण

तेजस भागवत

बामणघळ : अथांग पसरलेला समुद्र ,नारळी-पोफळीच्या बागा आणि आंबा, काजू आणि म्हणजे कोकणची ओळखच. अशा या कोकणाला राजकीय,आर्थिक,सांस्कृतिक , ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा लाभला आहे. निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.आहे. कोकण म्हणजे जणू स्वर्गच आहे.कोकण प्रदेशातील सर्वांत मोठा असलेला रत्नागिरी जिल्हा आणि या जिल्ह्याला सगळ्यांत जास्त समुद्रकिनारा लाभला आहे.आज आपण या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील हेदवी येथील बामणघळ या पर्यटन स्थळाविषयी जाणून घेणार आहोत.

बामणघळ हे एक प्रकारची घळ असून, अतिशय खोल आणि अरुंद अशा प्रकारची हि घळ आहे. किनार्‍यावरून चालत गेल्यावर उमा महेश्वर मंदिराजवळ समुद्राजवळील खडकात मोठी भेगा पडलेली दिसतात .समुद्रात भरतीच्या वेळी तुम्ही तिथे गेलात, तर खडकांतील मोठ्या भेगांमधून पाण्याचा प्रचंड प्रवाह डोंगरावर आदळत असतो. हेदवीचे बामणघळ ही खऱ्या अर्थाने निसर्गाचा मंत्रमुग्ध करणारा आविष्कार आहे.

वर्षानुवर्षे, खडकांवर आदळणाऱ्या लाटांमुळे 1 मीटर रुंद आणि 10 मीटर लांब खडकांना भेगा पडल्या आहेत. लाटा खडकांवर जोरदार आदळतात आणि 3-4 मीटर खोल दरी भरून 10-15 मीटर उंच पाण्याचा स्तंभ तयार करतात.समुद्राच्या लाटांचा प्रचंड जोरात दगडांवर आपटून उंचच उंच तुषार उडत असतात. ओहोटी आणि पाण्याच्या प्रवाहाच्या अविस्मरणीय सौंदर्यामुळे या ठिकाणी अवश्य भेट द्यायला हवी. निसर्गाचा चमत्कार इथे घडताना दिसून येतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आजचा भाव किती? जाणून घ्या CNGचे दरही

अरुणा इराणी यांच्यावर दु:खाचा डोंगर; पती कुकू कोहली यांचं 77व्या वर्षी निधन

Kolhapur Konkan New Road: कोल्हापुरातून कोकणात जाण्यासाठी आणखी एक घाटमार्ग, घोटगे-सोनवडे मार्गासाठी केंद्राची मंजुरी; कुडाळ-कोल्हापूर अंतर होणार कमी

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

SCROLL FOR NEXT