New Year 2024 esakal
टूरिझम

New Year 2024 : ख्रिसमस आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी भारतातील ‘या’ समुद्रकिनाऱ्यांची करा निवड

अनेक जण ख्रिसमस आणि नव्या वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी फिरायला जाण्याचा प्लॅन करतात.

Monika Lonkar –Kumbhar

New Year 2024 : अवघ्या काही दिवसांवर ख्रिसमस येऊन ठेपला आहे. त्यामुळे, सर्वत्र ख्रिसमसची लगबग होताना पहायला मिळत आहे. जिंगल बेल्स, ख्रिसमस ट्री, ख्रिसमस ट्रीच्या सजावटीच्या वस्तू आणि विविध खाद्यपदार्थांनी बाजरपेठ बहरली आहे.

ख्रिसमस साजरा केल्यानंतर सगळ्यांना वेध लागतात ते नवीन वर्षाचे. आपण आता सर्व जण २०२३ च्या अखेरच्या टप्प्यात आहोत, काही दिवसांनी आपण सर्वजण नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत. अनेक जण ख्रिसमस आणि नव्या वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी फिरायला जाण्याचा प्लॅन करतात.

तुम्ही देखील यंदा ख्रिसमस आणि न्यू इयरचे सेलिब्रेशन करण्यासाठी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आज आम्ही तुम्हाला भारतातील सुंदर समुद्रकिनाऱ्यांबद्दल सांगणार आहोत. या बीचेसवर जाऊन तुम्ही तुमच्या सेलिब्रेशनचा आनंद द्विगुणीत कराल, यात काही शंका नाही.

पॅराडाईज बीच पाँडिचेरी (Paradise Beach, Pondicherry)

पाँडिचेरी या केंद्रशासित प्रदेशातील अनेक पर्यटनस्थळे प्रसिद्ध आहेत. त्यातल्या त्यात येथील समुद्रकिनारे देखील प्रसिद्ध आहेत. पॅराडाईज बीच हा पाँडिचेरीमधील अतिशय सुंदर आणि स्वच्छ बीच आहे.

Paradise Beach

या बीचवरील सोनेरी वाळू पर्यटकांचे अधिक लक्ष वेधून घेते. सर्वात शांत आणि स्वच्छ बीच म्हणून याचा उल्लेख केला जातो. येथे पर्यटकांची फार गर्दी देखील नसते. त्यामुळे, तुम्ही तुमचा वेळ येथे छान प्रकारे व्यतीत करू शकता.

या बीचवर तुम्ही व्हॉलिबॉल खेळू शकता आणि विविध प्रकारचे गेम्स खेळू शकता. यासोबतच तुम्ही पार्टी देखील एंजॉय करू शकता.

महाराष्ट्रातील तारकर्ली बीच (Tarkarli Beach, Maharashtra)

महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि बेस्ट बीच म्हणून तारकर्ली बीचचा उल्लेख केला जातो. हा बीच चार ही बाजूंनी नारळाच्या झाडांनी वेढल्यामुळे, या बीचच्या सौंदर्यात  भर पडते.

Tarkarli Beach

तारकर्ली बीचवर तुम्ह विविध प्रकारच्या वॉटर स्पोर्ट्सचा ही आनंद घेऊ शकता. या बीचवर पर्यटकांची नेहमीच गर्दी पहायला मिळते. ख्रिसमस आणि न्यू इयरचे सेलिब्रेशन करण्यासाठी हा बीच देखील बेस्ट ऑप्शन आहे.

तामिळनाडूतील मरिना बीच (Marina Beach, Tamil Nadu)

तामिळनाडूतील या मरिना बीचचे नाव तुम्ही ऐकले असेलच, कारण हे बीच सुप्रसिद्ध आहे. भारतातील सर्वात लांबलचक बीच म्हणून या बीचची खास ओळख आहे.

Marina Beach

विशेष म्हणजे मरिना बीचचा समुद्रकिनारा हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा समुद्रकिनारा आहे. ख्रिसमस आणि न्यू इयरचे सेलिब्रेशन करण्यासाठी यापेक्षा अधिक चांगली जागा कोणती असू शकते? हो ना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vice President Election 2025 : बहुमत नाही म्हणून एनडीएची विरोधी पक्षांना मतदानाची विनंती; उद्धव ठाकरेंच्या खासदाराचा दावा

Bail Pola Festival 2025: आज आवतण घ्या, उद्या जेवायला या; खांदेमळणीने सुरू होणार कृषी संस्कृतीचा उत्सव बैलपोळा

Panchganga River : पंचगंगा नदी धोका पातळीपासून ३ इंच दूर; बावडा-शिये मार्ग बंद, नदीकाठी सतर्कतेचा इशारा, 'या' मार्गांवर वाहतूक बंद

मुंबईकरांना लेप्टोचा धोका! पावसाच्या पाण्यात भिजलेल्यांनी ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घ्या, आयुक्तांचं आवाहन

Bike Accident: आईला घेण्यासाठी आलेल्या दोघांवर काळाचा घाला; खुलताबाद रस्त्यावर अज्ञात वाहनाची दुचाकीच्या धडक, दोन्ही मित्र ठार

SCROLL FOR NEXT