Jungle Safari esakal
टूरिझम

Jungle Safari : उन्हाळ्याच्या सुट्टीत जंगल सफारीचा आनंद घ्यायचाय? मग, भारतातील ‘या’ ठिकाणांना नक्की द्या भेट

Jungle Safari : जर तुम्हाला जंगलात फिरायची आवड असेल, तर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत जंगल सफारीचा आनंद घेऊ शकता.

Monika Lonkar –Kumbhar

Jungle Safari : भारतात अनेक मोठी घनदाट आणि उंच जंगले आहेत. या हिरव्यागार आणि घनदाट जंगलांमध्ये विविध प्रकारचे वन्यजीव वास्तव्यास आहेत. भारतातील मिझोरम या राज्यात देशातील सर्वाधिक वनक्षेत्र आहे. यासोबतच मध्य प्रदेशात सर्वाधिक वन जमिन आहे. आपल्या देशातील विविध राज्यांमध्ये अनेक अभयारण्ये, जंगले आहेत. ही अभयारण्ये पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत.

जर तुम्हाला जंगलात फिरायची आवड असेल, तर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत जंगल सफारीचा आनंद घेऊ शकता. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत. जिथे तुम्ही जंगल सफारीला जाऊ शकता. अभयारण्यांमध्ये तुम्हाला विविध प्रकारचे वन्यजीव पहायला मिळतील आणि निसर्गाच्या सानिध्यात ही वेळ घालवता येईल. चला तर मग जाणून घेऊयात या ठिकाणांबद्दल.

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे भारतातील सर्वात लोकप्रिय आणि जुने राष्ट्रीय उद्यान आहे. विशेष म्हणजे वाघांच्या विविध प्रकारच्या जाती या उद्यानात पहायला मिळतात. त्यामुळे, देश-विदेशातील पर्यटक या उद्यानाला भेट देताना दिसतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही कुटुंबासोबत या ठिकाणी फिरायला नक्की जाऊ शकता. या उद्यानात तुम्ही जीप सफारीतून वन्यप्राण्यांना पाहू शकता. मार्च ते मे या दरम्यान तुम्ही या उद्यानाला भेट देऊ शकता. (Jim Corbett National Park)

कान्हा राष्ट्रीय उद्यान

मध्यप्रदेश या राज्यात हे कान्हा राष्ट्रीय उद्यान स्थित आहे. हे राष्ट्रीय उद्यान घनदाट जंगलासाठी प्रसिद्ध आहे. १९५५ मध्ये या उद्यानाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला.

रेनडिअर या प्राण्याच्या नामशेष झालेल्या प्रजाती या उद्यानामध्ये पहायला मिळतात. या कान्हा राष्ट्रीय उद्यानात तुम्ही जंगल सफारीचा आनंद घेऊ शकता. भारतातील हे सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान आहे. शिवाय, ट्रेकिंगसाठी देखील हे उद्यान सुप्रसिद्ध आहे. (Kanha National Park)

पश्चिम बंगालचे सुंदरबन जंगल

सुंदरबन हे रॉयल बंगाल टायगर(वाघ) साठी जगभरात प्रसिद्ध आहे. सुंदरबन हे जंगल भारतातील सर्वात मोठे आणि धोकादायक जंगल म्हणून ओळखले जाते. हे घनदाट जंगल भारत आणि बांग्लादेशच्यामध्ये स्थित आहे. हे जंगल गंगा नदीच्या काठावर वसले असून, या जंगलात वाघासोबतच, हत्ती, बिबट्या, मगरी, वनगाय इत्यादी अनेक प्रकारचे प्राणी पहायला मिळतात. येथे खाऱ्या पाण्यातील मगरींचे देखील वास्तव्य आहे. (Sundarbans National Park)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: आनंदाची बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दहा पदरी होणार; चार नव्या लेनसाठी राज्य सरकारचं नियोजन काय?

Stock Market Closing : बाजारातील तेजी सलग सहाव्या दिवशीही कायम; निफ्टीने ओलांडला 26000 चा टप्पा; कोणते शेअर्स फायद्यात?

Viral Video: शिल्पा शेट्टीची 'बिबट्या साडी' पाहिलीत का? लाल साडीत हॉट अंदाज, अन् पदरावर भला मोठा बिबट्या

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

Mumbai News: जिथं भविष्याची स्वप्नं पाहिली त्याच शाळेने माझ्या मुलीचा जीव घेतला, चिमुकलीच्या आईचा मन हेलावणारा टाहो!

SCROLL FOR NEXT