betla national park

 

esakal

टूरिझम

Betala National Park: तीन महिन्यांनंतर बेतला नॅशनल पार्क खुले; जंगल सफारीला पुन्हा सुरुवात

Jungle Safari Resumes in Palamu Tiger Reserve: वन्यजीवांसोबत इतिहासाची सफर; बेतला नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांसाठी नवी पर्वणी

CD

झारखंडमधील पलामू व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणारे प्रसिद्ध बेतला नॅशनल पार्क तीन महिन्यांच्या पावसाळी बंदीनंतर गुरुवारी (१ ऑक्टोबर) पर्यटकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले. यासोबतच पलामू व्याघ्र प्रकल्पातील नव्या पर्यटन हंगामालाही सुरुवात झाली. चतरा लोकसभा मतदारसंघाचे खासदार कालीचरण सिंह आणि वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर पर्यटकांच्या जिप्सी सफारीला सुरुवात झाली.

पलामू व्याघ्र प्रकल्पातील बेतला राष्ट्रीय उद्यान दरवर्षी १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत बंद ठेवले जाते. पावसाळ्यातील परिस्थिती आणि वन्यजीवांच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा हंगामी बंद असतो. १ ऑक्टोबरपासून पुन्हा पर्यटन सुरू होते.

जंगल सफारीसोबत वन्यजीवांचे दर्शन

पार्क खुले होताच पर्यटकांनी खुल्या जिप्सीमधून जंगल सफारीचा आनंद घेतला. बेतला परिसरात चितळ, हरणे, सांबर, बायसन तसेच हत्ती आणि विविध पक्ष्यांचे दर्शन घेता येते. झारखंड वन विभागाच्या माहितीनुसार बेतला नॅशनल पार्क सुमारे २२६ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरले असून, तो पलामू व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे.

पलामू किल्ला परिसरही सफारीच्या कक्षेत

यंदाच्या पर्यटन हंगामातील महत्त्वाचे आकर्षण म्हणजे ऐतिहासिक पलामू किल्ला परिसर. किल्ल्याच्या परिसराला पर्यटन सर्किटशी जोडण्यावर भर देण्यात आला आहे. पलामू किल्ला बेतला नॅशनल पार्कपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असून, औरंगा नदीच्या काठावर दोन ऐतिहासिक किल्ल्यांचे अवशेष आहेत.

किल्ला परिसरात वन्यजीव आणि ऐतिहासिक वारसा या दोन्हींचा अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे. मात्र या परिसरातील नियमांचे पालन करणे पर्यटकांसाठी आवश्यक असेल.

झारखंडी खाद्यपदार्थांचाही आस्वाद

यंदा वन्यजीव पर्यटनासोबत स्थानिक खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन देण्याची तयारी करण्यात आली आहे. पर्यटकांना धुस्का, लिट्टी-चोखा यांसारख्या झारखंडी पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. स्थानिक नागरिक आणि ग्रामीण भागातील महिलांना पर्यटनाशी जोडण्याच्या उद्देशाने खाद्यपदार्थ आणि ग्रामीण हाटाच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

संपूर्ण पर्यटन सर्किट प्लास्टिकमुक्त

बेतला पार्क आणि संबंधित ईको-टुरिझम सर्किट प्लास्टिकमुक्त करण्यावरही भर देण्यात आला आहे. प्लास्टिक घेऊन येणाऱ्या पर्यटकांसाठी कडक नियम लागू करण्यात आले असून, कचरा न करण्यासंदर्भात उपाययोजना करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी प्लास्टिकसाठी कॉशन मनीची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

मेदिनीनगर आणि बरवाडीहहून पोहोचणे सोपे

बेतला हे पलामू व्याघ्र प्रकल्पातील प्रमुख पर्यटन केंद्र आहे. ते मेदिनीनगरपासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर आहे. बरवाडीह रेल्वे स्थानक सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असून, त्यामुळे रेल्वेने येणाऱ्या पर्यटकांसाठीही बेतला गाठणे सोपे आहे.

दुर्गापूजेच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर नव्या पर्यटन हंगामात बेतला नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. जंगल सफारी, ऐतिहासिक स्थळे आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीचा अनुभव यामुळे यंदाच्या पर्यटन हंगामात बेतला हे पर्यटकांसाठी महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT