टूरिझम

पक्षी निरीक्षणासाठी ताडोबा कशाला सोनेगावात या!

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : वाढते शहरीकरण आणि वृक्षतोडीमुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास झाला. परिणामी पक्ष्यांच्या संख्या रोडावली. निसर्गासाठी आणि पक्षी प्रेमींसाठी ही एक वाईट बातमी असली तरी शहरातील सोनेगाव परिसरात आजही अनेक दुर्मीळ पक्षी बघायला मिळतात. रंगेबिरंगी आणि लक्षवेधक पक्षी तुम्हालाही पाहायची इच्छा असेल तर सोनेगाव परिसरातील मुरलीधर मंदिराच्या परिसराला आवर्जून भेट द्या.

पाणपक्षी, ट्री बर्ड, मायग्रेटेड बर्ड असे विविध आणि सहसा पाहायला न मिळणारे पक्षी इथे तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. यात ग्रीन बिल्ड मलकोहा, ओरिएंटल हनी बझार्ड, ईग्रेट, जंगल - बॅबलर, ओरिएंटल मॅगपाय रॉबिन, शिंपी पक्षी (टेलर बर्ड), राखी वटवट्या (प्रिनिया), लालबुडाचा बुलबुल (रेड वेंटेड बुलबुल), गारडोळी (इंडियन व्हाइट आय), घिवर (खंड्या) (कॉमन किंगफिशर), कवड्या घिवर (पायड किंगफिशर), पांढऱ्या घशाचा घिवर (व्हाइट थ्रोटेड), फ्लायकॅचर, काळ्या डोक्याचा खंड्या (किंगफिशर ब्लॅक कॅपड्‌), शाही बुलबुल स्वर्गीय नर्तक (इंडियन पॅराडाइज फ्लायकॅचर) अशा विविध प्रजातींमधील पक्षी पाहायला मिळतील. पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेदरम्यान या परिसरात गेल्यास पक्षी निरीक्षक आवर्जून निरीक्षण करताना दिसतात.

दुर्बीण, पक्ष्यांना द्यायला दाणे, पाणी आणि काही जण नोंदवही घेत दररोज सहकार नगरमधील या झुडपाच्या परिसरात पक्षांच्या शोधात भटकत असतात. रंगेबेरंगी, मधुर आवाज, डौलदार चालीतल्या या पक्ष्यांचे निरीक्षण करणे अविस्मरणीय क्षण असल्याचे पक्षी निरीक्षक सांगतात. सोनेगाव तलावातील मासे आणि जंगलात मिळणारे कीटक या पक्षांचे खाद्य आहे.

जंगलात असणारी विविध प्रकारची झाडे पक्ष्यांना घरटे बांधण्यासाठी लाभदायी ठरत आहेत. विशेष म्हणजे काटेसावर (रेड कॉटन सिल्क)चे झाड या जंगलात जास्त आहेत. या झाडांवर ४० ते ५० पक्ष्यांच्या संख्येमध्ये ऋतुमानानुसार स्थलांतर करणारे पक्षी पाहायला मिळत असल्याचे पक्षी निरीक्षक सांगतात. विमानतळाच्या परिसरात जंगल असल्याने सुरक्षितता असली तरी वृक्षतोड होत असल्याने पक्षी प्रेमींसाठी चिंतेचा विषय आहे.

सोनेगाव परिसरामध्ये जंगल आणि तलावाचे पाणी असल्याने या ठिकाणी पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. १३ वर्षांपूर्वी याच्या दुप्पट संख्या पाहायला मिळायची. आता लिटिल ग्रीनसारखे काही पक्षी परिसरारून लुप्त झाले आहेत. उन्हाळा आला की तलावाचे पाणी कमी होणे, जंगलातील वृक्षतोड केल्याने घरटे नष्ट होणे आदी बाबी पक्ष्यांसाठी हानिकारक ठरत आहेत.
- दिलीप कुलकर्णी, ज्येष्ठ पक्षी निरीक्षक
मी या परिसरात लहानाचे मोठे झाले. ब्रिटिश काळात घनदाट जंगल असल्याने सूर्याची किरणेसुद्धा जमिनीवर पडत नसल्याची बाब माझी आजी मला लहानपणी सांगायची. या परिसरातील नगण्य पक्षी, सरडे, निसर्ग मला लहानपणापासूनच आकर्षित करीत आला आहे. नागरिकांना पक्ष्यांच्या या सुंदरतेचे आणि अस्तित्वाचे महत्त्व लक्षात येत नाही. या परिसरात भेट दिल्यास नागरिक नक्कीच या निसर्गाच्या आणि पक्ष्यांच्या मोहात पडतील.
- शोभना मेश्राम, पक्षी निरीक्षक, वारसास्थळ अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT