How to book a rental car for a family trip Sakal
टूरिझम

Online Car Booking: कुटुंबासह सैर करायचीयं, पण कार नाहीय? 'या' वेबसाईटवरून सहज बुक करा कार

Weekend Travel Trip: तुमच्याकडे चारचाकी नसेल तर चिंता नको आता वीकेंडचा आनंद डबल करण्यासाठी काही वेबसाईटवर रेंटल कार बुक करू शकता. पण यासाठी कोणते नियम आहेत हे जाणून घेऊया.

पुजा बोनकिले

  1. कुटुंबासह सैर करण्यासाठी Zoomcar, Turo किंवा Getaround यांसारख्या वेबसाइट्सवरून सहज कार भाड्याने घ्या.

  2. प्रवासाचे नियोजन करताना बजेट, कारचा प्रकार आणि भाड्याच्या अटी आधी तपासा.

  3. ऑनलाइन बुकिंग करून वेळ आणि पैसे वाचवा, तसेच सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा आनंद घ्या.

Long Weekend Travel Trip: अनेक लोकांना सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याची आवड असते. यंदा 15 ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी आला आहे. यामुळे शनिवार, रविवार अशा तीन सुट्ट्या लागून आल्या आहेत. तुम्ही या सुट्ट्यांध्ये मित्र-परिवार किंवा कुटूंबातील सदस्यांसोबत फिरायला जाण्याचे नियोजन करू शकता.

पण तुमच्याकडे चारचाकी नसेल तर आता काळजी करण्याची गरज नाही. कारण वीकेंड अविस्मरणीय आणि आनंदी करण्यासाठी तुम्ही पुढील काही वेबसाईटवर भाड्याने कार बुक करू शकता. पण यासाठी कोणते नियम आहेत हे जाणून घेऊया.

सवारी (Savaari)

तुम्ही वीकेंडला जाण्यासाठी 'सवारी' या वेबसाईटवर कार भाड्याने बूक करू शकता. तुम्हाला हॅचबॅक, सेडन, एसयुव्ही यासारख्या गाड्या भाड्याने बूक करता येईल. भाड्याची कार बुक करण्यासाठी तुम्ही सवारी बेवसाईट आणि अॅपचा वापर करू शकता.

मेक माय ट्रिप (MakeMyTrip)

मेक माय ट्रिप ही एक लोकप्रिय वेबसाइट आहे. अनेक लोक या वेबसाईटचा वापर करून बस, कार बुक करतात. तुम्ही वीकेंडला फिरायला जाण्यासाठी या वेबसाईटवर जाऊन भाड्याने कार बुक करू शकता. तुम्हाला पुणे आणि मुंबईसाठी कार भाड्याने मिळेल. या वेबसाईटवर तुम्हाला लक्झरी कार आणि उत्तम ऑफर मिळेल.

रंजीता टूर्स अँड ट्रॅव्हल्स (Ranjeeta Tours and Travels)

रंजीता टूर्स अँड ट्रॅव्हल्स ही मुंबईतील स्थानिक कार भाड्याने देणारी कंपनी आहे. तुम्ही या वेबसाईटवर हॅचबॅक, सेडान आणि एसयुव्ही यासारख्या विविध प्रकारच्या कार भाड्याने बुक करू शकता. आपल्या स्पर्धेक कंपन्यांच्या तुलनेत चांगली ऑफर देतात. यामुळे तुमच्याकडे जर चारचाकी नसेल तर चिंता करू नका. या वेबसाईटवर जाऊन कार बुक करू शकता आणि वीकेंडचा आनंद लूटू शकता.

अंकित ट्रॅव्हल्स (Ankit Travels)

वीकेंडला फिरायला जाण्यासाठी तुमच्याकडे कार नसेल तर तुम्ही अंकित ट्रॅव्हल्स या वेबसाईटवर भाड्याने कार घेऊ शकता. ही एक मुंबईतील स्थानिक कार कंपनी आहे. यांच्याकडे आरामदायी अशा कार भाड्याने मिळतात.

ट्रॅव्हल लाइन (Travel Line)

ट्रॅव्हल लाइन ही मुंबईतील कार भाड्याने देणारी कंपनी आहे. या वेबसाईटवर तुम्ही लक्झरी कारसह विविध प्रकारच्या कार भाड्याने बुक करू शकता.

पुढील नियम ठेवा लक्षात

वय

कार भाड्याने घेण्यासाठी किमान 18 वर्षे पुर्ण झालेले असावे. परंतु काही कंपन्यांची कमाल वयोमर्यादा 70 वर्षे असू शकते.

लायसन्स

कार भाड्याने घेण्यासाठी तुम्हाला वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.

पेमेंट

तुम्हाला भाड्याने कार बुक करण्यासाठी पैसे किंवा डिपॉझिट ऑनलाइन किंवा ऑफलाइन भरावे लागतील.

विमा

विमा सामान्यतः भाड्याच्या पैशांमध्ये समाविष्ट केला जातो, परंतु अतिरिक्त कव्हरेजसाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे द्यावे लागतील.

इंधन

तुम्ही गाडी घेतली त्यावेळी गाडीत जेवढं इंधन असेल तेवढंच इंधन गाडी परत करताना असणं गरजेच आहे. किंवा तुम्हाला त्या इंधनाचे पैसे द्यावे लागतील

ड्रायव्हर

तुम्ही भाड्याची कार चालवण्यासाठी ड्रायव्हर घेऊ शकता. पण यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतील.

बुकिंग रद्द करणे

तुम्ही शेवटच्या क्षणी तुमचे बुकिंग रद्द केल्यास तुम्हाला रद्द करण्याचे चार्जेस द्यावे लागतील.

पण लक्षात ठेवा कारच्या प्रकारानुसार नियम बदलू शकतात. यामुळे कंपनीशी थेट संपर्क साधावा.

कुटुंबासह सैर करण्यासाठी कार भाड्याने घेण्यासाठी कोणत्या वेबसाइट्स उत्तम आहेत?

Zoomcar, Turo, Getaround आणि Revv यांसारख्या वेबसाइट्स कार भाड्याने घेण्यासाठी विश्वसनीय आहेत.

कार भाड्याने घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या?

कारचा प्रकार, भाड्याचे दर, इंधन धोरण आणि विम्याच्या अटी आधी तपासा.

ऑनलाइन कार बुकिंग कसे करावे?

वेबसाईटवर जा, तारीख आणि स्थान निवडा, कारचा प्रकार पसंत करा आणि पेमेंट करून बुकिंग निश्चित करा.

कार भाड्याने घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड किंवा पासपोर्ट आणि पेमेंटसाठी क्रेडिट/डेबिट कार्ड लागते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Dev on stray dog protection: भटक्या कुत्र्यांच्या संरक्षणासाठी आता कपिल देवही मैदानात; अधिकाऱ्यांना केलं 'हे' आवाहन!

Operation Sindoor मधील शूरवीरांचा सन्मान! १६ BSF सैनिकांना शौर्य पुरस्कार, पाहा संपूर्ण यादी अन् 'या' योद्ध्यांचा शौर्यसंग्राम

Virat Kohli - Rohit Sharma यांचं वनडेतील करियरही संपलं म्हणणाऱ्यांना सुरेश रैनाची चपराक; म्हणाला, ते महत्वाचे आहेत कारण...

Imtiaz Jaleel mutton chicken party: स्वातंत्र्यदिनी जलील यांच्या घरी होणार मटण-चिकन पार्टी; आयुक्तांसह थेट मुख्यमंत्र्यांना निमंत्रण!

Latest Marathi News Updates: सिंहगडावरील ध्वजस्तंभाची वन विभागाकडून तातडीने दुरुस्ती

SCROLL FOR NEXT