Cherry Blossom Festival 2022 esakal
टूरिझम

Cherry Blossom Festival : 'चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल'चा संस्मरणीय अनुभव घ्यायचाय? आजच शिलाँगचं तिकीट बुक करा

भारतभूमीला विविधतेनं नटलेला देश म्हटलं जातं. कारण, आपल्या देशात सर्व संस्कृतींचा आदर केला जातो.

सकाळ डिजिटल टीम

भारतभूमीला विविधतेनं नटलेला देश म्हटलं जातं. कारण, आपल्या देशात सर्व संस्कृतींचा आदर केला जातो.

जपान (Japan) आणि चीनमध्ये दरवर्षीच्या हिवाळ्यात चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल (Cherry Blossom Festival) भरवलं जातं. परदेशात साजरे होणाऱ्या या फेस्टिव्हलचं अनेकांना आकर्षण आहे. त्यामुळं हा फेस्टिव्हल पहायला जायचं म्हटलं तर ते भारतातील नागरिकांना परवडणारं नाही. त्यामुळं नाराज होण्याची आवश्यकता नाही. हा फेस्टिव्हल आता भारतातही साजरा केला जातो.

भारतभूमीला विविधतेनं नटलेला देश म्हटलं जातं. कारण, आपल्या देशात सर्व संस्कृतींचा आदर केला जातो. भारतात दररोज कोणत्या ना कोणत्या राज्याचा विशेष उत्सव असतो. तो पाहण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी देशभरातील लोक जातात. मेघालयची राजधानी शिलाँग येथे दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात या फेस्टीव्हलचे आयोजन केले जाते. चार दिवस असणारा हा फेस्टीव्हल यावर्षी 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून तो 26 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. तुम्हीही शिलाँगला जाण्याचा विचार करत असाल. तर या सणाच्या निमित्ताने तुम्ही शिलाँगला भेट देऊ शकता.

जर तुम्ही 23 नोव्हेंबरपूर्वी जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही शिलाँगमधील या फेस्टीव्हलमध्येही सहभागी होऊ शकता. हा फेस्टीव्हल 21 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. जगभरातून कोणकोणते लोक जपानला जातात हे पाहण्यासाठी. पण, शिलाँगमध्ये दरवर्षी चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल भरवला जात आहे. येथे तुम्हाला गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची फुले उमललेली पाहायला मिळतात. या सणाला मेघालयमध्ये 'फेस्टिव्हल ऑफ नेचर' असेही म्हणतात.

Cherry Blossom Festival 2022

या फेस्टीव्हलमध्ये गाणी, डान्स स्पर्धा, पाककृती स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचे नियोजन करण्यात आले आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, जम्मू आणि काश्मीर, सिक्कीम आणि दार्जिलिंग (Darjeeling) या राज्यात चेरी ब्लॉसम्सची झाडे आढळतात. पौराणिक दृष्टिकोनातूनही हे फूल अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्याची पाने महाशिवरात्रीला पुष्पहार अर्पण करण्यासाठी वापरली जातात.

शिलाँग (Shillong) हे मेघालयची राजधानी म्हणून ओळखले जाते. येथे दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. उमियाम लेक, वार्ड्स लेक, एलिफंट फॉल्स, शिलाँग पीक, लैतलाम व्हॅली, लेडी हैदरी पार्क, डॉन बॉस्को म्युझियम आणि कॅथेड्रल चर्च यांसारखी प्रसिद्ध ठिकाणे येथे आहेत. इथे मोमोज, डोह-खलीह, जडोह, पुमालोई, मिनिल सोंगा, पुथारो, पुखलीन आणि शीर सेवन हे पदार्थही प्रसिद्ध आहेत. शिलाँगला पोहोचण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ शिलाँग विमानतळ आहे. परंतु, काहीवेळा फ्लाइट उपलब्ध नसल्यास, तुम्ही शिलाँगपासून सुमारे 117 किमी अंतरावर असलेल्या गुवाहाटी विमानतळावर देखील जाऊ शकता. येथून जवळ गुवाहाटी रेल्वे स्टेशन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways : पुणे, मुंबई, कोल्हापूरहून धावणाऱ्या 8 एक्स्प्रेस गाड्यांना जानेवारी 2026 पासून मिळणार 'LHB' डबे

Ravindra Jadeja: एमएस धोनीची जडेजासोबत राजस्थानमध्ये ट्रेड होण्यापूर्वी नेमकी काय चर्चा झाली? समोर आली अपडेट

Mumbai Crime: मध्यरात्री फिरताना २७ वर्षीय फ्रेंच तरुणीसोबत तरूणानं नको ते कृत्य केलं अन्...; मुंबईत नेमकं काय घडलं?

VIP Mobile Number Process : घरबसल्या तुम्हाला मिळेल VIP मोबाईल नंबर; 10 मिनिटात कन्फर्म फ्री रजिस्ट्रेशन, सीक्रेट ट्रिक पाहा

डिझेल टँकरला बस धडकली, मदिनाला निघालेले हैदराबादचे ४२ यात्रेकरू होरपळले, फक्त बसचा ड्रायव्हर वाचला

SCROLL FOR NEXT