dapoli hill station for holiday and weekend in ratnagiri konkan 
टूरिझम

विकेंडचा प्लॅन करताय ? मग कोकणातील मिनी महाबळेश्वर पाहिलंय का?

सकाळ वृत्तसेवा

दापोली : दापोली हे महाराष्ट्रातील हिलस्टेशन म्हणून प्रसिद्ध आहे. येथील हवामान थंड असते. या परिसरात असे अनेक किल्ले, मंदिरे, गुहा आहेत जे पर्यटकांना आकर्षित करतात. वर्षभर हवामान थंड असल्याने दापोलीला मिनी महाबळेश्वर असेही म्हटले जाते. महाराष्ट्रातील खूप महत्त्वाचे महापुरुष जसे की लोकमान्य टिळक, सानेगुरुजी, महर्षी धोंडो केशव कर्वे हे दापोलीचे रहिवासी होते. या परिसरात अनेक किनारे आहेत. तसेच स्वादिष्ट खाद्यसंस्कृतीसाठी हे प्रसिद्ध आहे. विकेंड किंवा हॉलिडेसाठी हे प्रसिद्ध आणि उत्तम ठिकाण आहे. चला तर मग येथील काही प्रमुख स्थळांबद्दल माहिती पाहूयात..

केशवराज मंदिर 

हे मंदिर पेशवा शैलीच्या उत्तम वास्तूचा एक नमुना आहे. इथला परिसर खूप शांतत आहे. आतपर्यंत जाण्यास एक छोटा रस्ता जातो, जो नारळ, सुपारी, आंबा, काजूच्या बागांमधून बाहेर पडतो.

प्रकृती गिझर ( गरम पाण्याचे झरे ) 

येथील परिसरात गरम पाण्याचे झरे आहेत. ज्यामधून गंधकाचे पाणी येते. हे पाणी दरवर्षी गंधकाच्या भूमितून बाहेर येते असे म्हटंले जाते. या पाण्यामध्ये औषधी गुण आहेत, जे त्वचेचे रोग बरे करण्यास उपयोगी पडतात असे मानले जाते. जवळचे मोठे जंगल, बाजूला डोंगर, शिवलिंगाचे मंदिर आणि बाजुला छोटी नदी वाहत असल्यामुळे या भौगोलिक क्षेत्र सौंदर्य प्राप्त झाले आहे.

गणेश मंदिर 

दापोली तालुक्यात अंजराले गावात गणेश मंदिर आहे. त्याला कादीवार्चा गणपती असं म्हंटले जाते. जवळच असलेल्या नदीवर एक बंदर आहे. हे गणेश मंदिर पूर्ण कोकण क्षेत्रात प्रसिद्ध आहे. बाराव्या शतकात हे मंदिर तयार केले गेले आहे. १६३० मध्ये या मंदिर देखभालीचे काम निस्चर कुंटुबीय करत होते. उंचावर असलेल्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. तुम्ही तिथून अरबी समुद्र, सुवर्णदुर्ग किल्ला, नारळ बाग पाहू शकता. 

कसे जाल -

तुम्ही विमानाने, रेल्वेने किंवा तुमच्या कारने या जाऊ शकता.
तिथून रत्नागिरी एअरपोर्ट १२७ किलोमीटर दूर आहे. रेल्वे स्टेशनपासून ते 30 किलोमीटर अंतरावर आहे. पण तुम्ही जर कार किंवा गाडीतून जाणार असाल तर दापोली मुंबईपासून २२० किलोमीटर आणि पुण्यापासून 185 किलोमीटरवर आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Ceasefire : अमेरिका- इराण युद्धाविरामामुळे भारताला दिलासा; हॉर्मूझची सामुद्रधुनी खुली होताच एलपीजी पुरवठा होणार सुरळीत

Sports News: पलक-मुकेश नेलावल्ली यांची विश्वविक्रमासह सुवर्ण झेप; भारताचा अभिमान उंचावला

दिंडोरीवर पुन्हा शोककळा! चार शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू, तर झोक्याचा फास लागून एकाचा अंत

अमेरिकेची २ आठवडे युद्धबंदी! पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं कॉपी पेस्ट ट्विट; स्क्रीप्ट ट्रम्पनी लिहून दिली?

Sports News: आशियाई बॅडमिंटन स्पर्धा;भारताचे दुहेरीत संमिश्र यश

SCROLL FOR NEXT