datta temple esakal
टूरिझम

Datta Maharaj Temple: भक्ताचा अपमान होण्यापासून थांबवण्यासाठी दत्तगुरू नरसोबाच्या वाडीहून गोव्याला गेले!

दत्त महाराजांनी गोव्यातील भक्ताला दिला दृष्टांत

सकाळ डिजिटल टीम

पणजीपासून सुमारे २०-२५ मैलांवर डिचोली तालुक्यात हे सांखळी नावाचे टुमदार गाव वसलेले आहे. या गावातील एक भक्त कोल्हापूरच्या नरसोबाच्या वाडीला नित्य नियमाने येत होते. पण, त्याकाळात वाडीत असलेल्या काही ब्राह्मणांनी त्या भक्ताचा अपमान केला. केवळ भक्ती हीच संपत्ती मानणारा तो दत्त महाराजांचा सच्चा भक्त होता. त्याला हा अपमान सहन झाला नाही. तो दत्तगुरूंची पोथी वाचत रडू लागला आणि हे दत्त महाराजांना आवडले नाही. 

साक्षात दत्त महाराजांनी त्या भक्ताला दृष्टांत दिला आणि ‘इथून पुढे तू मला भेटायला येऊ नको, मीच तूझ्या गावी येतो,असं सांगितलं. आणि दत्त गुरूंनी थेट गोव्याची वाट धरली.

अंदाजे सव्वाशे वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. म्हाळू कामत या विठ्ठल भक्ताचे सुपुत्र लक्ष्मण कामत हे निस्सीम दत्तभक्त होते. प्रतिवर्षी नरसोबाच्या वाडीला जाऊन ते गुरुचरित्राचे पारायण करीत असत. अनेक वर्षे हा नेम त्यांनी अत्यंत निष्ठेने चालविला होता, पण हा नेम चालवीत असताना त्यांना स्थानिक सेवेकरी अनेकदा त्रास देत असत, अवहेलना करीत असत. एकदा असाच अपमान सहन न झाल्याने कामत तिथून परत निघाले. आता मीच तुझ्या गावी राहायला येतो असे स्वप्नात त्यांना सांगितले. आणि मग विविध चमत्कारांची मालिकाच सुरू झाली, असे सांगितले जाते.

गोव्यातील दत्त मंदिर

मंदिरासाठी लागणारी साधनसामग्री उपलब्ध असलेल्या पैशांमध्ये मिळणे, मंदिरासाठी योग्य जागा, मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी योग्य मूर्ती, तीसुद्धा जेवढे जमले होते तेवढय़ाच पैशांमध्ये मिळणे, ती ज्यांच्या घरी आणून नुसती ठेवली त्यांच्या घरातील सर्व त्रास दूर होणे अशा एकामागून एक शुभ घटना घडत गेल्या.

अंतत: ५ एप्रिल १८८२ रोजी या मूर्तीची दुपारी दोनच्या शुभ मुहूर्तावर मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सदर मूर्ती ही काश्मिरी पाषाणातील असून तिला तीन मुखे आणि सहा हात आहेत.

गोव्यातील दत्त मंदिर

दत्तभक्तांमध्ये ठाम श्रद्धा आहे. या ठिकाणी रामनवमी, अक्षय्य तृतीया, नवरात्रोत्सव, महाशिवरात्री आणि दत्तजयंती असे उत्सव-समारंभ साजरे होतात. प्रतिष्ठापना दिन हा दत्तमूर्तीचा वर्धापन दिन म्हणून साजरा होतो. सांखळीचे हे देवस्थान अत्यंत कडक आणि जागृत म्हणून पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध पावलेले आहे.

दत्तगुरूंचा दृष्टांत मिळाल्याने भक्त लक्ष्मण कामत खूश झाले आणि दत्त महाराजांसाठी मंदिर बांधण्याचा घाट घातला. त्याच सुमारास सांखळी येथील श्रीमती मथुराबाई शेणवी बोडके यांना त्यांच्या पतीच्या स्मरणार्थ औदुंबर वृक्षाचे रोपण आणि त्यास पार बांधण्याची प्रेरणा मिळाली.

दत्त महाराजांनी याच ठिकाणी भक्ताला दृष्टांत दिला

हे मंदिर सांखळी गावातील लोकांनी श्रमदानाने केले आहे. देवालयाची वास्तू सिद्ध झाल्यानंतर लक्ष्मण म्हाळू कामत, पित्रेशास्त्री आणि चिंतामणराव वालावलकर यांच्यासह मुंबईला गेले. तेथे त्यांना एक दत्तमूर्ती आवडली; परंतु ती नेपाळनरेशांसाठी बनवली असल्याने आणि मूर्तीकाराने सांगितलेल्या किमतीएवढी रक्कम त्यांच्या जवळ नसल्यामुळे ते निराश झाले.

दुसर्‍या दिवशी त्या दुकानदाराचा नोकर त्या तिघांकडे त्यांचा शोध घेत आला आणि मालकाने मूर्ती नेण्यासंदर्भात बोलावले असल्याचे सांगितले. प्रत्यक्ष भेटीत त्या दुकानदाराने सांगितले की, रात्री स्वप्नात एक तेजस्वी साधूने ती मूर्ती विनाविलंब तुम्हाला देण्यास सांगितले. तुम्ही मला काहीही द्या आणि दत्तमूर्ती घेऊन जा, असे तो दुकानदार म्हणाला अन् ती मूर्ती सांखळी येथे आली.

दत्त महाराजांची मुर्ती

मंदिरात आहेत या देवता

चैत्री पौर्णिमेपासून वद्य द्वितीयेपर्यंत प्राणप्रतिष्ठेचा सोहळा चालू होता. गणपती, मारुती, अन्नपूर्णादेवी, बाण, शाळिग्राम, नर्मदा, पाषाणनंदी असे काही इतर देवही आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Political Horoscope : पक्षचिन्ह अन् नावावर सुरु असलेल्या न्यायालयातील प्रकरणांचं काय होणार? काय सांगतं या आठवड्याचं राजकीय भविष्य? वाचा....

Traffic News: ...म्हणजे पुन्हा मलिदा खाण्याची संधी उपलब्ध, शीळफाटा रोडवरील वाहतूक कोंडीवर राजू पाटलांची तीव्र नाराजी, काय म्हणाले?

Chandrashekhar Bawankule : संतोष दानवे भाजपमधील 'कोहिनूर हिरा'; महसूल मंत्री बावनकुळे यांची दानवे पिता-पुत्रांवर स्तुती सुमने

Virar News : महानगरपालिकेची प्लास्टिक पिशव्या जप्तीची कारवाई; ३५०० किलो प्लास्टिक केले जप्त

Nashik News : भावनांना शब्द नाहीत! बहिणीच्या हातात राखी पण डोळ्यांत अश्रू, समोर शांत अन् कायमचा दूर गेलेला ३ वर्षांचा चिमुकला भाऊ

SCROLL FOR NEXT