Kullu, Manali Google
टूरिझम

'दिवाळी' सुट्टीत पर्यटनाला जायचयं? 'या' बेस्ट ठिकाणांना भेट द्या

सकाळ डिजिटल टीम

गेली दोन वर्ष कोरोनामुळे कोणतेही सण- समारंभ किंवा पर्यटन करता आले नाही. यंदा मात्र भारतात सर्वत्र दिवाळी (Diwali)थाटामाटात साजरी केली जात आहे. सगळीकडे दीपोमय वातावरण आहे. हाच आनंद जर द्विगुणीत करायचा असेल तर बॅग भरा आणि बाहेर पडा. लक्ष्मीपूजन, भाऊबीज झाल्यानंतर दिवाळी सुट्टी साजरी करण्यासाठी भारतातील शिमला, मनाली, कुल्लूला यंदाची सुट्टी आपल्या कुटुंब, मित्रपरीवारासह या ठिकाणांना भेट द्या.

शिमलासह मनालीची करा सैर

मनाली हे त्याच्या सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. मनालीला स्पिती आणि लेहचे प्रवेशद्वार मानले जाते. हिमाचल प्रदेशात बियास नदीच्या काठावर मनाली वसलेले आहे. याची उंची समुद्रसपाटीपासून 1,950 मीटर आहे. शिमला पासून तुम्ही मनालीला जाऊ शकता. डेस्टिनेशनसाठी परफेक्ट ठिकाण आहे. याठिकाणी दिवाळी सुट्टी एंजाॅय करू शकता.

कुल्लूमधील पवित्र स्थळांना भेट द्या

दसरा उत्सवासाठी कुल्लू जगभर प्रसिद्ध आहे. कुल्लू हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. मनाली पासून अवघ्या ४० किलोमिटर अंतरावर हे ठिकाण आहे. दरवर्षी हजारो पर्यटक याठिकाणी भेट देतात. कुल्लूची उंची समुद्रसपाटीपासून 1700 मीटर आहे. कुल्लूमधील बिजली महादेव, नग्गर आणि मणिकर्ण यांसारख्या पवित्र स्थळांना तुम्ही भेट देऊ शकता.

बीर-बिलिंग परफेक्ट डेस्टिनेशन

बीर-बिलिंग पॅराग्लायडिंगसाठी ओळखले जाते. याठिकाणी ऑलिम्पिकचे आयोजन केले जाते. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील जोगिंदर नगरमध्ये बीर-बिलिंग हे गाव आहे. मनाली पासून 180 किमी हे गाव आहे. हे ठिकाण डेस्टिनेशन जगभर प्रसिद्ध आहे. तुम्ही या ठिकाणी स्कायड्रायव्हिंग करू शकता. या दिवाळीची सुट्टी याठिकाणी घालवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेवटच्या दिवशी PM मोदी आणि शहा आले, ४ मिनिटात कामकाज आटोपले; लोकसभा अनिश्चित काळासाठी तहकूब

Shaktipeeth Highway Protest : जयंत पाटील, राजू शेट्टी एकत्र! 'शक्तिपीठ' रद्द करण्यासाठी सांगलीत मोठ्या आंदोलनाची घोषणा; 31 गावांतील 3 हजार एकरांहून अधिक जमीन बाधित

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका! डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह बड्या ब्रँड्सवर FDAची धाड; 5 परवाने निलंबित

Independence Day 2026: तिरंगा थीमवर सजवा घर, शाळा अन् ऑफिस! १५ ऑगस्टला नक्की ट्राय करा 'या' भन्नाट डेकोरेशन आयडियाज!

Latest Marathi News Live Update : पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकारचे अत्यंत अहंकारी वर्तन- कॉंग्रेस

SCROLL FOR NEXT