Tourism news 
टूरिझम

सुट्टीला मुलांसोबत फिरायचंय का?, मग 'ही' प्रसिद्ध प्राणीसंग्रहालय नक्की पहा..

तुम्ही या सुट्टीला मुलांसाठी एखाद्या ट्रिपचे आयोजन करत असाल तर ही ठिकाणे बेस्ट आहेत.

सकाळ डिजिटल टीम

जगातील बरीच मोठ मोठी प्राणीसंग्रहालय ही संपूर्ण भारतभर आहेत. शेकडो एकर जागेवर पसरलेल्या या सुविधा प्राण्यांचे पुनर्वसन आणि सुरक्षित कामगिरीसाठी मदत करतात. पुढील महिन्यात दिवाळी येत आहे. त्यामुळे तुम्ही या सुट्टीला मुलांसाठी एखाद्या ट्रिपचे आयोजन करत असाल तर त्यांच्यासोबत एखाद्या प्राणी संग्रहालयला भेट देणे बेस्ट ठरु शकते.

मुलांना खरंखुर प्राणीसंग्रहालय दाखवणं आवश्यक आहे. कारण आतापर्यंत त्यांनी फक्त फोटोंमध्येच प्राण्यांबद्दल पाहिले असेल किंवा ऐकले असेल. त्यामुळे अशा प्राण्यांबद्दल अधिक जाणून घेण्यास मुलं नेहमीच उत्सुक असतात. हे त्यांच्यासाठी मनोरंजक आणि उत्सुकतेचे असू शकेल. दरम्यान, त्यांना प्राण्यांविषयी विविध माहितीही मिळण्यास मदत होईल. आज आम्ही तुम्हाला भारतातील पाच सर्वात लोकप्रिय प्राणीसंग्रहालयांची माहिती देणार आहोत. जिथे तुम्ही मुलांसोबत भेट देऊ शकता.

इंदिरा गांधी प्राणीशास्त्र उद्यान

हे सर्वात मोठ्या प्राणीसंग्रहालयांपैकी एक आहे. येथे अनेक प्राणी, पक्षी आणि फुलपाखरू पाहण्याचा आनंद घेता येतो. हे प्राणीसंग्रहालय तीन बाजूंनी तयार करण्यात आले आहे. कंबलकोंडा वन अभयारण्य आजूबाजूला आहे. 600 एकरांवर पसरलेल्या या प्राणिसंग्रहालयात तुम्हाला विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात.

नंदनकानन प्राणी उद्यान

येथे तुम्हाला विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात. ते 2009 मध्ये जागतिक प्राणीसंग्रहालय आणि मत्स्यालयांमध्ये सामील झाले आणि असे करणारे भारतातील पहिले प्राणीसंग्रहालय बनले. पांढऱ्या वाघांसाठी प्रसिद्ध असलेले हे एक सफारीचे वैशिष्ट्य मानले जाते. हे भारतातील पहिले प्राणीसंग्रहालय आहे. ज्याला इंग्रजीत 'द गार्डन ऑफ हेवन' असेही म्हणतात.

राजीव गांधी प्राणी उद्यान

हे पुण्यातील सर्वाधिक पसंतीचे पर्यटन स्थळ आहे. नैसर्गिक जगाचे आणि वन्यजीवांचे सुंदर फोटो घेण्यासाठी या प्राणीसंग्रहालयाला भेट द्या. गजबजाटापासून दूर असलेल्या एका दिवसाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही या संग्रहालयाल भेट देऊ शकता. लोकप्रिय पिकनिक क्षेत्रांपैकी एक असेलल्या या ठिकाणी तुम्ही संपूर्ण दिवस घालवू शकता. या ठिकाणी तुम्ही तुमचे कुटुंब आणि मुलांसोबत खूप मजा करू शकता.

म्हैसूर प्राणीसंग्रहालय

या प्राणिसंग्रहालयाच्या आत एक अनोखी बाग असून ती अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसते. या प्राणीसंग्रहालयात तुम्ही हँग आउट करू शकता. काही वन्यजीव पाहू शकता आणि विविध पक्षी पाहू शकता. या प्राणीसंग्रहालयात शंभरहून अधिक प्रकारचे पक्षी आणि इतर प्राणी आहेत.

अरिग्नार अण्णा प्राणीशास्त्र उद्यान, चेन्नई

वंडलूर प्राणिसंग्रहालय म्हणूनही याला ओळखले जाते. या प्राणीसंग्रहालयात 160 वेढ्यांमध्ये सुमारे 1,500 वन्य प्रजाती आहेत. ज्यात 46 लुप्तप्राय प्रजातींचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT