टूरिझम

ड्रॅगन पॅलेस टेम्पल : बौद्ध पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध

सतीश दहाट

कामठी (जि. नागपूर) : विश्वाला मनःशांतीच्या मार्गाने घेऊन जाणाऱ्या बुद्ध धम्मातील तथागत बुद्धांच्या प्रज्ञा, शील, करुणा या त्रिसूत्रीचे अवलोकन करून शांती, मानवता, समता, बंधुता व मैत्री यांचा प्रचार व प्रसार वैभव संपन्न, शांतीशिल्प विश्वविख्यात बुद्धविहार ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या माध्यमातून करावयाचा आहे. शुद्ध व सात्त्विक आचरणाने प्रत्येक मानव बुद्धत्व प्राप्त करू शकतो व ‘सम्यक संबोधी’ सुध्दा होऊ शकतो. कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे बुद्धविहार या पवित्र संकल्पाचा आरंभ आहे.

ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे बुद्धकालीन इतिहासातले महत्त्वाचे आणि पवित्र नाव आहे. बुद्धधम्माच्या पवित्र लोटस सूत्राच्या बाराव्या अध्यायातील बोधीसत्व मंजुश्रीचा इतिहास ड्रॅगन पॅलेसशी संबंधित आहे. मंजुश्री ही नागराज शाकाराची मुलगी. नागकन्या म्हणून लोकप्रिय होती. अगदी लहानपणापासूनच तिने बुद्धांची विचारसरणी अनुसरली. त्या काळात महिलांना समाजात हीन लेखले जायचे. मानवी मूलभूत अधिरसुध्दा नाकारले गेले होते. नागकन्या मंजुश्री तर केवळ आठ वर्षांची बालिका होती. परंतु, एवढ्या अल्पवयीन बालिकेने धम्मनिष्ठा, कठोर तपस्या, गहन श्रद्धा, समर्पण आणि बुद्धिमत्तेच्या तेजोवलयाद्धारे अल्पवयांतही बुध्दत्व प्राप्त केले.

बुध्दत्व प्राप्त केल्यानंतर नागकन्या मंजुश्री बोधिसत्व मंजुश्री झाली. बोधिसत्व मंजुश्रीने जगाच्या दक्षिण भागात भ्रमण करून तथागत बुद्धांच्या सुंदर, मंगलमय, मैत्रीपूर्ण आणि कल्याणकारी धम्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आयुष्य घालविले. आयुष्यात तिने बोधिसत्व असंख्य लोकांना तथागत बुद्धांच्या मार्गाने नेऊन मोक्षप्राप्तीचा लाभ घडविला. ही ऐतिहासिक घटना ड्रॅगन किंग (नागराजा) शाकारा यांच्या पॅलेसमध्ये (महाराष्ट्रात) घडली आणि इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली गेली. म्हणून बुध्दधम्मात ड्रॅगन पॅलेस टेम्पल ही पवित्र आणि पूज्यनिय वास्तू समजली जाते.

सुख, शांती, समाधानाची अनुभूती

कर्मयोगी दादासाहेब कुंभारे परिसराच्या दहा एकर जागेत या विहाराची निर्मिती करण्यात आली आहे. तळमजल्यावर वातानुकूलित सभागृह, सुसज्ज वाचनालय व भव्य संग्रहालय आहे. पहिल्या मजल्यावर विशाल प्रार्थनागृहात भगवान बुद्धांच्या मूर्तीची स्थापना केली आहे. ही अप्रतिम बुद्धमूर्ती जपानतर्फे भेट मिळाली आहे. तिचे वजन ८६४ किलो असून चंदनाच्या अखंड लाकडापासून बनविण्यात आली आहे. मूर्तीचे सुंदर डोळे अर्धोन्मीलित आहेत. वैशिष्ट्य़ म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत विविध दिशांनी बुद्धर्तीकडे बघितल्यास तथागत बुद्धांच्या विविध भाव मुद्रा बघावयास मिळतात आणि अलौकिक आनंदाचा लाभ होतो. शांतीपूर्ण वातावरण निर्मितीमुळे परिसरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक मानवाला सुख, शांती, समाधानाची आणि दिव्य आनंदाची अनुभूती होते.

अत्यंत उच्च दर्जाचे बांधकाम

विहाराची निर्मिती अत्यंत उच्च दर्जाचे बांधकाम साहित्य वापरून करण्यात आली आहे. शेकडो कुशल कामगारांच्या अथक प्रयत्नातून ही वास्तू साकारली आहे. राजस्थान येथील संगमरवर, आग्रा येथील लाल दगड, दक्षिण भारतातून कुशल तंत्रज्ञाकडून तयार केलेले ग्रॅनाईटचे कठडे आपले आगळे-वेगळे वैशिष्ट्य़ दर्शवितात. प्लास्टर न करता केलेले कॉक्रिट उच्च दर्जाच्या बांधकामाची साक्ष देते. पर्यावरणाच्या आवश्यकतेनुसार छताला लक्ष वेधून घेणाऱ्या निळ्या रंगाच्या इटालियन काचा वापरण्यात आल्या आहेत. विहारातील मंच अत्यंत शुभ्र संगमरवरात साकारण्यात आला आहे.

सर्वोत्कृष्ट दर्जाच्या बांधकामाचा पुरस्कार प्राप्त

तंत्रशुद्ध ध्वनिक्षेपण व्यवस्था व प्रकाश योजना आंतरराष्ट्रीय स्तरावरील करण्यात आली आहे. विहाराच्या परिसरातील नयनरम्य बगीचा, हिरवळींचे गालीचे व रंगीबेरंगी कारंजे विहाराची शोभा द्विगुणित करतात. अशा या भव्य व पवित्र ड्रॅगेन पॅलेस टेम्पलचे उद्घाटन कार्तिक पौर्णिमेच्या पावन पर्वावर २३ नोव्हेंबर १९९९ रोजी दोन लाख लोकांच्या उपस्थितीत झाले. ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा आराखडा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्ट्रक्चरल डिझाइनर पी. टी. मसे व आर्किटेक्ट आनंद गोडसे यांनी तयार केला आहे. ड्रॅगन पॅलेस टेम्पलला इंडियन काॉक्रिट इंस्टिट्यूट या संस्थेचा राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट दर्जाच्या बांधकामाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

पर्यटन स्थळाची माहिती

  • बुद्ध धम्मातील बोधिसत्व मंजुश्रीचा इतिहास जागवणारे मध्यभारतातील विश्वविख्यात बुद्धविहार

  • आंतरराष्ट्रीय ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे जागतिक स्तराचे बौद्ध पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध

  • ड्रॅगन पॅलेस टेम्पलची निर्मिती सन १९९९ मध्ये झाली

  • ड्रॅगन पॅलेस टेम्पल कॅम्पसचा परिसर एकूण ४० एकर जागेमध्ये व्यापलेला आहे

  • बुद्धविहारात जपानं येथे निर्मित ८६४ किलो वजनांची अखंड चंदनाची अप्रतिम व भव्य बुद्धमूर्ती

  • बुद्ध धम्माने समृद्ध जपान आणि बुध्दजन्मभूमी भारत यांच्या मैत्रीचे प्रतीक

  • ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे आंतरराष्ट्रीय शांती, मैत्री व मानव कल्याणकारी केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.

  • ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे दहा एकर अशा विस्तीर्ण परिसरात साकारले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र

  • राजर्षी थाटात बसलेले परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्णाकृती भव्य व आकर्षक शिल्प

  • प्रदर्शन कक्षात डॉ. बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनातील अत्यंत दुर्मीळ छायाचित्राचे आणि सुविचारांचे भव्य प्रदर्शन

  • डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण व विविधांगी माहिती देणारी डाक्युमेंट्री फिल्म नियमित दाखविण्याची व्यवस्था

  • जागतिक स्तरांवरील भव्य ग्रंथालय व संशोधन केंद्र

  • सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांकरिता खुले व्यासपी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Drone Delivery Service: दूध, किराणा, पॅकेजेस… सगळं थेट ड्रोनने घरी पोहोचणार! मुंबईत पहिली निवासी ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरू होणार, पण कधी?

Property Tax : नियमीत करदात्यांना २५ टक्के सवलत द्या; अभय योजनेतून तीन दिवसात १५.२७ कोटी वसूल

Pune Water Supply Close : पुणे शहराच्या बहुतांश भागाचा पाणी पुरवठा गुरूवारी राहणार बंद

Deglur Nagarparishad Election : नगराध्यक्षपदासाठी ११ उमेदवारी अर्ज; तर नगरसेवकपदासाठी १८९ जणांचा अर्ज

SCROLL FOR NEXT