Andaman Tour Package esakal
टूरिझम

Andaman Tour Package : मार्चमध्ये अंदमानला फिरायला जाण्याचा करा प्लॅन, IRCTC घेऊन आलय तगडं पॅकेज

अंदमान आणि निकोबार हा भारताचा केंद्रशासित प्रदेश असून हा संपूर्ण परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. येथील समुद्रकिनारे तर पर्यटकांचे विशेष लक्ष वेधून घेतात.

Monika Lonkar –Kumbhar

Andaman Tour Package : अंदमान आणि निकोबार हा भारताचा केंद्रशासित प्रदेश असून हा संपूर्ण परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. येथील समुद्रकिनारे तर पर्यटकांचे विशेष लक्ष वेधून घेतात. त्यामुळे, येथे नेहमीच देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी असते.

परंतु, या ठिकाणी जाणाऱ्या फ्लाईट्, येथील राहण्याचा खर्च आणि इतर अ‍ॅक्टिव्हिटीजचा खर्च त्यामुळे, अनेकदा पर्यटकांचा खिसा हा जड होतो. या सर्व कारणांमुळे अनेक जणांचे अंदमान-निकोबारला येण्याचे स्वप्न हे स्वप्न राहून जाते.

जर तुम्ही अंदमान-निकोबारला जाण्यासाठी चांगल्या ऑफर्स आणि डिस्काऊंट्सची वाट पाहत असाल तर IRCTC तुमच्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज घेऊन आले आहे. या पॅकेजमध्ये तुम्ही अगदी मोजक्याच पैशांमध्ये अंदमान-निकोबारला फिरायला जाऊ शकता. आज आपण IRCTC या पॅकेजबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

IRCTC ने ट्विट करत या पॅकेजची माहिती दिली

IRCTC ने या टूर पॅकेजची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, जर तुम्हाला अंदमान-निकोबारमधील सुंदर परिसर पहायचा असेल तर तुम्ही IRCTC च्या या अप्रतिम टूर पॅकेजचा नक्कीच लाभ घेऊ शकता.

कसे असणार हे पॅकेज

  • IRCTC चे हे अंदमान-निकोबार पॅकेज ५ रात्री आणि ६ दिवसांचे असणार आहे.

  • ट्रॅव्हल मोड – फ्लाईट

  • या पॅकेजमध्ये तुम्हाला हॅवलॉक, नील आयलॅंड, नार्थ बे आयलॅंड, पोर्ट ब्लेअर आणि रॉस आयलॅंड इत्यादी ठिकाणांना भेट देता येईल.

  • ५ मार्च २०२४ मध्ये तुम्ही या ट्रिपला जाऊ शकाल.

या पॅकेजसाठी किती पैसे लागणार?

  • या ट्रिपमध्ये जर तुम्ही एकटे जाणार असाल तर तुम्हाला तब्बल ६५ हजार ८१० रूपये मोजावे लागतील.

  • जर तुम्ही दोघे जण जाणार असाल तर प्रति व्यक्ती तुम्हाला ४९ हजार ३७० रूपये द्यावे लागतील.

  • जर तुम्ही तिघे जण या ट्रिपमध्ये जाणार असाल तर प्रति व्यक्ती ४७ हजार ८१० रूपये तुम्हाला या पॅकेजमध्ये भरावे लागतील.

  • जर तुमच्यासोबत लहान मुले असतील तर त्यासाठी तुम्हाला वेगळी फी भरावी लागेल. ५-११ वर्षांच्या मुलांसाठी तुम्हाला ४० हजार ९७० रूपये भरावे लागतील.

या पॅकेजमध्ये कोणत्या सुविधा मिळणार?

  • या पॅकेजमध्ये पर्यटकांना येण्या-जाण्याकरता फ्लाईटमध्ये इकॉनॉमी क्लासचे तिकिट मिळेल.

  • तसेच, हॉटेलची सुविधा देखील मिळेल.

  • या पॅकेजमध्ये पर्यटकांना सकाळचा नाश्ता आणि जेवण मिळेल.

  • तसेच, या पॅकेजमध्ये पर्यटकांना ट्रॅव्हल विमा देखील मिळेल.

IRCTC च्या पॅकेजचे असे करा बुकिंग

IRCTC च्या या अंदमान-निकोबार टूरचे पॅकेज तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवरून करू शकता. या व्यतिरिक्त IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमध्ये देखील तुम्ही बुकिंग करू शकता. या पॅकेजशी संबंधित अधिक माहिती तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT