हर्णे बंदरात मासळी खरेदीसाठी तुफान गर्दी
हर्णे बंदरात मासळी खरेदीसाठी तुफान गर्दी sakal
टूरिझम

हर्णे बंदरात मासळी खरेदीसाठी तुफान गर्दी ; पापलेट, सुरमईला डिमांड

राधेश लिंगायत

हर्णे (रत्नागिरी) : दिवाळी सुट्टीसाठी आलेल्या पर्यटकांची (Harne Tourism) सकाळी आणि संध्याकाळी रोजच हर्णे बंदरात मासळी खरेदीला रेकॉर्ड ब्रेक गर्दी होत आहे. त्यामुळे हर्णे बंदराला जत्रेचं स्वरूप आले आहे. कोरोनामुळे थांबलेल्या पर्यटन उद्योगाला सुरुवात होत आहे. सरकारने सर्वच उद्योगावरील उठवलेल्या बंदीमुळे कित्येक महिने कंटाळलेला पर्यटक आवर्जून ताजी मासळी व सुकी मासळी खाण्यासाठी व खरेदीसाठी  हजेरी लावू लागले आहेत. यावेळेस मासळीची आवक खूपच कमी असल्याने बंदरामध्ये असणाऱ्या चिमणी बाजारामध्ये (Chimani Market)मासळी खरेदीसाठी गर्दी दिसत आहे.

थंड अल्लाहदायक वातावरण, शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेला दाभोळ ते केळशी पर्यंतचा समुद्र किनारा यामुळे दापोलीला पर्यटन क्षेत्रात जागतिक नकाशावर एक महत्वाचे स्थान आहे. हर्णे बंदर हे दापोली तालुक्याचे मासळी उद्योगाचे मुख्य केंद्रबिंदू आहे. महाराष्ट्र किंवा इतर राज्यातील असो किंवा परदेशातील पर्यटक असो मासळी खरेदीसाठी हर्णे बंदरातच येतात. कोरोनाच प्रमाण त्यामानाने कमी होत असल्याचं दिसून येताच पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक फिरायला बाहेर पडू लागला आहे. दिवाळीच्या १५ दिवसाच्या सलग सुट्टीमुळे पाडव्याच्या मुहूर्तावर पर्यटक हजर झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात कंटाळलेला पर्यटक पर्यटनासाठी दापोलीमध्ये येऊ लागला आहे. दापोली तालुक्याची किनारपट्टीला व किनाऱ्यावर असणाऱ्या हॉटेल रिसॉर्टमध्ये पर्यटकची प्रचंड गर्दी होऊ लागले आहे.

दापोलीमध्ये आलेला पर्यटक हर्णे बंदरामध्ये आल्याशिवाय माघारी फिरत नाही. ऑगस्ट महिन्यापासून मासेमारीला सुरुवात झाली पण सुरुवातीपासूनच वारंवार वादळांच्या तडाख्यांमुळे गेले दोन महिने मासळीची आवकच झाली नाही. सप्टेंबर शेवटच्या आठवड्यापासून नौका मासेमारी करिता समुद्रामध्ये जायला लागल्या आहेत. आता येणाऱ्या मासळीमध्ये फिशमीलच प्रमाण जास्त असून खाण्यासाठी लागणाऱ्या मच्छीच प्रमाण खूप कमीच आहे. परंतु रोज जाणाऱ्या छोट्या होड्या किरकोळ मासळी आणत आहेत. त्याच मासळीच्या खरेदीसाठी पर्यटक गर्दी करत आहेत.

पर्यटक खास फिरणं आणि मासळी खाणे आणि खरेदीसाठी येऊ लागले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातुन येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला मासळी खाण्याचा एक वेगळाच विलक्षण आनंद असतो. दापोली तालुक्यात कोणत्याही ठिकाणी वास्तव्याला आलेला पर्यटक हर्णे बंदरामधील मासळीच्या वेगवेगळ्या जाती खाण्यासाठी येतच असतात. त्याप्रमाणे आता तालुक्यातील बहुतांशी हॉटेल व रिसॉर्टना झिंगा फ्राय, पापलेट थाळी, सुरमई थाळी, कोळंबी बिर्याणी आदी मासळीच्या चटकदार मसालेदार डिशेस खाण्यासाठी पर्यटकांची कोकणात यायला सुरुवात झाली आहे.

निसर्ग सौंदर्याची भुरळ पर्यटकांना पडतेच; परंतु कोकणी पद्धतीच्या घरगुती जेवणाची लज्जत ही वेगळीच असते.

सध्या केळशी, हर्णे, पाजपंढरी येथील छोट्या बोटी सकाळी मासेमारीला जाऊन विक्रीसाठी मासळी घेऊन बंदरात येत आहेत. अश्या छोट्या बोटींच्या आणि मोठ्या नौकाच्या कमी प्रमाणात येणाऱ्या मालावरच सध्या हर्णे बंदरात बाजार चालू आहे. छोट्या बोटी मात्र पापलेट, सुरमई, कोलंबी, बांगडा आदी प्रकारच्या मासळी घेऊन येत असल्याने पर्यटकांची मासळी खाण्याची व्यवस्था होत आहे. येथील निसर्ग सौंदर्याची भुरळ पर्यटकांना पडतेच; परंतु कोकणी पद्धतीच्या घरगुती जेवणाची लज्जत ही वेगळीच असते. 

दापोलीत आलो आणि हर्णे बंदरातली ताजी मासळी खाल्ली नाही असं एकाही पर्यटका कडून होत नाही. इथल्या ताज्या मिळणाऱ्या मासळीचे पर्यटकांना विशेष आकर्षण वाटते. मोठी सुरमई किंवा पापलेट असेल तर ते हातात घेऊन फोटो काढण्याचा मोह आवरतच नाही. सध्या ताजे मासे चिमणी बाजारातूनच पर्यटक खरेदी करत आहेत. तर काही थोडेफार लिलावातून देखील विकत घेण्याचा आनंद घेत आहेत. पाडव्यापासून बंदरात पर्यटकांचीच चिमणी बाजारामध्येच मासळी खरेदीसाठी तुफान गर्दी दिसत आहे. या गर्दीमुळे बंदरामध्ये एक प्रकारची जत्रा असल्यासारखं वातावरण निर्माण झाले आहे.

आम्हाला याठिकाणी खूप चटकदार अशी मासळी खायला मिळाली. तसेच येथे पापलेट, सुरमई, कोळंबी याप्रकारचे मासे योग्य दरात मिळाले. मासळी खायची आणि खरेदी करण्यासाठी हर्णे बंदरातच यावं अस मी आवर्जून सर्व पर्यटकांना सांगेन.

नितीन कापडीस, (धुळे)

कार्यवाह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT