Healthy Snacks During Travelling esakal
टूरिझम

Healthy Snacks During Travelling : उन्हाळ्यात प्रवास करताना ‘हे’ हेल्दी खाद्यपदार्थ ठेवा सोबत, अनेक समस्यांची होईल सुट्टी

Healthy Snacks During Travelling : उन्हाळ्यात प्रवास करताना खाण्यासाठी पौष्टिक खाद्यपदार्थांचे पर्याय कोणते आहेत?

Monika Lonkar –Kumbhar

Healthy Snacks During Travelling : उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांना सुट्ट्या लागतात. या सुट्ट्यांमध्ये पालक मुलांना सोबत घेऊन फिरायला जाण्याचे प्लॅन्स बनवतात. उकाड्यापासून दूर कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्यासाठी प्राधान्य दिले जाते. या दिवसांमध्ये प्रवास करताना खाण्यासाठी अनेक गोष्टींचे पॅकिंग केले जाते. परंतु, हे अन्न फार काळ टिकत नाही आणि उष्णतेमुळे अन्न खराब होते.

सोबत मुले असतील तर कोणते अन्नपदार्थ पॅक करायचे? याचे जास्त टेंन्शन असते. त्यामुळे, उन्हाळ्यात प्रवास करताना मुलांना खाण्यासाठी पौष्टिक खाद्यपदार्थांचे पर्याय कोणते आहेत? ते आज आपण जाणून घेणार आहोत. हे खाद्यपदार्थ तुम्ही सहज सोप्या पद्धतीने प्रवासात कॅरी करू शकता.

मिक्स ड्रायफ्रूट्स

प्रवास करताना अनेक जण सोबत वेफर्स ठेवतात. कारण, लहान मुले हे वेफर्स सहज खातात. परंतु, आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करायचे झाल्यास वेफर्स हा अजिबात चांगला पर्याय नाही. विविध प्रकारच्या चिप्समध्ये कॅलरीजचे भरपूर प्रमाण असते.

या कॅलरी लोडेड चिप्समुळे वजन आणि कॉलेस्ट्रॉल ही वाढते. त्याऐवजी तुम्ही प्रवासात मिक्स ड्रायफ्रूट्स ठेवा. या ड्रायफ्रूट्समध्ये काजू, मनुका, बदाम, खजू, अंजी, खरबूजाच्या बिया, भाजलेले हरभरे आणि शेंगदाणे देखील पॅक करू शकता. हे सर्व मिश्रित घटक खायला ही चांगले लागतात आणि आरोग्यासाठी ही चांगले असतात. शिवाय, हे मिक्स ड्रायफ्रूट्स खराब ही होत नाहीत.

केळीचे वेफर्स

बटाट्याच्या वेफर्सपेक्षा तुम्ही प्रवासात केळीचे वेफर्स सोबत ठेवू शकता. केळीच्या तुलनेत बटाट्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळते. त्यामुळे, केळीचे वेफर्स प्रवासात मुलांना खायला द्या.

हे पौष्टिक वेफर्स खाल्ल्याने पोट ही भरते आणि हे आरोग्यासाठी चांगले असतात. शक्यतो कमी मसाले आणि कमी तेलात बनवलेले चिप्स मुलांनाही खायला आवडतात. केळीचे चिप्स खाल्ल्याने गॅस आणि पित्ताची समस्या उद्भवण्याची शक्यता कमी असते. शिवाय, पोट ही बिघडत नाही त्यामुळे, प्रवासात बटाट्याच्या चिप्सऐवजी हे केळीचे पौष्टिक वेफर्स अवश्य सोबत ठेवा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल यांची शतकी खेळी! विक्रमांचा पाडला पाऊस, २००७ नंतर घडला मोठा पराक्रम

Crime News: लग्नाच्या पहिल्या रात्री खोलीत लावला छुपा कॅमेरा, पत्नीसोबतच्या खाजगी क्षणाचे व्हिडिओ दुबईतील मित्रांना पाठवले अन्...

KBC 17 मध्ये विचारला रामायणाबद्दल सोपा प्रश्न, स्पर्धक विचारच करत राहिली; तुम्ही लगेच उत्तर देऊ शकाल का?

Latest Marathi News Live Update: सुरत हायड्रोजन रेल्वे साइटवर केंद्रीय मंत्रींची पाहणी

IND vs WI 1st Test Live: ध्रुव जुरेलने शतकानंतर केलेल्या सेलिब्रेशन मागचं कारण काय? स्टोरी ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान Video Viral

SCROLL FOR NEXT