Himachal Travel Sakal
टूरिझम

Himachal Travel : हिमाचलच्या कुशीतली सुंदर नगीना; तुम्ही इथे भेट दिलीत का?

हिमाचल प्रदेशातील नारकंडा हे भारतातील सर्वात जुने स्कीइंगचे ठिकाण आहे.

सकाळ डिजिटल टीम

हिमाचल प्रदेश हे एक अद्भुत ठिकाण आहे, जिथे निसर्गाची सर्व सुंदर ठिकाणं पाहायला मिळतात. पण जर तुम्हाला सौंदर्यासह साहस अनुभवायचे असेल तर तुम्हाला नरकंडा येथे यावे लागेल. हिमाचल प्रदेशातील नारकंडा हे भारतातील सर्वात जुने स्कीइंगचे ठिकाण आहे.

Himachal Travel

नारकंडा हिल स्टेशन ही निसर्गाची देणगी म्हणायला हवी. येथील सौंदर्य कोणालाही भुरळ पाडेल. आम्ही तुम्हाला सांगतो की समुद्रसपाटीपासून सुमारे 2,700 मीटर उंचीवर असलेल्या नारकंडा हिल स्टेशनच्या आजूबाजूला हिरवळ आहे.

Himachal Travel

इथे आल्यावर दुसऱ्याच जगात फिरल्यासारखं वाटेल. जे शिमल्याला भेट देतात ते नारकंडाला जायला विसरत नाहीत. इथल्या सुंदर डोंगरावरून आपलं लक्ष दुसरीकडे वळवणं शक्यच नाही.

Himachal Travel

हातू शिखर हे नारकंडामधील सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे. नारकंडा हिल स्टेशनच्या सौंदर्याचे रत्न म्हणता येईल. हे नारकंडाच्या सर्वोच्च ठिकाणी वसलेले आहे, त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे 12,000 फूट आहे.

Himachal Travel

हातू मंदिराच्या 500 मीटर पुढे चालत गेल्यास तीन मोठे खडक दिसतील. त्यांच्याबद्दल असे म्हटले जाते की ती भीमाची चूल आहे. पांडवांना वनवासात राहावं लागल्यावर ते फिरताना या ठिकाणी थांबले आणि येथेच अन्न शिजवलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शिवभक्त, विष पचवतो; आईच्या नावाने शिवीगाळ प्रकरणी PM मोदी पुन्हा बोलले

Sharad Pawar : महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी जातीपातीचे राजकारण थांबवावे: शरद पवार

India-Pakistan Cricket Match : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून कोल्हापुरात ठाकरे आक्रमक, हॉटेलमध्ये सामना दाखवल्यास...

पाकिस्तानविरुद्ध सामन्यात अर्शदीप सिंगला संधी मिळणार? कशी असेल भारतीय संघाची प्लेईंग XI?

एकाच दिवशी तीन मराठी सिनेमे रिलीज ! केदार शिंदेंच्या मावशीने सुनावले खडेबोल "काही अतिशहाणे.. "

SCROLL FOR NEXT