trip plan
trip plan  sakal
टूरिझम

जून महिन्यात ट्रिपला जायचा प्लॅन आखताय,ही आहेत चार बेस्ट ठिकाणं...

दिपाली सुसर

शाळा-महाविद्यालयांतील मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्या जूनच्या अखेरीस संपतील. पण अडचण अशी की, नवीन शैक्षणिक वर्ष लगेच सुरू होणार आहे. कारण दोन वर्षाच्या मोठ्या गॅपमूळे यंदा कमी सुट्टया आहेत. त्यामुळे फिरायला जाण्यासाठी जून महिना हा तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.

अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला जूनमध्ये फिरायला जाण्यासाठी अशी चार ठिकाण सांगणार आहोत, जिथं तुम्ही कुटुंब, मुले, जोडीदार किंवा मित्रांसह जाऊ शकता. तेही सामान्य माणसांच्या बजेटमध्ये बसतील असे.

१) दार्जिलिंगल तुम्हाला उन्हाळ्यात फिरायला जायला दार्जिलिंग हे उत्तम ठिकाण आहे. जून महिन्यात दार्जिलिंगमध्ये भेट देण्यासाठी अतिशय सुंदर पर्यटन स्थळे आहे. तुम्ही दार्जिलिंगमधील टायगर हिल्सला भेट देऊ शकता. आरामदायी सुट्टीकरीता हे ठिकाण सर्वोत्तम असेल. येथे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत शांत ठिकाणी दर्जेदार वेळ घालवू शकता.
याशिवाय दार्जिलिंगच्या पीस पॅगोडाला भेट देता येते. हे एक बौद्ध तीर्थक्षेत्र आहे, जेथे भेट देण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही . दार्जिलिंगच्या सर्वात प्रसिद्ध घूम मठा पाहायला तुम्हाला जाता येतं .जो प्राचीन काळातील अगदी जुना मठ आहे. येथे तुम्ही 'टॉय ट्रेन'च्या प्रवासाचा आनंद घेऊ शकता तसेच बतासिया लूप, गोरखा वॉर मेमोरिअलला भेट देऊ शकता. येथील हवामानही उष्ण असणार नाही.
२) हिमाचल प्रदेश जूनमध्ये तुम्ही हिमाचल प्रदेशातील हिल स्टेशनला भेट देऊ शकता. हिमाचल प्रदेशमध्ये उन्हाळ्यात भेट देण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत, जिथं तुम्हाला नैसर्गिक सौंदर्याचे असंख्य नथारे पाहायला मिळतील .तसेच तुम्हाला रोमांचक प्रवास आणि थंड हवामानाचा अनुभव घेता येईल.
कमी पैशात तुम्ही हिमाचल प्रदेशातील हिल स्टेशनला भेट देऊ शकता. त्यात प्रामुख्याने कसोल, मनाली, लॅन्सडाउन आणि धर्मशाला यासह अनेक हिल स्टेशनला भेट देऊ शकता. येथे तुम्ही सुंदर दृश्यांमध्ये आरामशीर सुट्टी घालवू शकता.जर तुम्ही मित्र-मैत्रिणी सोबत गेला असाल तर तुम्ही अनेक साहसी उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता.
३)इंदूरचे धबधबे जर तुम्हाला कोणत्याही हिल स्टेशनवर जाता येत नसेल तर इंदूरचे धबधबे बघायला जा. ही ठिकाणे तुम्हाला उन्हाळ्यात थंडी अनुभवायला मिळतील, सोबतच एका वेगळ्या प्रवासाचा आनंदही घेतील. "मोहाडी धबधबा" हा इंदूरच्या प्रसिद्ध धबधब्यांपैकी एक आहे. येथे फारच शांतता अनुभवायला मिळते. त्यामुळे गर्दीपासून दूर आपल्या प्रियजनांसोबत पिकनिक करू शकता.
याशिवाय इंदूर मध्ये तुम्ही "पाताळपाणी" नावाचा प्रसिद्ध धबधबा सुध्दा पाहु शकता. हा धबधबा खूप खोल असून पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. तुम्हाला इंदूरमधील बामनिया कुंड फॉल्स देखील आवडेल.
४)माउंट अबू जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर जूनमध्ये तुम्ही माउंट अबू ला जाऊ शकता. उत्तर भारतातील हिल स्टेशन्स व्यतिरिक्त कुठेतरी नवीन ठिकाणी सुट्टी साजरी करायची असेल तर तुम्ही राजस्थानमधील एकमेव असणारे हिल स्टेशन माउंट अबूला जाऊ शकता.
माउंट अबू हे ग्रॅनाइट शिखर आहे, जिथे सर्व बाजूंनी वन्यजीव अभयारण्याचे दृश्य दिसते. जूनच्या उष्णतेमध्ये, तुम्ही आरामशीर आणि थंड वातावरणात येथे सुट्टी घालवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT