चंद्रभागेच्या तिरी Esakal
टूरिझम

पाहा आध्यात्मिक पर्यटनाची 'पंढरी' सोलापूर जिल्हा !

आध्यात्मिक पर्यटनाची "पंढरी' सोलापूर जिल्हा!

अरविंद मोटे

अवघ्या विश्‍वाचे आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग ज्या जिल्ह्यात प्रत्यक्ष वास करतो, तो सोलापूर जिल्हा म्हणजे आध्यात्मिक पर्यटनाची पंढरीच आहे.

सोलापूर : अवघ्या विश्‍वाचे आराध्य दैवत पंढरीचा (Pandharpur) पांडुरंग ज्या जिल्ह्यात प्रत्यक्ष वास करतो, तो सोलापूर जिल्हा (Solapur) म्हणजे आध्यात्मिक पर्यटनाची (Spiritual tourism) पंढरीच आहे. सोलापूरचे श्री सिद्धरामेश्‍वर (Shri Siddheshwar), अक्कलकोटचे (Akkalkot) श्री स्वामी समर्थ (Swami Samarth), बार्शीचा (Barshi) श्री भगवंत (Shri Bhagwant), मोहोळचा (Mohol) श्री नागनाथ (Shri Nagnath), करमाळ्याची (Karmala) आई कमलाभवानी (Kamlabhavani), माढ्याची (Madha) श्री माढेश्‍वरी (Shri Madheshwari) आदी देवी- देवंताबरोबर मंगळवेढ्याचे (Mangalwedha) संत दामाजी (Saint Damaji), कान्होपात्रा (Kanhopatra), चोखामेळा (Chikhamela), धामणगावचे संत माणकोजी बोधले महाराज, लऊळचे कुर्मदास अशा संतांची मांदियाळी या जिल्ह्याला लाभली. जिल्ह्याच्या सीमेवरील शिखर शिंगणापूर (Shikhar Shingnapur), आदिशक्ती आई तुळजाभवानीचे तुळजापूर (Tuljapur) व संत गोरोबा कुंभार यांचे इतिहासप्रसिद्ध तेर ही तीर्थक्षेत्रे हाकेच्या अंतरावर आहेत. यामुळे सोलापूर जिल्ह्याला आध्यात्मिक पर्यटनाचा पारंपरिक मोठा वारसा लाभला आहे.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पंढरपूर

जिल्ह्याला लाभलेला हा पांरपरिक वारसा व त्याचे धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व व्यवस्थितरीत्या जगासमोर मांडण्यात आले तर तिरुपती- बालाजी व शिर्डीच्या साईबाबांप्रमाणे जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनात सोलापूरची ख्याती सर्वदूर होईल. केवळ वारी काळापुरते या तीर्थस्थळांकडे न पाहता कायमस्वरूपी भाविकांना योग्य साधनसुविधा मिळाल्या तर राज्यातील भाविकांची पावले वारंवार सोलापूरकडे वळतील. भाविकांना देवदर्शनाबरोबरच येथील प्रसिद्ध खाद्यसंस्कृृती, माळरानावरील पक्षी वैभव, उजनी, हिप्परगा, कुरनूर, कोरेगाव (चुंब) येथील धरणांच्या निसर्गसौंदर्याचा अस्वाद घेता येईल. येथील हुरडा पार्टी, शेंगा चटणी, कडक भाकरी याची चव चाखलेला पर्यटक नक्कीच सोलापूरच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पंढरपूर

धार्मिक पर्यटकांना सोलापूरकडे वळवण्यासाठी सोलापूर शहरातील साधनसुविधा, वाहतूक सेवा उत्कृष्ट असायला हव्यात. शहरालगतची ठिकाणे सुसज्ज, स्वच्छ व प्रदूषणविरहित असणे आवश्‍यक आहे. सोलापूर शहराला लाभलेला सिद्धेश्‍वर तलाव, हिप्परगा तलाव, छत्रपती संभाजी तलाव या तलावात अत्याधुनिक व सुरक्षित बोटिंगची सुविधा असल्यास पर्यटकांची पावले निश्‍चितच तिकडे वळतील. तलावाकाठचे स्मृतीवन, विजयपूर रस्त्यावरील सिद्धेश्‍वर वनविहार यांचे जतन होणे आवश्‍यक आहे. विविध वृक्षवेली आणि पक्षी यांच्या वास्तव्याने ही ठिकाणे समृद्ध असल्यास येथील निसर्ग परिचय केंद्र व इकोलायब्ररी, फुलपाखरू उद्याने हे पक्षीप्रेमी व अभ्यासू पर्यटकांना नक्कीच आकर्षित करतील.

सोलापूर शहराला लाभलेला सिद्धेश्‍वर तलाव
उजनी धरण

ठळक बाबी

  • दक्षिण सोलापूरच्या कुडल संगम येथे प्राचीन हरहरेश्‍वर मंदिर

  • कुडल येथील संगमेश्‍वर मंदिरात मराठी भाषेतील पहिला शिलालेख

  • मंगळवेढ्यात माचणूरचे प्राचीन महादेव मंदिर व संगमदर्शन

  • जिल्ह्याला लाभली उत्कृष्ट खाद्य संस्कृती; शेंगा चटणी, कडक भाकरीला देशभर मागणी

  • माळढोक पक्ष्यासह माळराने व उजनी, हिप्परगा, कुरनूर येथे पक्षी वैभव

  • कृषी, पर्यावरण व अध्यात्माची हवी सांगड

मकर संक्रांतीला सोलापुरातील श्री सिद्धेश्वर मंदिरातील अक्षता सोहळा.

सोलापूर हे ज्वारीचे कोठार आहे. येथील हुरडा सर्वदूर प्रसिद्ध आहे. करमाळा येथील केळी, सांगोल्याचे डाळिंब यांनी जगभर प्रसिद्धी मिळवली आहे. जिल्ह्यात पूर्वीपासून असलेल्या द्राक्षांसह बोर, सीताफळ या फळांबरोबरच अलिकडे ड्रगन फ्रूट इतकेच नाहीतर खजूर आणि सफरंचदाच्याही लागवडी झाल्या आहेत. उजनी धरणातील नौकानयन, धरण क्षेत्रातील प्रसिद्ध मासळी, येथील पक्षी निरीक्षण अशा कृषी व पर्यावरण आध्यात्मिक पर्यटनाची एकत्रित सांगड घातल्यास जिल्ह्याला पर्यटन क्षेत्रातून मोठा रोजगार मिळवणे शक्‍य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT