टूरिझम

कुतुब मीनारशी संबंधित 8 मनोरंजक फॅक्ट्सबद्दल तुम्हाला माहितीय का?

सकाळ वृत्तसेवा

अनेक ऐतिहासिक आणि भव्य इमारतीही कुतुब मीनारच्या सभोवताल आहेत. हे ठिकाण युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे.

पुणे : जर तुम्ही दिल्लीला जात असाल तर कुतुब मीनार (Qutub Minar) पहायला विसरू नका. ही ऐतिहासिक इमारत इंडो-इस्लामिक आर्किटेक्चरचे उत्तम उदाहरण आहे. ही विटांनी बनलेली जगातील सर्वात उंच इमारत आहे. कुतुब मीनार (Qutub Minar)हे नाव कसे पडले यामागील इतिहासकार अनेक तर्कवितर्क सांगितले आहेत. काही इतिहासकारांचे मत आहे की, भारताचे पहिले मुस्लिम शासक कुतुबुद्दीन ऐबक यांच्या नावावर हे नाव ठेवले गेले. दुसरीकडे, काही इतर इतिहासकारांचा असा विश्वास आहे की कुतुब मीनार हे ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी यांच्या सन्मानार्थ ठेवले गेले होते, जे बगदादचे संत होते आणि इल्तुतमिश त्यांचा खूप आदर करतात. अनेक ऐतिहासिक आणि भव्य इमारतीही कुतुब मीनारच्या सभोवताल आहेत. हे ठिकाण युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे. चला तर मग त्याबद्दल काही मनोरंजक तथ्यांबद्दल जाणून घेऊयात. (interesting-facts-of-qutub-minar-in-delhi-historical-monument-article)

जगातील सर्वात उंच इमारत

कुतुब मीनारची उंची 72.5 मीटर आहे. त्यास 379 पायर्‍या आहेत, जे टॉवरच्या शिखरावर पोहोचतात. जमिनीवरील या इमारतीचा व्यास 14.32 मीटर आहे, जो शिखर गाठल्यावर 2.75 मीटरपर्यंत कमी होतो. या इमारतीचे आर्किटेक्चर भव्य दसते. कुतुब कॉम्प्लेक्सच्या दौर्‍यावर 10 मिनिटांचा एक चित्रपटदेखील प्रदर्शित करण्यात आला ज्यामध्ये कुतुब मीनार आणि कुतुब कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या इतर इमारतींबद्दल अनेक मनोरंजक गोष्टी समजतात.

कुतुब कॉम्प्लेक्समध्ये बर्‍याच ऐतिहासिक इमारती आहेत

कुतुब मीनार आजूबाजूला बर्‍याच मोठ्या ऐतिहासिक इमारतींनी वेढलेले आहे आणि त्या सर्व कुतुब कॉम्प्लेक्सच्या अंतर्गत येतात. या संकुलामध्ये दिल्लीचे लोखंडी स्तंभ, कुव्वत-उल-इस्लाम मस्जिद, अलई दरवाजा, इल्तुतमिशची कब्र, अलाई मीनार, अलाउद्दीनची मदरसा आणि कब्र, इमाम जमीनची कब्र आणि सेंडरसनच्या सन डायल इमारती आहेत जे पर्यटकांना आकर्षित करतात.

कुतुब मीनारचा वरचा भाग पुन्हा तयार करण्यात आला

कुतुब मीनारचा वरचा भाग वीज कोसळल्यामुळे नष्ट झाला होता, जो फिरोजशाह तुगलक यांनी पुन्हा बांधला. नंतरचे फ्लोर (मजले) आधीच्या तुलनेत अगदी भिन्न आहेत कारण ते पांढर्‍या संगमरवरीने बनलेले आहेत.

अपघातानंतर कुतुब मीनारच्या आत प्रवेश बंद झाला

1974 पूर्वी कुतुब मीनार सर्वसामान्यांसाठी खुले होते, परंतु 4 डिसेंबर 1981 रोजी येथे आलेल्या लोकांसह एक भयंकर अपघात झाला, त्यात चेंगराचेंगरीत 45 लोकांचा मृत्यू झाला. तेव्हापासून या इमारतीच्या आतील भागात प्रवेशास पूर्णपणे बंदी आहे.

देवानंद यांना शूट करायचे होते

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक देवानंद यांना येथून 'दिल का भंवर करे पुकार' गाण्याचे शूट करायचे होते, पण टॉवरच्या छोट्या-छोट्या ठिकाणी कॅमेरे बसू शकले नाहीत, यामुळे इथे शूटिंग होऊ शकले नाही, पण हे फील होण्यासाठी कुतुब मीनारचे रेप्लिकामध्ये शूटिंग केले गेले.

लोहस्तंभ 2000 वर्षांहून अधिक जुना आहे

कुतुब कॉम्प्लेक्समध्ये स्थित लोहस्तंभ पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. ही इमारत २००० हून अधिक वर्ष जुनी आहे, परंतु आजपर्यंत त्यास गंज चढलेला नाही आणि यामुळेच हे सर्वात विशेष आहे.

कुव्वत-उल-इस्लाम मस्जिद

कुव्वत-उल-इस्लाम कुतुब मीनारच्या शेजारी आहे. ही भारतात बांधलेली पहिली मस्जिद मानली जाते. याचा अर्थ 'इस्लाम ऑफ पॉवर' असा आहे. ही इमारत मुळात इस्लामची शक्ती व्यक्त करण्यासाठी बांधली गेली. ही मस्जिद हिंदू मंदिराच्या पायावर बांधली गेली. जर तुम्ही आजूबाजूला इकडे तिकडे गेलात तर येथे ही गोष्ट स्पष्टपणे पाहू शकता.

अलाउद्दीन खिलजी यांचे स्वप्न अपूर्ण राहिले

अलाउद्दीन खिलजीला कुतुब मीनारसारखी आणखी एक इमारत बांधायची होती, जी कुतुब मीनारच्या उंचीपेक्षा दुप्पट आहे. या इमारतीचे बांधकाम सुरू झाले, पंरतु ते पूर्ण होऊ शकले नाही. अलाउद्दीन खिलजीच्या मृत्यूच्या वेळी, त्यावेळी ही इमारत सुमारे 27 मीटर बांधली गेली होती, परंतु अलाउद्दीनच्या मृत्यूनंतर त्याच्या वंशजांनी हे काम महाग समजून हे काम थांबवले. त्याला 'आला मीनार' असे नाव देण्यात आले होते आणि ते अद्याप अपूर्ण आहे. हा मिनार कुतुब मीनार आणि कुव्वत-उल-इस्लाम मस्जिदच्या उत्तरेस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway Project : शक्तिपीठ महामार्ग होणारच, मंत्री उदय सामंतांचे कोल्हापुरात वक्तव्य; सर्वांना विश्वासात घेण्याचे आवाहन

Parbhani News: शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसांत होणार सुरळीत ; मनपाने एक कोटी ८५ लाख भरले; येलदरी, राहटी येथील पाण्याचे पंप सुरू

Latest Marathi News Live Update : थकबाकीमुळे लातूर शहराचा पाणीपुरवठा ५ दिवसांपासून बंद

Iran Israel Conflict : संघर्ष आणखीनच भडकला ! इस्रायलचा इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल क्षेत्रावर हल्ला; ५ ठार

Parbhani News: अवकाळीचा महापालिकेला दणका; दलदल, कचरा आला रस्त्यावर ; नालेसफाईचे पितळ पडले उघडे

SCROLL FOR NEXT