Mount Everest Sakal
टूरिझम

साद देती हिमशिखरे, आंतरराष्ट्रीय माऊंटन डेचे महत्व माहितेय?

शाश्वत पर्वतीय पर्यटन ही यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय माऊंटन डेची थीम आहे

भक्ती सोमण-गोखले

दरवर्षी ११ डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस (International Mountain Day म्हणून साजरा केला जातो). युनायटेड नेशन्स जनरल अॅसेंब्लीने (UNGA)ही तारीख निश्चित केली आहे,

युनायटेड नेशन्सने २००३ सालापासून हा दिवस पर्वताचे महत्व(Mountain Importance), पर्वताच्या विकासातील संधी आणि अडथळे अधोरेखित करून पर्वताविषयी आस्था असणाऱ्या लोकांमध्ये (People) सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी जागरुकता निर्माण करणे, हे या दिवसाचे उद्दीष्ट आहे.

Kalsubai mountain

शाश्वत पर्वतीय पर्यटनाचे महत्व

शाश्वत पर्वतीय पर्यटन ही यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय माऊंटन डेची थीम आहे. युएनच्या मते, जागतिक पर्यटनाचा विचार केल्यास माऊंटन टुरिझमच्या आकर्षणाची टक्केवारी सुमारे १५-२० टक्के आहे. शाश्वत पर्यटन हे अतिरिक्त आणि उदरर्निवाहाचे पर्याय तयार करण्यासाठी तसेच गरिबी निर्मूलन, सामाजिक समावेश तसेच लॅंडस्केप आणि जैवविविधता संवर्धनाला योगदान देण्यासाठी पाहिले जाऊ शकते.

युएनच्या म्हणण्यानुसार, ' नैसर्गिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारश्याचे जतन करण्यासाठी, स्थानिक हस्तकला आणि उच्च मूल्य असलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक सणांसारख्या पारंपारिक पद्धती साजरे करण्याचा हा मार्ग आहे'.

सध्या सुरू असलेल्या कोरोना साथीचा वाईट परिणाम पर्यटन क्षेत्रावर झाला आहे, साथीच्या आजाराच्या निर्बंधामुळे पर्वतीय समुदायांच्या असुरक्षा आणखी वाढल्या आहेत. युएनच्या म्हणण्यानुसा, आरोग्याच्या समस्या, संकटाला पर्वतीय पर्यटन, त्याचा नैसर्गिक संसाधने आणि उपजीविकेवर होणारा परिणाम यावर पुनर्विचार करण्याची संधी म्हणून पाहायला हवे.

Nandadevi and Sunandadevi Mountain

पर्वतांचे महत्व

युएनच्या (UN)मते, जागतिक लोकसंख्येच्या १५ टक्के लोक पर्वतांमध्ये राहतात. ते माणुसकीच्या नात्याने लोकांना दैनंदिन जीवनासाठी ताजे पाणी (Water) पुरवितात. जगभरात जैवविविधता जपणाऱ्या हॉटस्पॉटमध्ये निम्मे पर्वत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT