IRCTC  sakal media
टूरिझम

IRCTC Package : झुक-झुक गाडी नववर्षात घडवणार परदेशवारी; प्रवाशांसाठी IRCTC चं न्यू इअर गिफ्ट

प्रवासी या पॅकेजमध्ये थायलंडला अगदी कमी खर्चात प्रवास करू शकणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

IRCTC Package : भारतीय रेल्वेतून आपल्यापैकी प्रत्येकानेच प्रवास केला असेल. यापैकी काही प्रवास तुमच्या कायम स्मरणातही असतील. असाच एक कायम स्मरणात राहणारं टूर पॅकेज घेऊन भारतीय रेल्वेने योजना आखली आहे. भारतीय रेल्वेचे हे टूर पॅकेज भारताततील नव्हे तर परदेशात फिरण्यासाठी आहे.

हेही वाचा- Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

'थायलंड स्प्रिंग फेस्टिव्हल टूर एक्स कोलकाता' असे या पॅकेजचे नाव असून प्रवासी या पॅकेजमध्ये थायलंडला अगदी कमी खर्चात प्रवास करू शकणार आहेत. हा टूर 21 जानेवारी 2023 पासून सुरू होणार आहे. यासाठी कोलकाता येथून थेट विमानसेवा उपलब्ध असणार आहे. या पॅकेजमध्ये प्रवाशांना प्रथम बँकॉक आणि नंतर तेथून पटायाला नेले जाणार आहे.

कसं असणार टूर पॅकेज

IRCTC च्या या पॅकेजमध्ये 5 रात्री आणि 6 दिवस थायलंडला भेट देता येणार आहे.या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला थायलंडमधील सर्वोत्तम ठिकाणांना भेट दिली जाणार आहे. यासाठी IRCTC कडून हॉटेल, विमान तिकीट यांसारख्या अनेक सुविधाही पुरवल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे हा टूर बजेट फेंड्ली असणार आहे.

किती येणार खर्च

IRCTC चं हे पॅकेज बजेट फेंड्ली असणार आहे. या पॅकेजअंतर्गत तुम्हाला सोलो ट्रिपसाठी 54,350 रुपये खर्च करावे लागतील. कपलसाठी या टूरसाठी प्रति 46,100 रुपये पे करावे लागणार आहेत. जर तीन लोक एकत्र सहलीला जाण्याचा प्लान करत असतील तर, यासाठी प्रति व्यक्ती 46,100 रुपये आकारले जातील.

टूर पॅकेज तपशील

भेट देण्याची ठिकाणे - बँकॉक आणि पटाया

प्रवासाची तारीख - 21 ते 26 जानेवारी 2023

टूर कालावधी - 6 दिवस/5 रात्री

ट्रॅव्हल मोड - फ्लाइट

बोर्डिंग पॉइंट - कोलकाता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : बाजीराव रोडवरील हत्या प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींना अटक; तिघेही अल्पवयीन

Satara Municipal Election: मराठ्यांच्या राजधानीत हवा मराठाच नगराध्यक्ष?; साताऱ्यात दाेन्ही राजेंकडून मनोमिलनाचे संकेत मिळताच चर्चांना उधाण

माेठी बातमी! 'महाबळेश्वर तालुक्यातील छमछमवर पाेलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा; बंगल्यावरील धक्कादायक प्रकार उघडकीस..

Ramraje Naik-Nimbalkar: नार्को चाचणी त्यांची त्यांनीच करावी: रामराजे नाईक-निंबाळकर; एकाही घटनेच्या मागे मी आहे, सिद्ध करून दाखवा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना देणार भेटी

SCROLL FOR NEXT