Kas flower plateau
Kas flower plateau esakal
टूरिझम

साताऱ्यातून पर्यटकांसाठी मोठी बातमी; कास पठार 25 ऑगस्टनंतर सुरु

सूर्यकांत पवार

कास (सातारा) : जागतिक वारसास्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारावरील (Kas flower plateau) नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांचा आनंद लुटण्यासाठी पठार पर्यटकांना (Tourists) यावर्षी खुले करण्यात येणार असून कोरोनाचे (Coronavirus) नियम पाळत ऑनलाइन बुकिंगने (Online Booking) पर्यटकांना प्रवेश दिला जाणार असल्याचा निर्णय कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. येत्या पंचवीस ऑगस्टनंतर स्थानिक परिस्थितीनुसार, एक सप्टेंबरपर्यंत अधिकृतरित्या फित कापून हंगामाचे उद्घाटन करण्यात येईल.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षीचा फुलांचा हंगाम पर्यटकांसाठी खुला करण्यात आला नव्हता.

पर्यटकांसाठी येत्या 25 ऑगस्टनंतर 'पठार' खुले

Kas Pathar Season 2021 : हंगाम पर्यटकांना खुला करण्यासाठी व पदाधिकारी निवड करण्यासाठी नियोजनाची बैठक नुकतीच पार पडली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षीचा फुलांचा हंगाम पर्यटकांसाठी खुला करण्यात आला नव्हता. मात्र, नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे खुली करण्याचा निर्णय घेतल्याने कास पठाराच्या संयुक्त कार्यकारी वन समितीने (Joint Executive Forest Committee) बैठक आयोजित करून पुष्प पठार पर्यटकांसाठी येत्या २५ ऑगस्टनंतर खुले करण्याचा निर्णय घेतला आहे.

Kas flower

पठार फिरण्यासाठी इतकी असणार 'प्रवेश फी'

कोरोनाचे नियम पाळून ऑनलाइन बुकिंगनेच पठारावर प्रवेश दिला जाणार असून प्रति माणसी १०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. वाहन पार्किंग, गाईड शुल्क, बस प्रवास, कॅमेरा शुल्क आदींसह अन्य शुल्कही द्यावे लागणार आहेत. या बैठकीला सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले, जावळीचे वनक्षेत्रपाल रंजनसिंह परदेशी, वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण व सहा गावचे वनसमितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Kas Pathar Season

सप्टेंबर महिन्यात फुलांचे गालिच्छे पाहायला मिळणार

सध्या हलक्या स्वरूपाचा पाऊस असल्याने पठारावर रानहळदीची पांढरी फुले पहायला मिळत असून काही विविध जाती-प्रजातींच्या फुलांच्या तुरळक कळ्या उमलू लागल्या आहेत. येत्या दहा पंधरा दिवसांत पठारावर रंगीबेरंगी फुले पहायला मिळणार असून सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात फुलांचे गालिच्छे पाहायला मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

फुलांचा हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून कर्मचारी प्रशिक्षण व इतर आवश्यक तयारी झाली, की पंचवीस ऑगस्टनंतर दोन-तीन दिवसांत अधिकृतपणे हंगाम सुरू करण्यात येईल.

-आर. एस. परदेशी, वनक्षेत्रपाल, मेढा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरू चेन्नई प्लेऑफच्या एका जागेसाठी भिडणार, पण पावसाचे अंदाज काय?

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT