Kas Pathar season esakal
टूरिझम

'कास'वर पर्यटकांचा ओघ वाढला; सलग सुट्ट्यांमुळे पठारावर मोठी गर्दी

फुलांचे गालिचे दिसण्यास आठ दिवस लागणार

सूर्यकांत पवार

कास (सातारा) : कास पठार हंगाम (Kas Pathar season 2021) सुरू झाल्यानंतर आलेल्या सुटीच्या पहिल्याच शनिवार व रविवारचा मुहूर्त साधत हजारो पर्यटकांनी कास पुष्पपठाराला भेट देऊन फुलांचा आनंद घेतला. कासच्या हंगामाची सुरुवात २५ ऑगस्टपासून झाली. त्यानंतर शनिवार, रविवारनंतर आज (सोमवारी) श्रीकृष्ण जन्माष्टमी (Shri Krishna Janmashtami) व गोपाळकाल्‍यामुळे सलग सुट्ट्या आल्याने कासवर पयर्टकांची गर्दी झाली होती.

आज (सोमवारी) श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाल्‍यामुळे सलग सुट्या आल्याने कासवर पयर्टकांची गर्दी झाली होती.

कास पठार कार्यकारी समितीकडून पार्किंगपासून बसद्वारे पर्यटकांना सोडण्यात येत होते. पठारावर सद्य:स्थितीत चवर (रानहळद), जंगली आले, कापरू (बिगोनिया), पाचगणी अमरी, पंद, पांढरी हळदी, निसुरडी, आभाळी, नभाळी, कुमुदिनी, ड्रॉसेरा इंडिका व बरमानी आदी फुले आली आहेत. फुलांचे गालिचे अद्यापही झालेले नसले तरी दुर्मिळ अशा प्रजाती पाहण्यात पर्यटक दंग आहेत. ऊन-पावसाचा खेळ, मधूनच धुक्याची चादर, थंड वारा यामुळे कासवरील वातावरण अल्हादायक झाले आहे.

Kas Pathar season

कास पठार पाहिल्यानंतर अनेक पर्यटक कास तलाव, बामणोली बोटिंग, वजराई धबधबा, एकीव धबधबा आदी ठिकाणांना भेटी देऊन निसर्गाचा आनंद लुटत आहेत. काल (शनिवारी) १,०३५ व आज एक हजारांहून आधिक पर्यटकांनी कास पठारला भेट दिली. आतापर्यंत ५ दिवसांत तीन हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. दहा ते १५ टक्के फुले आली आहेत. या वर्षीचे वैशिष्‍ट्य म्हणजे कुमुदिनी ही सप्टेंबरमध्ये येणारी वनस्पती लवकर आली आहे. फुले उमलण्यास आणखी ८ ते १० दिवस लागतील, अशी माहिती माजी वनपाल श्रीरंग शिंदे यांनी दिली.

पठारावर फुले कमी प्रमाणात आली असली तरी येथील निसर्ग अल्हादायक असल्याने मन आनंदून जाते. समितीचे नियोजन सुंदर आहे. मात्र, गेटच्या आत गेल्यावर दिशादर्शक फलकांचा अभाव असल्याने धुक्यामुळे कोठून कोठे जायचे, हे कळत नाही.

-विजय काळे, पर्यटक, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT