Kashid Beach
Kashid Beach  esakal
टूरिझम

Kashid Beach : एका रोमांचक अशा शांत ठिकाणी फिरायला जायची इच्छा आहे? या ठिकाणी प्लॅन करू शकता

सकाळ डिजिटल टीम

Kashid Beach : विकेंड आणि न्यू इयर दोघंही जवळ येतं आहे अशात तुम्हीही कुठे तरी फिरायला जायचा प्लॅन करत असालच, पण या दिवसात कुठेही जायचं म्हटल तरी गजबजाट असतोच आणि खूप लोक असतात त्यात आपल्याला फिरण्याची मजा येईलच अस नाही.

तुम्ही इथे आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर, भावंडांबरोबर, जोडीदारासोबत, पूर्ण परिवारासोबत किंवा अगदी एकटेही जाऊ शकतात. अलिबागच्या वेशीला हा बिच आहे. मुळात या जागेबद्दल अजूनतरी खूप लोकांना माहिती नसल्याने इथे पर्यटक कमी येतात आणि स्वच्छताही खूप आहे. काशिदच स्पटिकासारख नितळ पाणी आणि आजूबाजूची हिरवळ सगळ्यांना संमोहित करते. महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकण प्रदेशाच्या दिशेने अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर हा बिच आहे.

नक्की कोणत्या ऋतूत फिरायला जाव?

असा काही स्पेसिफिक ऋतू नसला तरी तुम्ही काशिदला हिवाळ्यात जाऊ शकतात ही वेळ एकदम उत्तम आहे. इथे बोट रायडिंग, स्विमिंग आणि अनेक मनोरंजक गोष्टी तुम्ही करू शकतात.

काशिदचे वैशिष्ट्ये

- हा खूप स्वच्छ आणि शांत समुद्र किनारा आहे मुळात याला भेट देयला पैसे घेतले जात नाही

- इथे तुम्ही आपल्या गाड्या विनामूल्य पार्क करू शकतात.

- तुम्हाला हवं तर तुम्ही पाण्यात खेळू शकतात, हॉर्स रायडिंगचा सुद्धा पर्याय इथे उपलब्ध आहे.

- आजूबाजूचे हिरवेगार झाडं, स्वच्छ पाणी इथे तुम्हाला खूप शांत वाटू शकत.

- इथे छोटे मोठे खाण्याचे स्टॉल सुद्धा आहेत.

काशीद बिचजवळची बाकीची ठिकाणं

1. फणसाड वन्यजीव अभयारण्य : अंदाजे 12-13 किमी हे इथून दूर आहे. सुमारे 6979 हेक्टर जमिनीच्या मोठ्या क्षेत्रावर पसरलेल, फणसाड वन्यजीव अभयारण्य प्रामुख्याने किनारपट्टीच्या जंगलाच्या संरक्षणासाठी आहे. सर्व वन्यजीव प्रेमी आणि निसर्ग प्रेमींसाठी हे एक उत्तम गेटवे आहे, ज्यामध्ये विविध वन्यजीवांचे प्रदर्शन करणारे चार प्रमुख मार्ग आहेत.

2. कोरलाई किल्ला : रेवदंडा खाडीकडे जाताना, 1521 मध्ये पोर्तुगीजांनी बांधलेले हे ऐतिहासिक आश्चर्य लागते. त्याला एकूण 11 दरवाजे आहेत, त्यापैकी प्रत्येकाला पोर्तुगालच्या संतांचे नाव दिले गेले आहे. आजूबाजूचे गाव आणि आश्चर्यकारक किनारपट्टीचे निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी कोरलाई किल्ला हे सर्वोत्तम ठिकाण आहे.

3. मुरुड जंजिरा किल्ला : मुरुड गावाच्या किनार्‍यावर वसलेला, मुरुड जंजिरा किल्ला ही एक मजबूत रचना आहे जिथे बोटीने जाता येतं. हा सागरी किल्ला 26 गोलाकार बुरुजांनी वेढलेला आहे, त्यातील प्रत्येक बुरुज अजूनही मजबूत आणि अबाधित आहे!

काशीद बीचवर कसे जायचे

मुंबईपासून 125 किमी अंतरावर वसलेल हे कमी माहितीत असलेलं ठिकाण, इथे पोहोचणं तसं सोप्प आहे. जर तुम्ही पुणे किंवा मुंबईतून प्रवास करत असाल, तर इथले रस्ते खूप सुंदर आहेत. मुंबईपेक्षा पुणे तुलनेने काशीद बिच जवळ आहे. पुण्याहून, तुम्हाला पोहोचण्यासाठी अंदाजे 4 तास लागतील, तर मुंबईपासून तुम्हाला पोहोचण्यासाठी अंदाजे 4-4.5 तास लागतील.

विमानाने: मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे काशीद बीचपासून सर्वात जवळ आहे. विमानतळ ते काशीद बीच हे अंतर सुमारे 135-136 किमी आहे आणि हे विमानतळ देशातील आणि जगभरातील जवळपास सर्व प्रमुख शहरांशी जोडलेले आहे.

रेल्वेमार्गे: काशीद बीचपासून सुमारे 50 किमी अंतरावर असलेले, रोहा रेल्वे स्टेशन सर्वात जवळ आहे. हे रेल्वे स्टेशन विशेषतः कोकण मार्गाने चांगले जोडलेले आहे.

रस्त्याने : काशीदला जाणार्‍या रोड ट्रिप जेवढ्या मजेदार आहेत तेवढ्याच त्या सुंदरही आहेत. शहरांपासून काशीदकडे जाणारा हा निसर्गरम्य मार्ग म्हणजे डोळ्यांसाठी अक्षरशः मेजवानी आहे. जर तुम्हाला बसने येयचं असेल तर तुम्हाला अलिबागला यावं लागेल आणि तिथून टॅक्सी किंवा ऑटो रेंटल करू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT