मेघालय ट्रीप Esakal
टूरिझम

Mehgalaya Trip प्लॅन करताय? मग शिलाँगमधील या ७ ठिकाणांना नक्की भेट द्या

मेघालय हे भारतातील एक सुंदर प्रेक्षणीय स्थळ आहे. तसंच भारतातील प्रसिद्ध अशा ट्रॅव्हल डेस्टिनेशन्समध्ये मेघालयला मोठी पसंती दिली जाते. त्यामुळेच जर तुम्ही मेघालय ट्रीप प्लॅन करत असाल इथल्या काही ठिकाणांना नक्की भेट द्या

Kirti Wadkar

मेघालय हे भारतातील  एक सुंदर प्रेक्षणीय स्थळ आहे. तसंच भारतातील प्रसिद्ध अशा ट्रॅव्हल डेस्टिनेशन्समध्ये मेघालयला मोठी पसंती दिली जाते. त्यामुळेच जर तुम्ही मेघालय ट्रीप प्लॅन करत असाल इथल्या काही ठिकाणांना नक्की भेट द्या. खास करून मेघालयची राजधानी असलेल्या शिलाँगमध्ये तुम्हाला तुमच्या ट्रीपचा अधिक आनंद घेता येईल. Know Best places to visit in shillong Meghalaya Marathi Tourism News

निसर्गाची देणं असलेल्या मेघालयमध्ये Meghalaya फिरताना शिलाँगमध्ये घेतलेला स्टॉप तुम्हाला दुप्पट आनंद देईल. इथल्या सुंदर निसर्गासोबतच सुंदर तळी Lakes तुमचं लक्ष वेधून घेतील. ऍडव्हेंचर प्रेमींसाठी शिलाँगही उत्तम पर्यटन Tourism स्थळ आहे. शिलाँगमध्ये पाहण्यासारखे काही खास पॉइंट्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची मेघालय ट्रीप वसूल होईल. Must Visit places in shilong 

उमियम तळं- शिलाँगपासून १५ किलोमिटर अंतरावर उमियम हे मानवनिर्मित तळं आहे. १९६० साली हे जलाशय उमियम नदीवर तयार करण्यात आलं आणि तेव्हापासूनच ते पर्यटकांसाठी आकर्षणाचं ठिकाण ठरलं आहे. या या जलाशयातील निळशार पाणी आणि सभोवतालचं निसर्ग हे लॅण्डस्केप फोटोग्राफीसाठी उत्तम ठिकाण आहे. त्यासोबत इथे तुम्ही बोटिंग, कायकिंग अशा वॉटर स्पोर्टसची मजा लूटू शकता. 

एलिफंट फॉल्स Elephant Falls - शिलाँगमधील एलिफंट फॉल्स हा धबधबा मेघालयमधील लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. या धबधब्याजवळील रम्य निसर्ग आणि काचेसारखं स्वच्छ पाणी आणि त्याचा खळखळणारा आवाज हे मनाला तृप्त करणारं आहे. 

शिलाँग पीक- शिलाँग पीक हे शिलाँग आणि मेघालयमधील सर्वात उंच ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून ६ हजार ४४९ फूट उंचीवर असलेल्या या ठिकाणावरून संपूर्ण शिलाँगसह संपूर्ण मेघालय इतकच काय तर बांग्लादेशचाही अद्भूत नजारा पाहायला मिळतो. शिलाँग पीकवर भारतीय वायू सेनेचं रडारही आहे. त्यामुळेच इथे सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी घेतली जाते. Shillong trip advise 

हे देखिल वाचा-

डेव्हिड स्कॉट ट्रेल- तुमची शिलाँग ट्रीप आणखी ऍडव्हेंचरस बनवण्यासाठी तुम्ही डेव्हिड स्कॉट ट्रेलला नक्की भेट द्या. इथे तुम्ही १६ किलो मिटरची ट्रेकिंग ट्रेल आणि हॉर्स कार्ट ट्रेलचा आनंद घेऊ शकता. या सुंदर पायवाटेवर ट्रेक करत असताना तुम्हाला असंख्य धबधबे, खळखळून वाहराणा स्फटिकासारखं स्वच्छ पाणी , घनदाट दऱ्या आणि जंगलातील झाडांचं विलोभनिय दृष्य मनाला आनंद देईल. निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीची आवड असलेल्यांना या जागेवर नक्कीच जीव जडेल. 

लेडी हैदरी पार्क- शिलाँगमधील लेडी हैदरी पार्क हे  जपानी गार्डनिंगच्या धर्तीवर तयार करण्यात आलं आहे. या पार्कमध्ये तुम्ही रंगीबेरंगी मासे आणि बदकं अगदी जवळून पाहू शकता. तसंच या उद्यानातील ऑर्किड आणि रोडोड्रेंडोनची फूल पर्यटकांना आकर्षित करतात.

पुलिस बाजार- कोणत्याही पर्यटन स्थळाला भेट देताना तिथल्या प्रसिद्ध बाजार पेठेला भेट दिल्याशिवाय ट्रीप पूर्ण होणं अशक्यच. यासाठीच शिलाँगमध्ये फिरत असताना पुलिस बाजारला नक्की भेट द्या. लोकल फूड म्हणजेच स्थानिक पदार्थांची चव चाखायची असेल किंवा कपड्यांची खरेदी तसचं स्थानिक कलाकुसरीच्या वस्तू सारं काही तुम्हाला या बाजारपेठेत मिळेल. या बाजाराला भेट दिल्याशिवाय तुमची ट्रीप पूर्ण होणार नाही. त्यामुळे पुलिस बाजारला नक्की भेट द्या.

डॉन बॉस्को संग्रहालय- कोणत्याही ठिकाणाला भेट देत असताना तिथली संस्कृती आणि इतिहास जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. शिलाँग शहराला भेट देत असताना डॉन बॉस्को संग्रहालयाला नक्की भेट द्या. इथली आदिवासी संस्कृती आणि मेघालयाची संस्कृती आणि इतिहासाबद्दल इथं तुम्हाला उत्तम माहिती मिळेल. हे संग्रहालय ७ मजली असून इथे एकूण १७ गॅलरी आहेत. या दालनांमध्ये वेगवेगळ्या कलाकृती, पेंटिंग आणि विविध मूर्ती पाहायला मिळतात.

यासह शिलाँगमध्ये तुम्ही वॉर्डस् लेक, लॅटलम दरी आणि कॅथड्रल चर्च या ठिकाणांनाही भेट देऊ शकता. सोबतच तुम्ही इथले काही प्रसिद्ध स्थानिक पदर्थ म्हणजेच मोमोज, जदोह, तुंगारामबाई, क्यात, कटुंग आणि कीकटू यांच्या मेजवानीचा आनंदही घेऊ शकता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT