Mahashivratri 2024  esakal
टूरिझम

Mahashivratri 2024 : आश्चर्य! हजार वर्षांपूर्वी सॅटेलाईट नसतानाही शंकरांची ही मंदिरे एकाच रांगेत कशी साकारली!

यापैकी दोन मंदिरे वेगळीकडे आहेत? असे का हे एक कोडेच आहे!

सकाळ डिजिटल टीम

Mahashivratri 2024 :

हजारो वर्षाआधी कोणताही सॅटेलाईट नव्हता तरी देखील एकाच रांगेत भगवान शंकरांची पाच मंदिरे आहेत. हि मंदिरे एकाच रांगेत कशी उभारण्यात आली हे एक कोडेच आहे. आज महाशिवरात्रीनिमित्त या खास मंदिरांची माहिती जाणून घेऊयात.

विश्वाचा रचयिता ब्रह्मा, विश्वाचा रक्षणकर्ता विष्णू यांच्यानंतर पंचभूताधारी भगवान शंकर पूजनीय आहेत. पृथ्वी, पाणी, आग, हवा आणि आकाश या सृष्टीच्या पाच मुलभूत तत्वांना पंच महाभूते म्हणतात, त्यांचे नियंत्रण हे भगवान शंकरांकडे असते असे मानले जाते.

दक्षिण भारतात पाच मंदिरे आहेत ज्यांच्याकडे याच पंचमहाभूतांची प्रतीके म्हणून पहिले जाते. यांना पंचमहाभूत स्थळे या नावाने देखील ओळखले जाते. ही पाचही मंदिरे भगवान शंकरांना समर्पित आहेत म्हणजेच येथे भगवान शंकरांची पूजा केली जाते. महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव असतो.

खास वैशिष्ट्य

या पाच मंदिरांबद्दल विशेष गोष्ट म्हणजे या पाचही मंदिरांचे बांधकाम यौगिक विज्ञानानुसार करण्यात आले आहे. त्यामुळे या मंदिरांची भौगोलिक स्थिती पाहता ही मंदिरे एकमेकांशी भौगोलिकदृष्ट्या जोडलेली आढळून येतात.

पाच पैकी तीन मंदिरे अगदी बरोबर ७९ अंश ४१ मि पूर्व रेखांशावर एका रांगेत स्थित आहेत. चिदंबरम नटराजना मंदिर, कांचीपुरम एकंबरेश्वर मंदिर आणि श्रीकालहस्ती मंदिर ही तिन्ही मंदिरे बरोब्बर एकाच रांगेत आहेत.

या पाच मंदिरांपैकी चार मंदिरे तामिळनाडू राज्यामध्ये असून एक मंदिर हे आंध्र प्रदेशामध्ये आहे. दक्षिण भारतातील भाविकांमध्ये या पाच मंदिरांबद्दल पराकोटीची आस्था आहे.

जल देवतेचे मंदिर - थिरूवनाईकावल मंदिराच्या आतल्या गाभाऱ्यामध्ये पाणी पाझरते.

जल देवतेचे मंदिर

अग्नीदेवाचे मंदिर - थिरूवन्नामलाई मंदिरामध्ये दरवर्षी कार्तीकाई दिपम नावाचा सोहळा साजरा केला जातो. हा दीप आगीचे अस्तित्व दर्शवतो म्हणून हे मंदिर आग या तत्वाचे प्रतिक आहे.

अग्नीदेवाचे मंदिर

वायुदेवतेचे मंदिर - श्रीकालहस्ती मंदिरामध्ये ‘फडफडणारा दिवा’ आहे. जो हवेचे अस्तित्व दर्शवतो.  

 

वायुदेवतेचे मंदिर

पृथ्वीचे मंदिर - कांचीपुरम एकंबरेश्वर मंदिरामधील मातीचे स्वयंभू लिंग पृथ्वीशी साधार्म्य दर्शवते.

 

पृथ्वीचे मंदिर

आकाशाचे मंदिर- चिदंबरम नटराजना मंदिरचे प्राचीन ग्रंथांमध्ये अनादी अनंत असे वर्णन केले आहे. हे वर्णन आकाशाचे अस्तित्व दर्शवते.

आकाशाचे मंदिर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT