टूरिझम

गुजरातमधील देवगड बरिया आहे पर्यटनासाठी प्रसिध्द..

भूषण श्रीखंडे

जळगाव ः गुजरात (Gujarat) राज्यात अनेक संस्कृती आपण्यास पाहायला मिळतील. गुजरातमधील असेच एक शहर आहे देवगड बरिया ज्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. या शहराचा उल्लेख इतिहासाच्या पानांमध्येही आहे. येथे अनेक पर्यटक फिरण्यासाठी येत असतात चला तर जाणून घेवू या शहराबद्दल..

देवगड बद्दल माहिती..

देवगड बरिया हे गुजरात राज्याच्या पूर्व सीमेच्या पायथ्याशी असून एक छोटे शहर आहे. पनम नदीवर हे शहर वसलेले असून येथे राजघराण्यांचा वारसा आजही येथे अस्तित्वात आहे, जे गुजरातमधील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथे अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही फिरायला देखील जाऊ शकता आणि अनेक सुंदर गोष्टींचा आनंद घेऊ शकता.

दरबार गड

सुमारे 1540 साली दरबार गड बांधण्यात आला असून हे त्यावेळीचे शाही निवासस्थान होते. येथील वास्तुकला ही पारंपारिक आणि युरोपियन हस्तकलेचा उत्तम एक नमुना आहे. हे जवळपास संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. दूरदूरवरून हे ठिकाण पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. तसचे इथल्या भिंतींवर गणपतीच्या अनेक सुंदर मूर्तीही पाहायला मिळतात.

रतनमहल अभयारण्य

रतनमहल स्लॉथ बेअर अभयारण्य हे देवगड बरिया मधील प्रमुख पर्यटन स्थळापैकी एक आहे. येथे 11 गावांचा समावेश असून अतिशय सुंदर ठिकाणे आहेत. येथे अस्वलांच्या अनेक प्रजाती सापडतात. तसेच अनेक वनस्पती व अन्य प्राणी देखील आढळतात. हे ठिकाण भारतात प्रसिद्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT