Tripura 
टूरिझम

त्रिपुराची ही ठिकाणे आहे सौंदर्याने परिपूर्ण

त्रिपुरा राज्य हिमालय पर्वताजवळ वसलेले आहे येथे अनेक सुंदर पर्यटन स्थळे आहेत.

भूषण श्रीखंडे

जळगाव ः भारतातील सर्वात लहान राज्यापैकी एक असलेले त्रिपुरा (Tripura) राज्य हिमालय (Himalayas) पर्वताजवळ वसलेले आहे. येथे अनेक सुंदर पर्यटन स्थळे आहेत. हे राज्य समृद्ध संस्कृतीबरोबरच उत्तम नैसर्गिक सौंदर्याचे परिपूर्ण आहे. एकेकाळी हे राज्य रुबी राजांच्या पूर्ण नियंत्रणाखाली होते. याशिवाय त्रिपुराची राजधानी अगरतला हे ऐतिहासिक, धार्मिक स्मारके आणि इमारतींसाठीही प्रसिध्द आहे. चला तर जाणून घेवू त्रिपुरातील पर्यटन स्थळांबद्दल...

कैलाशहर

कैलाशहर हे त्रिपुरा राज्यातील दुसरे शहर आहे, जे बांगलादेशच्या सीमेच्या जवळ आहे. त्रिपुरामध्ये भेट देण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक मानले जाते. प्राचीन काळी हे शहर त्रिपुराची राजधानी होती आणि त्याची मुळे उनाकोटीशी जोडलेली आहेत. कैलाशहरचा मुख्य उत्सव दुर्गापूजा आहे. तसेच सुंदर निसर्गदृश्ये आणि हिरव्यागार बागा येथे आहे. येथील मुख्य पर्यटन स्थळे म्हणजे लाखी नारायण बारी आणि चौडो देवोतर मंदिर. शहराभोवती अनेक चहाच्या बागा आहेत.

अगरतळा..

त्रिपुरा राज्यातील सर्वात लोकप्रिय ठिकाणात अगरतळा हे असून ही त्रिपुराची राजधानी आहे. तसेच हिरव्यागार कुरण, डोंगर आणि सुंदर दऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणाचे मुख्य आकर्षण उज्जयंता पॅलेस आहे. उज्जयंता पॅलेस हे महाराजा राधा किशोर माणिक्य यांनी 1899 मध्ये बांधलेले शाही घर होते. याशिवाय हा महाल त्याच्या स्थापत्यशास्त्रासाठीही ओळखला जातो. यात तीन घुमट, टाइल केलेले मजले, कोरीव लाकडी छत आणि सुंदर रचलेले दरवाजे आहेत. तसेच या शाही महालाच्या बाहेर एक मुघल शैलीची बाग देखील आहे.

गोरा घर

मेलाघर हे आगरतळापासून सुमारे 50 किमी अंतरावर आहे. रुद्रसागर तलावाच्या मध्यभागी असलेल्या नीरमहाल सारख्या सुंदर इमारतीसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. पर्यटकांना येथे शांत वातावरण मिळते. या व्यतिरिक्त, हे दुर्गा पूजा उत्सवासाठी देखील हे ठिकाण प्रसिद्ध आहे. पूजेच्या वेळी जेव्हा हे शहर सुंदर दिव्यांनी उजळले जाते, तेव्हा संपूर्ण शहर खूप सुंदर दिसते. तसेच रथयात्रा देखील होते. येथे खरेदीसाठी अनेक पर्याय तुम्हाला सापडतील. तुम्ही खरेदीसाठी आनंदबाजारला येऊ शकतात.

उदयपूर

उदयपूरला पूर्वी रंगमती म्हणून ओळखले जात असे आणि त्रिपुरामध्ये वसलेले एक आहे. हे कुत्रिम तलावांसाठी प्रसिध्द आहे. येथे धनी सागर, विजय सागर, जगन्नाथ दिघी, अमर सागर हे भेट देण्यासाठी चांगले ठिकाण आहे. परंतु सर्वात लोकप्रिय त्रिपुरा सुंदरी मंदिर आहे, जे 51 शक्तीपीठांचा एक भाग आहे. आणखी एक प्रसिद्ध मंदिर म्हणजे भुवनेश्वर मंदिर आहे. तसेच येथे नझरुल ग्रंथघर देखील आहे.

नीरमहाल

नीरमहाल या महालाला द लेक पॅलेस आॅफ त्रिपुरा किंवा जल महल असे म्हणून देखील ओळखला जातो. तसेच फ्लोटिंग पॅलेस असेही म्हटले जाते. हा महाल राजा बीर बिक्रम किशोर माणिक्य बहादूर यांनी उन्हाळ्याच्या काळात राहण्यासाठी त्यानी हा महाल बांधला असे म्हटले जाते. या महालात तुम्हाला इस्लामिक आणि हिंदू वास्तुकलेचे मिश्रण पाहायला मिळेल. त्रिपुरामध्ये भेट देण्यासाठी इतर लोकप्रिय ठिकाणांमध्ये वीरम्मा काली मंदिर, पागली मासी मंदिर आणि मेलाघर काली मंदिर यांचा समावेश आहे. ज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT