Vidisha City 
टूरिझम

मध्यप्रदेशातील विदिशा शहर पर्यटनासाठी आहे प्रसिध्द..

बांधवगड राष्ट्रीय उद्यान, ग्वालियर किल्ला, कान्हा व्याघ्र प्रकल्प आदी इत्यादी प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहे.

भूषण श्रीखंडे

जळगावः मध्य प्रदेश (Madhya Pradesh) भारताचे (India) महत्वाचे राज्य असून हे राज्य पर्यटनासाठी देखील प्रसिध्द आहे. त्यामुळे लाखो पर्यटक या राज्याचे सौंदर्य पाहण्यासाठी येत असतात. येथे बांधवगड राष्ट्रीय उद्यान, ग्वालियर किल्ला, कान्हा व्याघ्र प्रकल्प आदी इत्यादी प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहे. तसेच येथील शहर देखील प्रसिध्द असून त्यांना एतिहासील वारसा लाभला असल्याने तेथील वास्तू पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. चला तर जाणून घेवू मध्य प्रदेशातील ऐतिहासिक विदिशा (Vidisha City) शहराबद्दल..

उदयगिरी धरण

विदिशा शहरात सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक म्हणजे उदयगिरी धरण येथे दररोज हजारो पर्यटक येत असतात. विदिशातील हलली नदीवर बांधलेले हे धरण आहे. या धरणाच्या जवळ डोंगर असून येथील दृश्य अतिशय सुंदर दिसते.

बाजरा मठ मंदिर

विदिशा मधील प्राचिन वास्तूमध्ये बाजरा मठ मंदिर हे एक ऐतिहासिक मंदिर आहे. बाजरा मठ मंदिर 10 व्या शतकात बांधले गेले असे म्हतले जाते. लाल दगडांनी बांधलेले हे मंदिर पर्यटकांना आकर्षित करते. मंदिरावर सुंदर कोरीवकाम, भिंतीवरील उत्कृष्ट शिल्प प्रेक्षकांना भूरळ घालते. येथे आणखी 2 प्राचीन मंदिरे देखील आहे.

उदयगिरी लेणी

विदिशा शहरातील उदयगिरी धरणा सोबत उदयगिरी लेणी देखील प्रसिध्द आहे. ही प्राचीन लेणी असून देशी आणि विदेशी पर्यटक येथे भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. या प्राचीन लेण्यांमध्ये हिंदू देवी -देवतांच्या मूर्ती आहे. उदयगिरीच्या डोंगरांवर सुमारे २० लेण्या आहेत.

लोहंगी पर्वत

विदिशा शहरात पर्यटनासाठी आणखी एक ठिकाण म्हणजे, लोहंगी पर्वत हे एक उत्तम ठिकाण आहे. शहराच्या मध्यभागी हे ठिकाण आहे. हा एक मोठा पर्वत असून जेथून विदिशा शहराचे सुंदर दृश्य तुम्हाला पाहायला मिळते. या पर्वतावर एक प्राचीन मंदिर आहे. येथे दररोज भेट देण्याऱ्यांची संख्या मोठी आहे. पावसाळा आणि थंडी मध्ये तर येथील वातावरण विहंगमय असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: ''एवढ्या फास्ट रंग बदलणारा सरडा..'' फडणवीसांच्या लोकप्रियतेवरुन केलेल्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर

Mumbai News: प्रश्न‍पत्रिका तपासणीच्या निकषांमध्ये बदल, शिक्षणात नवीन कार्यपद्धतीचे आदेश; कुणाला लागू होणार?

Eknath Shinde : केंद्राने राज्याला काय दिलं? उद्धव ठाकरेंचा सवाल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यादीच वाचून दाखवली

आर्थिक फायदा; पण सुरक्षेवर ताण येणार! दुकाने २४ तास खुली ठेवण्याचा सरकारचा प्रयोग किती यशस्वी ठरणार? वाचा पडद्यामागचं गणित

Barshi News : बार्शीच्या श्री भगवंत देवस्थानकडून शेतकऱ्यांसाठी १० लाखांचा मदतनिधी; मुख्यमंत्री सहायता निधीकडे धनादेश सुपूर्द

SCROLL FOR NEXT