Panjokhara Sahib Gurdwara 
टूरिझम

पंजोखारा साहिब गुरुद्वाराचा इतिहास आहे रंजक..जाणून घ्या माहिती

हरियाणा स्थित हे अंबाला-नारायणगड रस्त्यावर पंजोखारा साहिब गुरुद्वारा भारतातील गुरुद्वारांमध्ये प्रसिध्द आहे.

भूषण श्रीखंडे

जळगाव ः भारतात विविध संस्कृतीने नटलेला देश असून येथी पर्यटना सोबत धार्मीक स्थळांना (Religious place)भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक जात असतात. भारतात विविध धर्माचे धार्मीक स्थळे प्रसिध्द असून त्यात हरियाणा स्थित हे अंबाला-नारायणगड रस्त्यावर पंजोखारा साहिब गुरुद्वारा (Panjokhara Sahib Gurdwara) भारतातील गुरुद्वारांमध्ये प्रसिध्द आहे. या गुरुद्वाराला हजारो वर्षांचा इतिहास लाभला आहे. येथील लंगर अनेकांचे पोट भरते. चला तर मग जाणून घेऊया पंजोखारा साहिब गुरुद्वारा बाबत रंजक माहिती..

Panjokhara Sahib Gurdwara

असा आहे इतिहास

भारतातील सर्वात प्रसिद्ध गुरुद्वारांपैकी हा एक गुरुद्वारा असून पंजोखारा साहिब गुरुद्वारा आठवे गुरू श्री हरकृष्ण साहिब यांना हा समर्पित आहे. म्हणून या गुरुद्वाराला श्री पंजोखारा साहिब असेही म्हणतात. शीख धर्माव्यतिरिक्त इतर सर्व धर्मांतील भाविक येतात. येथील अख्यांकिका अशी आहे की एकदा गुरु हरकृष्ण साहिब जी या पवित्र स्थानाला भेट दिली. येथे अनेक दिवस राहिले आणि या दरम्यान चाजू नावाच्या मुकबधीर व्यक्तीला त्यांनी आशीर्वाद दिला व जवळच्या तलावात स्नान करायला सांगितले. मग त्या व्यक्तीच्या डोक्यावर काठी ठेवली आणि ती व्यक्ती भगवद्गगीता पाठ करू लागली. यानंतर, येथे गुरुजींनी वाळूचा एक छोटा पठार बनवला आणि या स्थानाला त्याच्या शक्तींनी आशीर्वाद दिला. आणि जो कोणी या पवित्र स्थानावर येतो सरोवरात स्नान करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानवे जाते.

Panjokhara Sahib Gurdwara

हे आहे वैशिष्ट्य आहे?

हा गुरुद्वार येथील परिसर सौंदर्याने परिपूर्ण असून येथे येणाऱ्या भाविकाने भेट देऊन प्रार्थना केल्याने सर्व पाप धुवून जाते असे मानले जाते. तसेच तलावात स्थान केल्याने प्रत्येक रोग निघून जातो. याशिवाय असे म्हटले जाते की येथे येणाऱ्या लोकांची प्रत्येक प्रार्थना पूर्ण होते.

Langar

लंगर सेवा

पंजोखारा साहिब गुरुद्वाराच्या लंगरमध्ये दररोज 50 हजार लोकांना भोजनाची सेवा देतात. सणांच्या निमित्ताने येथे लोकांची संख्या लाखावर जाते. गुरुद्वारामध्ये स्वच्छता आणि स्वादिष्ट व गुणवत्तेशी भोजनाची कुठलेही तडजोड केली जात नाही. लोक येथे प्रार्थना सोबत लंगरचा भरपुर आनंद घेतात.

Panjokhara Sahib Gurdwara

गुरुद्वाराची वास्तुकला

गुरुद्वाराची महंती सोबत या गुरुद्वाराची सौंदर्य खुलावते येथील वास्तुकला. येथे वर्षभर लोकांची गर्दी असते. पांढऱ्या संगमरवरी बनलेले हे गुरुद्वारा शांत वातावरण प्रदान करते. वास्तुकला देखील सुंदर असून गुरुद्वाराचे सुंदयौ अधिक खुलवीते. म्हणूनच केवळ दिल्लीच नव्हे तर संपूर्ण भारतातून लोक या गुरुद्वाराला भेट देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

karoline leavitt ट्रम्प यांच्या २८ वर्षीय अधिकारी तरुणीनं ६० वर्षीय व्यक्तीशी का केलं लग्न? स्वत:च केला खुलासा

Heart Blockage: हार्ट ब्लॉकेज कमी करतात ‘या’ 3 भाज्या, डॉक्टरही देतात रोज खाण्याचा सल्ला

Latest Marathi News Update LIVE : थार आणि कारचा भीषण अपघात, ५०० फूट खोल दरीत कार कोसळली, ६ पैकी ४ जणांचे मृतदेह सापडले, २ अजूनही बेपत्ता

kolhapur kagal politics: मुश्रीफ -राजे गट एकत्र आल्यानंतर, मंडलिकांनी वेगळी चाल खेळली; संजय घाटगेंची भेट घेत केली बंद खोलीत चर्चा

Swarnagiri Temple Tourism: स्वर्गासारखे तेजस्वी ‘स्वर्णगिरी’ मंदिर पाहताक्षणी मन मंत्रमुग्ध होते! जाणून घ्या प्रवासाचा संपूर्ण मार्ग

SCROLL FOR NEXT