Monsoon Tourism esakal
टूरिझम

Monsoon Tourism : प्राचीन काळापासून सात देवतांचं निवासस्थान असलेलं विदर्भातलं हे ठिकाण, एकदा नक्की बघा

पावसाळ्यात आणि हिवाळ्यात बरेच लोक इथे ट्रेकिंगसाठी जातात. तेव्हा यंदा तुम्हीही इथे जाऊ शकता.

साक्षी राऊत

Monsoon Tourism : पावसाळ्यात बरेच लोक ट्रेकिंगला जातात. तसेच पावसाळ्याचा आनंद घेतात. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात विदर्भातल्या या ठिकाणी पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. नैसर्गिक सौंदर्याचा उत्तम नजारा तुम्हाला इथून बघता येईल. या पर्वतरांगांचे नोंदणीकृत नाव "पेरजागड" असे आहे. मात्र अनेकांना या ठिकाणाची माहिती नाही. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात बरेच लोक इथे ट्रेकिंगसाठी जातात. तेव्हा यंदा तुम्हीही इथे जाऊ शकता.

नैसर्गिक सौंदर्याची अप्रतिम दृष्ये तुम्हाला इथे बघायला मिळतील. नागभीड तहसीलच्या शेवटी 35 किमी लांब आणि 459 मीटर उंच पर्वत आहे. लांबून पाहिल्यास तो किल्ला वाटतो कारण त्याच्या माथ्यावर मोठे खडकाळ थर आहेत. या पर्वतरांगांना सात बहिणी म्हणजेच सेवन सिस्टर हिल्स असे म्हटले जाते. म्हणजेच अंबा, निंबाई, मुक्ताई, लक्ष्मी, सरस्वती, महाकाली आणि दुर्गा या सात बहिणी. त्यांची निवासी गुहा आणि मंदिरे आजही तेथे प्राचीन काळापासून आहेत. (Monsoon Tourism)

1964 पासून दरवर्षी मकरसंक्रांती आणि महाशिवरात्री या सणांसाठी जवळपासचे लोक एकत्र जमतात. टेकडीच्या माथ्यावरून दिवसाच्या विशिष्ट वेळी सूर्यास्त आणि सूर्योदय पाहता येतो. तसेच दिवसा वन्य प्राणी आणि पक्ष्यांचा आवाज तुम्हाला इथे ऐकू येईल. (Tourism)

ट्रेकिंगसाठी हे ठिकाण उत्तम आहे. तसेच या पर्वताच्या उंचावर पोहोचल्यावर तिथून अप्रतिम नजारा दिसतो. तेव्हा एकदातरी या पर्वतरांगांना नक्की भेट द्या आणि पावसाळ्याचा भरपूर आनंद घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, जागेवरच मृत्यू; शिंदेसेनेच्या नेत्यानं कट रचल्याचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

Satana Bribery Case: वडिलांच्या मालमत्तेवर वारस नोंद करण्यासाठीही लाच! सटाण्यातील सरकारी अधिकारी एसीबीच्या ताब्यात, नेमकं काय घडलं..

Pune Metro: बाणेर-बालेवाडीतील मेट्रो स्थानकांना डावलल्याने नागरिक रस्त्यावर; मेट्रो सुरू करण्यास विरोध, आंदोलनकर्ते ताब्यात

IND vs NZ : विराट कोहली न्यूझीलंडमध्ये सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडणार? सेहवागलाही मागे टाकण्याची संधी

Koyna Dam Water Release : कोयनेच्या विसर्गाने वाहू लागली 'कृष्णा'; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत

SCROLL FOR NEXT