Monsoon Wedding Destinations esakal
टूरिझम

Monsoon Wedding Destinations : पावसाळ्यात लग्न करताय? भारतातील ही शहरं आहेत लग्नासाठी सर्वोत्तम

हळद, मेहंदी, रिसेप्शनसाठी लोक महागडे रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स

सकाळ डिजिटल टीम

Monsoon Wedding Destinations : भारतात लग्न म्हणजे जणू काही उत्सवच असतो. भारतात मोठ्या थाटामाटात लग्न केली जातात. प्रत्येक कार्यासाठी स्वतंत्र तयारी केली जाते. हळद, मेहंदी, रिसेप्शनसाठी लोक महागडे रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स बुक करतात आणि आजकाल डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंडही लोकप्रिय होत आहे, त्यामुळे जर तुम्हीही पावसाळ्यात डेस्टिनेशन वेडिंगचा प्लॅन करत असाल, तर भारतातील अशी काही ठिकाणं आहे जी तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहेत. या ठिकाणी येऊन केवळ तुम्हालाच नाही तर पाहुण्यांनाही खूप मजा येईल.

कोवलम

केरळ मधील अतिशय सुंदर ठिकाण, जे पावसाळ्यात लग्नासाठी योग्य आहे. कोवलममध्ये अनेक रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स आहेत जे तुमचा लग्नाचा सोहळा अविस्मरणीय बनवतील. तुम्ही हाऊसबोटमध्ये लग्न समारंभाचे नियोजन करू शकता, हा एक अतिशय अनोखा अनुभव असेल.

उदयपूर

जर तुम्हाला लग्नाला रॉयल टच द्यायचा असेल तर तुम्ही उदयपूरचा प्लॅन करू शकता. तलावांचे शहर असलेले उदयपूर हे बॉलिवूड सेलिब्रिटींचे आवडते ठिकाण आहे. येथे येऊन तुमच्या लग्नसमारंभाला शाही बनवता येईल.

गोवा

गोवा हे मनोरंजन, पार्टी तसेच डेस्टिनेशन वेडिंगसाठी सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा विवाह सोहळाही येथे प्लॅन करू शकता. गोव्यात बीच साइड वेडिंग खूप प्रसिद्ध आहे. गोव्याचे नाईट लाइफ तुमचा विवाह सोहळा अगदी शानदार बनवतील.

लोणावळा

लोणावळा हे पावसाळ्यात भेट देण्याच्या योग्य ठिकाणांपैकी एक आहे, परंतु प्रेक्षणीय स्थळांव्यतिरिक्त, तुम्ही येथे लग्नाची योजना देखील करू शकता. पावसाळ्यात लोणावळ्याचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. लोणावळ्यात पर्यटक मोठ्या संख्येने येतात. पावसाळी लग्नासाठी लोणावळा हे परफेक्ट डेस्टिनेशन आहे. तसे, खंडाळा हे देखील येथे खूप चांगले ठिकाण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT