Uttarakhand Chardham Yatra esakal
टूरिझम

चारधाम यात्रेला पोहोचले 5 लाखांहून अधिक भाविक; 2 वर्षांचा मोडला विक्रम

सकाळ डिजिटल टीम

उत्तराखंडमधील चारधाम यात्रेला विक्रमी संख्येनं भाविक पोहोचत आहेत.

यंदा उत्तराखंडमधील चारधाम यात्रेला (Uttarakhand Chardham Yatra) विक्रमी संख्येनं भाविक पोहोचत आहेत. गेल्या 2 वर्षांचा विक्रम यावर्षी मोडीत निघालाय. प्रत्यक्षात चारधाम यात्रा सुरू होऊन केवळ दोन आठवडेच झाले आहेत. मात्र, भाविकांची वाढती संख्या पाहता गेल्या दोन वर्षांचा विक्रम मोडला गेलाय. कोरोना महामारीमुळं हा प्रवास दोन वर्षांपासून पूर्णपणे ठप्प होता. परंतु, आता हा प्रवास पूर्णपणे खुला झालाय. यात प्रवाशांच्या आगमनाच्या नोंदी पाहिल्या तर आतापर्यंत पाच लाखांहून अधिक प्रवाशांनी चारही धामांना भेटी दिल्या आहेत.

कोरोनाच्या कालावधीपूर्वी (Coronavirus) 2019 मध्ये 33 लाखांहून अधिक यात्रेकरूंनी केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री, गंगोत्री या चार धामांना भेट दिली होती. त्याच वेळी 2020 मध्ये 3.33 लाख प्रवासी आले होते. मात्र, आता तिथंच गेल्या 2 आठवड्यांपासून म्हणजे 3 मेपासून चार धाम यात्रा सुरू झालीय. या दरम्यान, 15 मे पर्यंत 5 लाखांहून अधिक भाविकांनी यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ धामला भेट दिलीय.

उत्तराखंडमध्ये होणारी चारधाम यात्रा यावेळी स्थानिक लोकांसाठी आर्थिक फायद्याची ठरलीय. यामध्ये केवळ हॉटेल व्यवसायच नाही तर चार धाम यात्रेच्या मार्गावरील छोटे-मोठे हॉटेलवाले, टॅक्सी, बसचालक आदींचाही समावेश आहे. याशिवाय चार धामांमध्ये प्रसाद आणि पूजेचे साहित्य विकणाऱ्यांचा देखील आर्थिक फायदा होताना दिसत आहे. सध्या चार धाम यात्रेत विक्रम मोडणाऱ्या प्रवाशांच्या संख्येनं या सर्व लहान-मोठ्या व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुललंय. याचं कारण म्हणजे, कोरोना महामारीमुळं हा प्रवास 2 वर्षांपासून पूर्णपणे ठप्प झाला होता. त्यामुळं लोकांचं मोठं नुकसान झालं होतं. मात्र, आता अशा परिस्थितीत प्रवाशांची संख्या वाढत असताना आपला व्यवसायही मोठ्या प्रमाणावर चालेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केलीय. दरम्यान, चारधाम यात्रा सुरू झाल्यापासून आतापर्यंत 20 भाविकांचा मृत्यू झालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT