Valentine Day 2024 esakal
टूरिझम

Valentine Day 2024 : जोडीदारासोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा आहे? मग, ‘या’ ऑफबीट ठिकाणांना नक्की द्या भेट

अवघ्या काही दिवसांवर ‘व्हॅलेंटाईन डे’ येऊन ठेपला आहे. नुकतीच व्हॅलेंटाईन वीकला सुरूवात झाली आहे. अनेक कपल्स या व्हॅलेंटाईन वीकची आणि व्हॅलेंटाईन डे आतुरतेने वाट पाहत असतात.

Monika Lonkar –Kumbhar

Valentine Day 2024 : अवघ्या काही दिवसांवर ‘व्हॅलेंटाईन डे’ येऊन ठेपला आहे. नुकतीच व्हॅलेंटाईन वीकला सुरूवात झाली आहे. अनेक कपल्स या व्हॅलेंटाईन वीकची आणि व्हॅलेंटाईन डे आतुरतेने वाट पाहत असतात. जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला की, अनेक जण ‘व्हॅलेंटाईन डे’ चे प्लॅनिंग सुरू करतात.  जर तुम्ही यंदाच्या ‘व्हॅलेंटाईन डे’ ला कुठे बाहेर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. कारण, आज आम्ही तुम्हाला खास ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त फिरण्यासाठी बेस्ट असलेल्या काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात या ठिकाणांबद्दल.

कुमारकोम

जर यंदाच्या व्हॅलेंटाईन डे निमित्त तुम्हाला दूर कुठेतरी आणि निवांत ठिकाणी जायचे असेल तर दक्षिण भारतातील कुमारकोम हे ठिकाण तुमच्यासाठी एकदम बेस्ट आहे. केरळमधील कुमारकोम हे एक कपल्ससाठी सर्वोत्तम ठिकाण आहे.

या ठिकाणी गेल्यावर तुम्ही हाऊसबोटमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करू शकता. यासोबतच सभोवतालचा कुमारकोमचा समुद्रकिनारा, नारळाची झाडे यामुळे या परिसराला एक वेगळाच लूक येतो. अनेक कपल्स या ठिकाणाला भेट देत असतात. येथील वेंबनाड तलाव देखील पाहण्यासारखा आहे.

नालदेहरा

शिमला-मनालीला तर अनेक जण जातात. या ठिकाणांना दरवर्षी अनेक पर्यटक भेट देतात. व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्ताने अनेक जोडपी या ठिकाणांना आवर्जून भेट देतात. मात्र, जर तुम्हाला गर्दीपासून दूर कुठेतरी जायचे असेल तर नालदेहरा हे एक बेस्ट ठिकाण आहे.

 नालदेहरा हे हिमाचल प्रदेशातील एक सुप्रसिद्ध ठिकाण आहे. निसर्गाने संपन्न असलेला हा परिसर पाहिल्यावर तुम्ही वारंवार या ठिकाणी याल, यात काही शंका नाही. शांत ठिकाणी व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा असेल तर हे एक सर्वोत्तम ठिकाण आहे.

येथील हिरवळ आणि नयनरम्य दृश्ये पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत या सुंदर ठिकाणी व्हॅलेंटाईन वीक आणि व्हॅलेंटाईन डे साजर करू शकता. हा स्पेशल डे साजरा करण्यासाठी तुम्हाला शांतता आणि नयनरम्य परिसर हवा असेल तर या ठिकाणी जायला काहीच हरकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Playing XI: रजत पाटीदार कर्णधार, सरफराज-ऋतुराज गायकवाड संघात; सोशल मीडियावरील Playing XI मुळे खळबळ

पुण्यात खळबळ! विद्यापीठात बनावट डिग्रीचं रॅकेट? रिक्षाचालकाने उघड केलं गंभीर प्रकरण

"Gen Z तरुणी कुरूप आणि भ्रष्ट' कंगना रनौतचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाली... 'अनेकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्याला स्वातंत्र्य मानतात'

Latest Live Updates Marathi : पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के, तीव्रता 3.5 रिश्टर स्केल

MPSC Exam: 'एमपीएससी'चं चाललंय काय? अपात्र उमेदवारांमुळे पात्र उमेदवारांवर अन्याय; माहिती व जनसंपर्क विभागाची भरती प्रक्रिया कासवगतीने

SCROLL FOR NEXT