कोकणात आलिशान क्रुझ सफारीसह होणार पर्यटन Google
टूरिझम

कोकणात आलिशान क्रुझ सफारीसह होणार पर्यटन; भास्कर जाधवांची माहिती

सकाळ डिजिटल टीम

गुहागर (रत्नागिरी) : मुंबई ते गोवा (Mumbai to Goa) या सागरी मार्गावरील आलिशान प्रवास सुरू झाला असून याचा फायदा गुहागरलाही मिळण्याची शक्यता आहे. मुंबई ते गोवा या प्रवासात या आलिशान क्रुझला गुहागर तालुक्यातील वेलदूर येथे थांबा मिळाला असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या जेटीचे काम वेलदूर येथे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती गुहागरचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav)यांनी शृंगारतळी येथे दिली.

कोकण किनारपट्टीवरील सागरी निसर्ग सौंदर्यांचा आस्वाद घेत, या आलिशान क्रुझमधून सर्व सुखसोयींनीयुक्त अशी ही सफर प्रवाशांसाठी उपलब्ध झाली आहे. मात्र, मुंबई ते थेट गोवा अशी सोय असल्याने संपूर्ण कोकण किनारपट्टीवर या क्रुझला थांबा नव्हता. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी संबंधितांशी चर्चा करून वेलदूर येथे या क्रुझला थांबा मंजूर करून घेतला आहे. त्यासाठी वेलदूर येथे जेटी उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे माहितीही आमदार जाधव यांनी दिली. क्रुझच्या या वेलदूर येथील थांब्यामुळे गुहागरच्या पर्यटन व्यवसायावर चांगला परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा प्रवासावर या आलिशान क्रुझला वेलदूर येथे थांबा मिळाल्यास गुहागरच्या पर्यटन व्यवसायामध्ये मोठी वाढ होण्याची आशा येथील पर्यटनप्रेमींनी केली आहे.

गुहागरातील किनाऱ्‍यावर प्रसिद्ध देवस्थाने

गुहागर तालुक्यातील काही समुद्र किनाऱ्‍यावर प्रसिद्ध देवस्थाने असून, या देवस्थानांनाही पर्यटकांना भेट देता येईल. गुहागरच्या पर्यटन क्षेत्रामध्ये चांगली वाढ व्हावी व येथील तरुणांना व व्यावसायिकांना रोजगार मिळावा यासाठी आमदार जाधव पूर्वीपासूनच आग्रही आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची नाराजी दूर, मुलाचा उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेणार

Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅन

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके

Lowest Price Electric Scooter : 50 हजारपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; सगळ्यात स्वस्त आहेत 'या' 3 गाड्या, दमदार रेंज

SCROLL FOR NEXT